भुतकाळात डोकावतांना (भाग/२)

कथामालिका


भुतकाळात डोकावतांना (भाग २)

अर्चना एका मुलाच्या प्रेमात पडली. कोण आहे तो मुलगा.....

अर्चनाचे आई वडील अर्चनाच्या भविष्याचा विचार करत होते आणि आपल्या मुलीने चांगले शिक्षण घ्यावे. तिचे उज्वल भविष्य घडावे यासाठी तिला अभ्यास वर्ग लावून दिले. क्लासच्या बाजुलाच एक चहाची टपरी होती आणि तिथेच तिची भेट प्रविणशी झाली. त्याचे घारे डोळे, त्याचे हवेत उडणारे केस सावरत चालत येणं तिच्या मनात घर करून बसले होते. तो क्लास मधील शिक्षकांसाठी रोज चहा घेऊन यायचा. हळूहळू अर्चनाही त्याच्या टपरीवर चहा घ्यायला जायची. चहा घेण्याच्या निमित्ताने ती त्याला निरखून बघू लागली. हळूहळू त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. त्याचे गोड बोलणे तिला भुरळ पाडत होते. त्यामुळे ती प्रविण कडे आपोआप ओढल्या गेली. हळूहळू त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या.
कधी कधी त्याच्या गाडीवर बसून फिरणे, त्याचे तिला गिफ्ट देणे‌ हे तिला आवडायला लागले होते. काहीही मागितले तर तो तिच्यासाठी आणून द्यायचा. जणू तिच्यासाठी तो एक हिरोच होता. एक चहा प्रेमी खरोखरच्या प्रेमात पडली होती.

‌पण, घरच्यांना तिच्या प्रेमप्रकरणाची तसूभरही माहिती नव्हती. त्यामुळे वेळ मिळेल तसा आणि तेव्हा अर्चना प्रविणला भेटत होती. एक दिवस जरी प्रविणला बघीतले नाही तर ती बैचेन व्हायची. दिवसेंदिवस त्यांचे प्रेम फुलतच होते.

एकेदिवशी अर्चना बोलली, "प्रविण, मला आता इथे नाही राहायचे. आपण लग्न करू या ना? तू तुझ्या आईवडीलांना घेऊन माझ्या घरी ये आणि माझ्या आईवडीलांशी त्यांची भेट करून दे. म्हणजे आपण कायम एकत्र राहू."

"अर्चू ते शक्य नाही. माझे तुझ्यावर खरचं खूप प्रेम आहे. पण, काही दिवस थांब. माझ्या

तो तिला समजावून सांगायचा.
"अर्चना अगं, तुझे दहावीचे पेपर झाले की मग ठरवता येईल. असे म्हणत प्रविण तिला समजावून सांगू लागला."

अर्चनाला देखील ही गोष्ट पटली आणि तिने मनात विचार केला की दोन तीन महिन्यांचा प्रश्न आहे मग बघू. त्यानंतर मात्र ती फक्त दहावीचे पेपर व्हायची वाट बघू लागली. या सगळ्याचा परिणाम मात्र तिच्या अभ्यासावर झालाच होता. कसेबसे पेपर दिले. पण, आलेल्या रिझल्टचा परिणाम म्हणजे अर्चना जेमतेम काठावर पास झाली होती. कारण, तिला वेध लागले होते प्रविण सोबत लग्न करून मनासारखा संसार करण्याचे . नवीन नवीन स्वप्नं पाहण्याचे. पण, प्रविणच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अर्चना मात्र सतत त्याच्या मागे लागू लागली. तिला फक्त ती दोघेच दिसत होती.‌ ना उद्याची चिंता, ना काही पैशांची. फक्त \"प्रेम\" या एका शब्दावरून तिला भुरळ पडली होती ‌.

" प्रविण, आपण, लग्न कधी करायचे. तुझ्या घरी तू सांगितले की नाही? माझ्या घरी तू केव्हा येतो? तुझ्या शिवाय मला करमत नाही रे आता?"

\"हो गं, मी काहीतरी ठरवत आहे आणि ते तुझ्यासाठी सरप्राइज आहे."
खरंतर त्याने स्वतः च्या लग्नाविषयी घरी अजुनही सांगितले नव्हते. पण, घरचे लोक विरोध करणार नाही हे प्रविणलाही चांगलेच माहीत होते. कारण, घर म्हणजे तरी काय ? तर दारूडा बाप, धुणीभांडी करून घर चालवणारी त्याची आई, एक मोठी बहीण. जिथे ना सुख होतं ना समाधान. एक त्यामुळे एके दिवशी त्याने काही मित्रांच्या मदतीने एक खोली भाड्याने घेतली.

कारण ,अर्चनाने लग्नासाठी सारखा तगादा लावला होता. त्यामुळे एके दिवशी ते दोघे भेटले. प्रविण काही तरी प्लॅनिंग करून आला होता.



©® अश्विनी मिश्रीकोटकर










🎭 Series Post

View all