भुतकाळात डोकावताना (भाग/८)

कथा मालिका


भुतकाळात डोकावताना भाग ८

अर्चनाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. पण, पुढचे आयुष्य कसे जगणार? यासाठी ती काय करते पाहुया....

बाळाचा सांभाळ करण्यासोबतच आयुष्याची वाटचाल सुरू केली. आता तिने स्वतः ची जबाबदारी ओळखून परत शिक्षणासाठी एक पाऊल उचलले. आयुष्याच्या या वळणावर तिने एक निर्णय घेतला. नोकरी करून स्वतः च्या पायावर उभे राहण्याचा. बारावी केल्यानंतर आपला आणि आपल्या मुलाचा आई वडीलांवर भार नको म्हणून एका दवाखान्यात क्लर्कच्या नोकरीसाठी अप्लाय केला. तिच्या हुशारीमुळे तिला पटकन नोकरी मिळाली.
हळुहळु तिचा जमत बसू लागला होता. आदित्यला ती आईकडे सोडून बिनधास्तपणे नोकरी करत होती. पाच सहा वर्षांच्या प्रवासात तिने अनेक चटके सहन‌ केले. तिने स्वतः साठी छोटेसे घर विकत घेण्याचे ठरवले. त्याला चांगले शिक्षण मिळावे यासाठी ती सतत प्रयत्न करत होती.
संध्याकाळच्या आयुष्याच्या सावल्या पसरत जातात आणि पुढे अंधारात आपलीच सोबत करतात. तेव्हा मात्र मन हिरमुसले होऊन जाते. अर्चनाच्या बाबतीतही असेच काहीसे घडले. हे सगळं नीट चालू असतांनाच तो परत आला होता. तिच्या आयुष्यातून ज्याला वजा केले होते. तो परत आयुष्याची गणितं बिघडवायला आला. चांगल्या वर्तणुकीमूळे दोघांचीही पाच वर्षांतच पोलिसांनी सुटका केली.

त्यामुळे तो आता स्वतः च्या मुलाच्या कस्टडी मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागला. त्याने कोर्टाचे पत्र आणले आणि स्वतः च्या मुलाचा ताबा मागण्याचा प्रयत्न केला. पुन्हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रविण अर्चनाच्या आयुष्यात डोकावत होता.
आदित्यलाही वडीलांची उणीव जाणवत होतीच. त्याचा गैरफायदा घेत तो आपणच तुझे चांगले वडील आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करायचा. त्या लहानग्याच्या मनावर त्याचा परिणाम होत होता.‌ तो सारखे बाबा,बाबा करत होता. पण, अर्चनाने परत कोर्टात धाव घेऊन प्रविणपासून कायमची सुटका करून घेतली. प्रविणने दिलेल्या त्रासामुळे कोर्टाने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला अर्चना आणि आदित्यच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही आणि तसे करतांना आढळल्यास सक्त कारवाई करण्यात येईल. या कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार तो आणि त्याचे कुटुंब तिच्या आयुष्यातून कायमचे निघून गेले.

हळुहळु आदित्य मोठा होत होता. उत्तम शिक्षण घेऊन एका चांगल्या कंपनीत नोकरी करत होता.

ती जरी स्वतःच्या पायावर उभी होतीच. पण, प्रविण जरी तिच्या आयुष्यातून निघून गेला असे तिला ‌वाटत असले तरीही त्याचे आधीच लग्न झाले होते आणि माया देखील सोबत राहून किती त्रास देत होती हे ती विसरू शकतच नव्हती. इतके दुःखाचे घोट कसे गिळायचे.

पण, तरीही ती खंबीरपणे उभी राहिली. कुटुंबाचा आधार तिच्या साठी मोलाचा ठरला. ज्याप्रमाणे थंडीमध्ये पडलेल्या धुक्यात समोरचं दृश्य दिसत नाही. पण जसजसे उन्हाची किरणे जमिनीवर पडतात. तेव्हा कुठे स्पष्ट दिसायला लागते. तसे तिच्या आयुष्यात घडले होते. त्यामुळे ती मोकळा श्वास घेऊ शकली होती.
पण, आज बऱ्याच वर्षांनंतर मागे विसरून आलेला भुतकाळ परत नव्याने समोर येऊन उभा राहिल याची तिला कल्पना सुध्दा नव्हती. जे दुःख, जी आठवण, झालेला त्रास विसरून इतकी वर्षे जगलो. तीच आठवण ,तोच नराधम आज आपल्या दाराशी उभा आहे.

अर्चना विचाराधीन झाली. तेवढ्यात ...
आदित्य तिच्या जवळ केक घेऊन आला.
आई, केक खा ना. कुठे लक्ष आहे तुझे?

"आदित्य, मला तुझ्याशी बोलायचे आहे. हे बघ मी आज तुला काही तरी मागणार आहे आणि तू काहीही प्रश्न न विचारता माझे म्हणणे समजेल."

"आई, काय बोलते. काय हवंय तू फक्त सांग."

"तू जो ड्रायव्हर ठेवला आहे. तो मला नको आहे आणि बस बाकी काही नको."

"पण, का आई? "

"आदित्य... प्लीज मी काय सांगते ते ऐक ना!"

"आई, ठीक आहे. तुझी जर इच्छा नसेल तर मी त्यांना जायला सांगतो."

"पण, आई मला या मागील कारण काय आहे. ते कळायला हवं."

"योग्य वेळ आली की नक्की सांगेन."

अर्चना आदित्यला सांगू शकेल का? पाहुया पुढच्या भागात....

©आश्विनी मिश्रीकोटकर




🎭 Series Post

View all