भूलले तुझ्या प्रितीला भाग - २

प्रेमाचा उलगडा वेळ निघून गेल्यावर कळतो.

वेदिकाने सांगितल्याप्रमाणे मोहन वेदिकाला भेटायला आलाचं नाही. शिवाय काॅलेजलाही चार-पाच दिवस आलाच नाही. वेदिकाने मोहनच्या क्लास मधल्या काही मुलांना मोहन का येत नाही याचे कारण विचारले. पण कोणालाच न सांगता मोहन अचानक गैरहजर राहिला होता. 

आठवड्याचा कालवधी उलटून गेल्यावर मोहन आज भेटूया असे वेदिकाला सांगतो. वेदिका आनंदाने वेडिपिशी होती. आपल्यावर असणाऱ्या प्रेमाची कबुली आज मोहन नक्की देणारं या आनंदात वेदिकाने आज नविन ड्रेस, मेकअप, मोत्याचे झुबके कानात घातले होते. नक्षत्रा सारखी चमकून दिसत होती आज वेदिका. वेदिकाला पाहताचं आज काय विशेष दिवस आहे का? वाढदिवस आहे का तुझा? असे देखील विचारले.
यातले काहीच नसून मनाला झालेला आनंद चेह-यावरुन ओसांडून वाहत असल्याचे वेदिका सर्वांना सांगत असते. अखेर मोहन आणि वेदिका समोरासमोर येतात. वेलिकाला नटलेलं पाहून. छान दिसतेसं आज असे मोहन बोलला. वेदिका लाजेने गहिवरली. तिला काय करावे सुचत नव्हते. मोहनच्या बोलण्याने अंगावर रोमांच दाटले गेले. ज्या गोष्टी ऐकण्यासाठी मन आतुर झालं आहे ते आता मोहन बोलणार आहे. हाताच्या बोटांनी ओढणीला हळूच भिरकवत वेदिका मोहन समोर उभी होती.


वेदिकाची तगमग मोहनने अचूक हेरली होती. वेदिकला कितीही वाईट वाटले तरी आज हि गोष्ट सांगणे हिताचे आहे. नाहीतर गुरफटत राहून एकदम न पचणारा धक्का वेदिका पेलवू शकणार नाही. त्यापेक्षा हिच योग्य संधी आहे. हे जाणताचं.

मोहन : माझं एका मुलीवर जिवापाड प्रेम आहे. पण तिला कसं सांगू तेच समजतं नाही.

वेदिका : बोलून दाखवायचं. त्या मुलीलाही कळायला हवं ना तुझं तिच्यावर किती प्रेम आहे.

मोहन : पण तिनं त्याचा चुकीचा अर्थ काढला आणि मला कायमची दूर झाली तर?

वेदिका : कोण वेडी आहे जी तुला नाही म्हणेन. 


मोहन : तिला मी दया दाखवतो असे तर नाही ना वाटणार.?


मोहनच्या या प्रश्नाल थोडी वेदिका चपापते. आत्तापर्यंत हा आपल्यालाच प्रेमाची कबुली देतो असे वाटत होते. मग यात दया कुठून आली??
वेदिकाने प्रश्नात्मक चेह-याने मोहनकडे पाहिले.

मोहन : अग आमच्या घराजवळच गीता माझी बालमैत्रिण राहते. तिचं मला माहित नाही. पण माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. तिला बोलू तरी कसं हे सुचतं नाही.

हे ऐकून वेदिका स्तब्ध झाली. डोळ्यात नकळत अश्रू दाटून आले. मागे वळून आपले डोळे पुसत वेदिका मोहनला सांगते. आत्ता जसं मला बोलला तसेच गीताला बोल. ती तुला नाही बोलणारचं नाही.

मोहन : तू म्हणते ते खर आहे. मला तुझ्या समोर बोलायला काही नाही वाटलं. तू तर माझी मैत्रिण आहे.


वेदिका आपण उद्या भेटूया तेव्हा मी कसं बोलायचं ते सांगेन तुला. चल बाय निघते आता मी. आज बाहेर जायचे आहे. तु भेटायला बोलावले म्हणून आले मी.

मोहन : भेट नक्की उद्या.

वेदिका : काॅलेजच्या मागच्या गेटपाशी एका झाडाच्या कट्यावर आपले अश्रू पुसत बसते.हव तेवढं मनमोकळेपणाने रडून घेते.


डोळ्यावर पाणी मारुन वेदिका घरी निघून जाते.आपलं प्रेम एकतर्फी होते. नाटकात घडलेलं क्षण, एकत्र बसून खाल्लेला डबा, आईला हट्टाने मोहन करता बनवून द्यायला लावणे. सगळे क्षण डोळ्यासमोरुन निघून जातात. आपलं प्रेमं मनात जपतं वेदिका स्वत:ला अभ्यासात गुंतून घेते. डान्सच्या शहरात होणा-या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली.

वेदिकाचं आयुष्य कोणत्या प्रकारे वळण घेणार आहे ते पाहूया पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all