Feb 24, 2024
माझे पुस्तक

भुताने केली चोरी

Read Later
भुताने केली चोरी
तो आणि त्याची आई मिळुन एक दुकान चालवत होते. त्याच्या वडीलांचे खुपच लवकर निधन झालेले होते. त्यांनीच हा एक गाळा घेऊन ठेवलेला होता. त्यातच दोघांनी मिळुन खेळण्याचे दुकान सुरू केले होते. सध्यातरी हे एकच त्यांच्या रोजगाराच साधन होत.

उद्या शनिवार होता. त्याला आणि त्याच्या बायकोला पहाटेच मंदिरात जायचं होत. दर शनिवारी ती दोघ मंदिरात जात होते. तिथल्या महादेवाच्या पिंडीच दर्शन घेऊन औदुंबराला प्रदक्षिणा घालत होते. शेवटी ती पण त्याच्या आयुष्यात या महादेवामुळेच आलेली होती. ती त्याच्या गावाकडची मुलगी होती. त्याला गावाकडच्या मुलींमध्ये काडीचाही रस नव्हता.

पण एकदा तो गावाला असताना तिथल्या महादेवाच्या मंदीरात आईसोबत गेलेला होता. त्यावेळेस ती महादेवाच्या तांडवस्त्रोतावर तांडवनृत्य करत होती. ते बघुन तो तिथेच हरवलेला होता. त्याचा आईनेही ते पाहील आणि पटकन दोघांचे लग्न उरकुन घेतलं होते.

दुकान बंद करता-करता रात्रीचे अकरा वाजले. तेव्हा कुठे ते दोघ घरी आले होते. असच हसत खेळत गप्पा मारत त्यांनी जेवण आटपली होती. बाकी किचनमधली काम आवरुन ते चौघेही निद्रेच्या अधीन झालेले होते.

लवकर पहाट झालेली होती. अस उशीरा झोपल्यावर प्रत्येकालाच वाटत असत. त्याचही तसचं झाल होत. बाकी तिघी तर उठल्या होत्या. पण हा मात्र अजुनही पसरलेलाच होता. त्याची बायको त्याला उठवायला आलेली होती. पण तो हलतही नव्हता म्हणुन तिने सरळ थंड पाणी त्याच्यावर टाकलेल होत.

थंड पाणी तोंडावर पडताच तो खाडकन उठुन बसला होता.

“अस कोण उठवतं?” तो चेहर पुसत बोलला. “आत्ता तर कुठे झोपलो होतो.” तो वैतागुनच बोलला होता.

“उठतोस का?” बाहेरुन आईचा करारी आवाज आला. तसा तो पटकन आंघोळीला पळाला. आईचा धाक अजुन काय?

त्याच्या बायकोच तर आवरुन झालेल होत. फक्त त्याचा चहा घ्यायचा बाकी होता त्याने पटकन चहा घेतला आणि दोघेही मंदीरात जायला निघुन गेले होते.

मंदिरात जाणारा रस्ता त्यांच्या दुकानावरूनच जात होता. जाताना त्याने दुकानावर फक्त तिरकी नजर टाकलेली होती.

मंदीरात पोहचल्यावर त्यांनी मनोभावे महादेवाच दर्शन घेतलं. त्याने नेहमीप्रमाणेच परत महादेवाचे आभर मानलेले होते. नंतर दोघांनीही औदुंबराला प्रदक्षीणा घातली होती. थोडावेळ तिथे बसुन ते पुन्हा आपल्या घरी जायला निघालेले होते. येताना मात्र त्याने त्याच्या दुकानाकडे काही पाहीलेल नव्हतं. ते दोघ त्यांच्या गप्पांच्या नादातच घरी चालले होते.

बाईक चालवत असताना त्याचा मोबाईल वाजला. नंतर घरी जाऊन उचलुन या विचाराने त्याने तो उचललेला नव्ह्ता. घरी पोहोचायच्या आधीच त्याच्या बायकोला मिठाईच दुकान दिसलं होत. तेव्हा तिला सोनपापडी घ्यायची आहे ते आठवलं होत.

त्याने त्याची बाईक थांबवली. ती उतरली आणि मिठाईच्या दुकानात निघुन गेली होती. याचा फोन सारखाच वाजु लागला होता. आता ते थांबलेले असल्याने त्याने तो फोन उचललेला होता. फोनवरच बोलण ऐकुन त्याला घामच फुटला होता. तो पटकन बाईकवरून उतरुन त्याच्या बायकोजवळ गेला.

“काय झाल ओ?” त्याला घाबरलेल बघुन तीने विचारल.

“अगं! शेजारच्या सुर्वेंचा फोन आला होता. आपल दुकान फोडल म्हणे.” तो

तशी ती पण घाबरली होती. तसे ते लागलीच त्यांच्या दुकानाकडे गेले. जाताना आपल्याला का दिसलं नाही याच विचारात तो दुकानाकडे चालला होता. तिथे पोहचल्यावर त्यांना दिसल की त्यांच्या दुकानात शटर खालून थोडच उचललेल होत. कॅरमचे बोर्ड त्यातून खालुन सरकुन बाहेर आलेले होते.

त्याने फोन उचलला नाही म्हणुन सुर्वेनी त्याला थोड झापल होत. त्याने पटकन दुकानात शटर उघडायला पाहील होत. पण ते खालुन थोड पुढे ओढलेल असल्याने ते काही उघडलं जातच नव्हतं. शेवटी त्याने पायाने ते शटर आत दाबुन सरळ केल. तेव्हा ते उघडल गेल होत. आतुन काचेचा दरवाजा होता. जो बाहेरच्या दिशेने उघडत होता. त्यालाही लॉक होत. त्यामुळेच ते काही तोडायला जमलेल दिसत नव्हतं.

काही चोरीला गेल नाही ते बघुन दोघांनी महादेवाचे आभार मानलेले होते. दोघांना निवांत बघुन सुर्वे परत बोलले.

“अरे, ते सीसीटीव्ही बसवलेला आहे. तर बघ त्यात कोणी केल हे?” सुर्वे
“अरे हो की.” तो “पहील्यांदाच त्याचा उपयोग होईल.”

त्याने काचेचा दरवाजा उघडला आणि सीसीटीव्ही चेक करु लागला. तोवर आजुबाजुचे माणसही चोरांना बघायला गोळा झालेले होते. पण त्याचा लॉगीन पासवर्ड त्याला काही आठवत नव्हता. मग त्याने त्याच्या मित्राला फोन लावला. तो अजुनही साखरझोपेतच होता. सकाळी सात वाजताच सारखा सारखा फोन वाजतो म्हणून त्या मित्रानेही वैतागुनच फोन उचलला होता. पण झालेली घटना ऐकुन त्याने शांतपणे पासवर्ड सांगीतलेला होता.

त्यांनी सीसीटीव्ही चालु केला होता. तोवर त्याची आई आणि बहीणही येऊन पोहोचले होते. त्याच्या बायकोने घरी सर्व सांगितल्यामुळे ते ही लगेच आलेले होते. आता पुर्ण रात्रीची रेकॉर्डिंग बघायची म्हटल्यावर त्याच्या बहिणीने ती व्हिडीओ फास्ट फॉरवर्ड करायला सांगीतली होती.

त्यामुळे त्याने एकदमच ८एक्स ने फास्ट केलेली होती. बघता बघता अचानक ते कॅरम बोर्ड बाहेर आलेले दिसले. बाकी तिथे कोणीच माणसं दिसली नव्हती. मग त्याने व्हिडीओ रिव्हर्स न करता डायरेक्ट मागच्या एका मिनिटावर क्लिक करुन व्हिडीओ पुन्हा चालु केली होती. पण तेव्हाही तसचं दिसल होत. अस चार -पाच वेळेस केल. तरी तिथे एकही माणुस न दिसता फक्त कॅरम बोर्ड अचानक बाहेर पडताना दिसत होते.

आता मात्र सगळ्यांनाच घाम फुटला होता. चोरी करायला खरचं भुत आलं होत का? अशी शंका सगळ्यांनाच यायला लागलेली होती. ती बातमीच पुर्ण बिल्डिंगमध्ये पसरलेली होती. सगळ्यांनी प्रयत्न करुन पाहीले. पण ते तसच दिसत होत. बाकीच्यांनीही फक्त व्हिडिओचा कर्सर मागेपुढे केलेला होता. सगळेच टेन्शनमध्ये आले होते.

त्यानेही टेन्शनमध्ये त्याच्या मित्राला फोन लावला होता. मित्राने फोन उचलल्या उचलल्या तो त्याच्यावर बरसलेला होता. त्याने त्याच्या मित्राला ताबडतोब यायला सांगीतलेल होत. असा कसा सीसीटीव्ही बसवला म्हणुन तो चिडलेला होता. कोणी दिसतच नाही तर कॅरम बोर्ड कसकाय बाहेर आले? या विचारानेच त्याला घाम सुटलेला होता आणि तोच राग त्याच्या मित्रावर निघालेला होता.

तो ही हे सगळेच ऐकुन पटकन दुकानाकडे यायला निघाला होता. तोवर जवळपास सगळी बिल्डींग त्याच्या दुकानात जमा झालेली होती.
त्याचा मित्र पोहोचला होता. सगळ्यांनाच टेन्शनमध्ये बघुन तो ही जरा घाबरलेलाच होता. त्याने घाबरतच सीसीटीव्ही चेक करायला घेतला.

थोडावेळ चेक करुन त्याच्या मित्राने त्याच्याकडे पाहीले आणि एक दिर्घ श्वास घेतला. मित्राने परत काहीतरी केल आणि ती व्हीडिओ परत चालु केली. आता मात्र त्यात तिन चोर स्पष्ट दिसुन आलेले होते.

“बघीतले का तुमची भुत?” मित्र चिडुन बोलला. त्याची झोप जी त्यानं खराब केलेली होती.

“अरे माठ्या.” मित्र चिडुन बोलला. “व्हिडिओची स्पीड कमी कर ना. एवढी फास्ट करुन काय एका रात्रीत अमेरिकेला जायचं होत का?”

तेव्हा त्याला आठवल होत की त्याने व्हिडीओ चालविण्याची स्पीड ८एक्स वर केलेली होती. त्यामुळे व्हिडीओ पाच मिनीटांनी पुढे धावत होता आणि त्या चोरांनी मिनिटाच्या आत शटर उचकटले होते. पण आतला दरवाजा लॉक असल्याने ते तसच टाकुन पळाले होते. एवढं सगळेच दोन ते तिन मिनीटाच्या आत घडलेल होत. म्हणुन फास्ट फॉरवर्डमध्ये ते दिसलेच नव्हते. तेव्हा कुठे सगळ्यांना हायस वाटलेल होत.मग एक-एक करुन सगळेच हसायला लागलेले होते.

नंतर त्याच्या मित्राने त्याच्याच घरी जाऊन त्याचा उध्दार केला नसेल तर नवलचं होत. अशा प्रकारे चोरी करणारे भुत सापडलेले होते.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Adv. Mahesh Gaikwad

Advocate

Life is so beautiful, live it, don't leave it

//