भुतकाळात डोकावताना(अंतिम भाग)

कथा मालिका


भुतकाळात डोकावतांना भाग १०

आदित्यला अचानक जाग आली. तेव्हा आदित्यच्या कानावर या दोघांचे संभाषण गेले.‌

"आई, तू माझ्या पासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली. माझे वडील जिवंत आहे म्हणून."

"हे बघ आदित्य तू या भानगडीत पडू नये असे मला वाटते. हा माणूस तुझा बाप असूच शकत नाही. मी माझ्या आयुष्यात त्याला परत आणू इच्छित नाही."

"पण, का आजपर्यंत तू माझ्या पासून सगळं लपवून ठेवले. आज मला कळलेच पाहिजे.‌ माझे वडील जिवंत असूनही ते माझ्यापासून दूर का होते?"

"आई माझ्या मनात असंख्य प्रश्न घोळत आहे आणि त्यांची उत्तरे तुला द्यावीच लागेल."

प्रविण सुध्दा स्वतः ची बाजू सांगण्याचा प्रयत्न करू लागला.

"हे बघ बेटा आदित्य, मी आजपर्यंत जिवंतच होतो. मला माहित नाही तुझ्या आईने तुला काय सांगितले ते. मी तिच्याशी फार वाईट वागलो. असे तिला वाटते आणि त्यामुळेच मी माझ्या कृत्याची आणि कर्माची शिक्षा भोगली आहे. मला माझ्या कृत्याचा पश्चात्ताप झाला आहे. म्हणून मी तुम्हां दोघांची मनापासून माफी मागतो. मला या दुःखातून सावरण्यासाठी तुमच्या आधाराची गरज आहे."

प्रविणचे डोळे भरून आले होते.

"हे बघ प्रविण तू आदित्यला फसवू‌ शकत नाही. तुझे अश्रू किती खोटे आहेत हे मला चांगलंच माहिती आहे. तू त्याला भरीस पाडून नकोस."


"मी असं काहीही करीत नाही. आदित्य माझा मुलगा आहे आणि त्याच्या वर माझाही तितकाच अधिकार आहे. तू जर मला त्याला भेटू दिले नाही. तर मला नाईलाजाने कोर्टात धाव घ्यावी लागेल."

आदित्यला प्रविणचा एक एक शब्द खरा वाटत होता.

"बाबा तुम्ही काळजी करू नका. तुम्ही मला वाटेल तेव्हा भेटायला येऊ शकता."

अर्चना काही बोलणार. तेवढ्यात दाराची बेल वाजली. अर्चनाने बघीतले तर दारात पोलिस आले होते. अचानक सगळे अचंबित झाले. पण प्रविण मात्र घाबरला.

प्रविण पोलीसांना बघताच पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पण, पोलिसांनी शिताफीने त्याला पकडले.

"काय झाले इन्स्पेक्टर? ?

"अहो, मॅडम हा खून करून पळालेला अट्टल गुन्हेगार आहे. त्याचे लोकेशन ट्रेस झाले आणि हा पकडला गेला आणि हा इथे कसा. तुमचा कसा काॅनटॅक्ट आहे याच्याशी?"

"अहो, तो आमचा ड्रायव्हर म्हणून रुजू झाला आहे एका कंपनीने पाठवले आहे."

"अहो, मॅडम बरं झालं तुम्ही वाचल्या याच्यापासून. ती कंपनी खोटी आहे. यानेच ती तयार केली आहे. या अगोदरही त्याने अनेकांना फसविले आहे."

आदित्यने अर्चना कडे पाहिले.

चला आम्ही निघतो.
पोलिस प्रविणला घेऊन निघून जातात.

पोलिस निघून गेल्यावर आदित्यने अर्चनाची माफी मागितली.

आई, मला माफ कर. इतक्या वर्षांनंतरही मी तुला ओळखू शकलो नाही. फक्त एक दिवस भेट झाली आणि मी माझ्या वडीलांच्या प्रेमात आंधळा झालो. तू माझ्यासाठी काय केलं, किती त्रास सहन केला. हे मी एका क्षणात विसरलो गं.

"आदित्य, मी आजपर्यंत फक्त तुझ्यासाठी जगले. ज्या आई वडीलांनी मला जन्म दिला त्यांना माझ्यामुळे किती त्रास झाला. पण, ते होते म्हणून मी सगळा भुतकाळ मागे टाकून नव्याने उभी राहिली."

"आई ,आजपर्यंत तू माझी काळजी घेतली. आजपासून मी तुझी काळजी घेईल. चल , माझ्या सोबत तुझेही विमानाचे तिकीट बुक करतो."

माय लेकाच्या नात्यांचा गंध पुन्हा दरवळला.

©® अश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all