भुतकाळात डोकावतांना (भाग/७)

कथा मालिका


भुतकाळात डोकावतांना भाग ७

अर्चना नर्सला काय सांगते बघुया.

पण ,नर्सने कसेबसे समजावून मायाला बाहेर पाठवले.‌ पण, त्या दोघांचेही कान भिंतीलाच. पण, ती कोणाशीही काहीच बोलणार नाही. असा धाक दिला होता.
पण ,अर्चनाने मनात विचार केला. आपण आज जर आपण तोंड उघडले नाही तर आयुष्यात कधीही बोलू शकणार नाही.आपल्याला असेच खितपत पाच दहा मिनिटांत तिने नर्सला काहीतरी सांगितले आणि मदत मागितली. नर्सने डॉक्टरला बोलावून घेतले आणि अर्चनाने आजपर्यंत घडलेली आपबिती सांगितली.

अर्चनाच्या खोलीत अचानक डाॅक्टर आल्याचे बघून ते दोघेही आत येण्याचा प्रयत्न करू‌ लागले.

"हे बघा ,मला पेशंटचे चेकअप करायचे आहे. त्यामुळे तुम्ही आत येऊ नका. असे म्हणत डॉक्टर स्नेहाने खोलीचे दार बंद केले.

"नर्स तोपर्यंत तुम्ही तिच्या आई किंवा वडील यांना बोलावून घ्या. मला त्यांच्याशी थोडं सविस्तर बोलायचे आहे.‌"
त्यानंतर डॉक्टर स्नेहाने क्षणाचाही विलंब न करता पोलिसांना बोलावले. पोलिसांना बघताच प्रविण आणि माया यांना मोठा धक्का बसला.

तोपर्यंत तिचे वडील आणि भाऊ आलेले होते. पोलिसांनी तिचे स्टेटमेंट घेतले आणि अर्चनाने आजपर्यंत घडलेली घटना सांगितली. तिने सांगितल्या प्रमाणे त्या दोघांनाही अटक करण्यात आली.


पण, आज ती तिच्या वडीलांच्या आणि दोन्ही भावांच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हती.

"बेटा अर्चू ,कशी आहेस? काय हाल करून घेतले स्वतः चे."

त्यांचे प्रेमाचे शब्द ऐकताच अर्चना त्यांच्या गळ्यात पडून खूप रडली.

"आता रडायचे नाही. आम्ही आहोत ना. तुला बरे वाटले की आपण आपल्या घरी जायचे."

" बाबा मला माफ करा. मी खरंच चुकले. त्या प्रविणच्या नादाला लागून तुमच्या पासून दूर गेले."

"पण, आता रडायचं नाही. आता आनंदाने जगायचं. तू आतापर्यंत खूप सोसलं. पण आता नाही."

"डॉक्टर स्नेहा, मी तुमचा खूप आभारी आहे. तुम्ही माझ्या मुलीची भेट घडवून दिली. आम्ही आमच्या मुलीला आज घरी घेऊन जाऊ शकतो का?"

"हो, एकदा तिची सोनोग्राफी करून घेऊ. मग तुम्ही तिला घेऊन जा. तिला खरोखरच मानसिक आधाराची खूप गरज आहे. त्यामुळे ती लवकर बरी होईल."

अर्चनाला परत घरी आणले.‌ जे आपुलकीचे नाते, जिव्हाळा, राग ,रुसवा , छोटीमोठी भांडणे होती. तिथे त्या सुरक्षित वातावरणात तिने परत नव्याने प्रवेश केला होता.

तिच्या आईला बघताच तिचा बांध फुटला. आज तिची आई व्हीलचेअरवर बसून होती.

"आई, मला माफ कर. फक्त माझ्या आणि माझ्यामुळेच तुझ्यावर‌ ही वेळ आली. मी खूप चुका केल्या आहेत. माझी तुमच्यासमोर उभे राहायची सुध्दा ‌लायकी नाही. मी तेव्हा कशी लागले कळलेच नाही.

दोघी मायलेकी एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडल्या.

" मला माफ कर आई. पण, शेजारी ,समाज..

अर्चनाला सगळ्यांनी स्वीकारले. तिच्या परत येण्याने घरात चैतन्य निर्माण झाले होते.

" हे बघ अर्चना, तू केव्हापासून हा विचार करायला लागली. अगं चुका आपल्या कडूनच होतात आणि त्या चुकांची जाणीव होणं हे सर्वात महत्वाचे. तो तुझा भुतकाळ होता. आजचा दिवस तुझा आहे. गेलेले क्षण परत आठवून काही उपयोग नाही. आता तुला मागचं विसरून नव्याने सुरूवात करावीच लागेल"

तिच्या बाबांचे हे शब्द तिच्या हृदयाला स्पर्श करत गेले.

अर्चना आणि तिच्या वडीलांच्या तक्रारी नंतर प्रविण आणि मायावर केस केली गेली. लवकरच दोघांनाही अर्चनाला त्रास देण्याच्या विरोधात कोर्टाने चौदा वर्षांची शिक्षा सुनावली गेली.
अर्चनाने आता मोकळा श्वास घेतला आणि नंतर अर्चनाने मागे वळून पाहिले नाही.‌ भुतकाळात झालेल्या चुकांची जाणीव तिला झाली होती. पण, सध्या प्रेग्नंट असल्याने आई वडीलांनी तिला खूप जपले. पुन्हा कुटुंबात परत आल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर फुलला होता. सगळ्यांच्या सहवासात नऊ महिने भराभर निघून गेले आणि तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.

पुढच्या आयुष्याची वाटचाल कशी करते ते बघुया पुढच्या भागात.....

©® अश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all