अनेक दिवस वेदिका काॅलेज मध्ये दिसली नाही म्हणून मोहन क्लासमध्ये वेदिकाला शोधतो. ती डान्सच्या स्पर्धांकरता मुंबई ला गेली आहे. स्पर्धा संपून काॅलेमध्ये आल्यावर मोहन वेदिकाला भेटतो.
मोहन : गीताला भेटायला तुला घेऊन जायचे मला. तू सांगितल्याप्रमाणे मी तिच्याशी बोललो. तिला तुझ्याशी भेटण्याची इच्छा होती. मी तुझ्या क्लासमध्ये चौकशी केली. तेव्हा डान्सच्या स्पर्धेबाबत कळाले मला.
वेदिका: सांगायचे राहिले तुला. काॅलेजचे पेपर चालू असतानाच डान्सची प्रॅक्टिस सुरु होती. पेपर झाले आणि लगेच स्पर्धांकरता मुंबईला जावे लागणार होते.
कधी भेटायचं आहे गीताला?
मोहन : तुला आज जमणार असेल तर नक्की भेटूया.
तसे मोहनने वेदिकाला एक गोष्ट सांगायला सुरवात केली. गीता आणि मी जवळच राहायला असल्याने लहानपणापासूनच सोबती आहोत. गीताच्या आजीने लहानपणीचं आमचं लग्न लावले होते. एका कार अपघातात गीताला स्वत:चे डोळे गमवावे लागले. तिच्या हसत्या खेळत्या आयुष्याला कोणाची तरी नजर लागली होती.
गीताच्या वडिलांनी त्या गाडीचा नंबर गीताला शेवटच्या क्षणी गीताच्या कानात सांगितला. त्याक्षणी गीताची अवस्था भयानक होती. तिला आजूबाजूला काहीच दिसत नव्हते. वडिलांच्या आवजाच्य दिशेने सरकत गीता वडिलांजवळ पोहचली.
गाडीचा नंबर ध्यानात ठेवला. पोलिस केस केली. पोलिसांनी तो नंबर शोधून देखील काढला. पण गीताने केस मागे घेतली.
वेदिका : आई-वडिलांच्या मूत्यूचा बदला घ्यावा असे नाही वाटले का गीताला.
तो नंबर दुसरा तिसरा कोणाचा नसून तिच्याच वडिलांच्या गाडीचा असतो. तेव्हा वडिलांनी गाडीचा नंबर घाईत का बदलून घेतला असेल याचे उत्तर वेदिकाला सापडते.
मोहन : घटनेच्या दुस-याच दिवशी तुझे वडिल तुला काॅलेजला सोडायला आले तेव्हा तो नंबर माझ्या डोळ्यांना दिसला. मी संध्याकाळी तुझ्या घरी आलो तेव्हा खात्री पटली की ती गाडी तुमचीच होती.
वेदिका : एवढ सगळं होवून तू एका शब्दाने देखील माझ्याशी बोलला नाहीस. याचे कारण काय असेल जाणून घेवूया अंतिम भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा