भुक
सकाळी सात वाजले असतील,वस्तीच्या चाैकात काही महीला रांगेत बसुन होत्या.त्या मधे ती पण होती. वय चाळीशी च्या पेक्षा जास्त असावे. लाल भडक रंगाची साडी, जरीकाम केलेले चमचमते ब्लाऊज, केसांचा जुडा. मोठी लाल टिकली कपाळावर लावलेली ,दिसायला सुंदरच असावी. पण ते साैदर्य कोमजलेल होत .डोळे खोल गेलेले दिसत होत.चेह-यावर थकवा दिसत होता.खुप दिवसाची ऊपाशी वाटत होती.रांगेतील दुसरी तीला म्हणाली. आलीच की आज, आधी आले असते तर चारपाच दिवस ऊपाशी नसते राहावे लागले. येतील ग बाई बारा वाजे पर्यत ती माणस.गाडीने येतात सोबत जेवणाचे पाकीट असतात. अंतर राखुणच देतात,फोटो काढतात . कसा रोग आहे कुणास ठावूक? माणसच माणसाला घाबरतात दुर राहतात.
…… तीचे बोलणे ऎकुन हिच्या डोळ्यात अंधारी आली दोन्ही हातांनी डोळे झाकुण घेतले.दोन पायात डोके घालुन बसली. तशीच तीच्या पोटात भुकेची कळ उठली. अजुन चारपाच तास अन्नचा घासही मिळणार नव्हता.भुक असह्य झाली होती. बाकी बायका रोजच येत होत्या. पण हिच्या मनाला ते पटत नव्हते.पण आज ईलाजच नव्हता. घरात काहीच नव्हते. तीन दिवसापासुन काहीही खाल्ले नव्हते. एक महीण्यापासून कोणी गि-ह्राईक पण भेटले नव्हते .कोरोणाच्या भितीने.
आजच्या भुकेने तीला पंचविस वर्षे आधिची ती भयाण रात्र आठवली.या पोटातील भुकेची आग विझवण्यासाठी ती या वस्तीत येवून पोहचली होती.लोकांच्या शरीराची आग विझवत होती.ज्या भुकेन तीला रस्त्यावरून वस्तीत आणल. त्या भुकेन तीला आज पुन्हा रस्त्यावर याव लागल हे तीची मर्जी नव्हती तर मजबुरी होती.कुणाच्या उपकारावर जगणे तीला पसंत नव्हते म्हणुन आपला देह विकून स्वभिमाने तिने आपल्या बहीणीची व आपली भुक भागवण्याचा निर्णय घ्यावा लागला.पण या सर्व गोष्टी पासुन तीने आपल्या बहीणीला अलिप्त ठेवल होत.नोकरी करून पैसे पाठवत आहे अस सांगुन तीच थांबलेल शिक्षण परत सुरू केल होत.
खाली मान घालून जेवन येण्याची वाट पाहत असतांना मागील सारा भुतकाळ तीच्या डोळ्यासमोर येवू लागला. त्या दोघी बहीणी सकाळीच शाळेत गेल्या होत्या. आई बाबा बांधकामावर गेले होते.शाळेची मधली सुटी झालेली होती ती शाळेच्या फाटकाजवळ उभी राहून फाटकाबाहेरील मुलांना बघत होती.ते मुलमुली चाकलेट, गोळ्या कुल्फी खात होते.तेवढ्यात शेजारचा ऎक माणुस घाईन तीच्या जवळ आला. लवकर घरी चल म्हणाला. ती जायला तयार नव्हती पण तो म्हणाला तुझ्या आईचा निरोप आहे. तशी ती शाळेच दप्तर घेवून घरी आली. घराजवळ लोकांची गर्दी जमली होती. त्या छोट्याशा घरासमोरच्या अंगणात तीच्या आई,बा ला ठेवण्यात आल होत. ते बघुन तीने हंबरडा फोडला. सारख त्यांना हलवून उठवत होती. पण ते तीला सोडून कायमचे गेले होते. काय झाल म्हणुन ती प्रत्येकाला विचारत होती. कुणीच काही सांगत नव्हते ती परत आईजवळ येवून तिला हलवत ऊठवू लागली. तीच्या अंगावर डोक ठोवून हुंदके देत होती. तिच्या खांद्यावर कुणाचा हात जाणवला तीने वळुन पाहीले. तो ऎक ऊंच, धिपाड व्यक्ती होता.डोळ्यावर काळा चश्मा लावलेला, गळ्यात मोठी जाड सोण्याची चेन. ती चेन तीने आधीही पाहीलेली होती.आई सोबत विटा वाहायला गेली होती तेव्हा ह्या माणसाला तिथे पाहीले होते. तिथे सारे जन याला साहेब म्हणत होते.ती त्याला विचारू लागली काय झाल माझ्या आई, बा ला. त्याने तीला ऊठवत सांगितले कि कामावर ऎका ईमारतीचा स्लाप पडला त्या खाली दबून काही मजुर जखमी झाले,त्या मध्ये तुझे आई बाबापण होते.पण त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे ते मरण पावले.हे ऎकुण ती बेशूध्द झाली.तीला सावरण्यासाठी त्याने हात पुढे केला तीचे डोके त्याच्या छातीवर टेकले तिची छाती त्याच्या दंडावर टेकली तशी त्याच्या शरीरात ऎक विज चमकली तो एका वेगळ्याच नजरेन तिला पाहात होता,तेवढ्यात पाण्याचे थेंब त्याच्या चहर्यावर पडले तसा तो भानावर आला. ऎका म्हतारीने तिच्या तोंडावर पाणी शिंपडले होते.ती थोडी शुद्धित आली . .जखमी मजुरही आले होते. कुण्याच्या हातापायाला तर कुणाच्या डोक्याला पट्या बांधल्या होत्या.मालका विरूद्ध रिपोर्ट करण तर दुरच पण त्यांना जाब विचारण्याची पण हिमत कोणात नव्हत.काम गेल तर काय विचाराणे सगळे गप्पा होते त्याच्या दवाखाण्याच बिल पण मालकच तर देणार होते.तरी या दोघाच्या जाण्याने त्याचे चहरे खुप दुखी होते,डोळे सारखे आसव गाळत होते.त्यातील काही माणसे पुढे आले अंतिम विधिची तयारी केली. शाळेतिल काही मुली तिच्या बहीणीला घेवून आल्या होत्या. ती हीला घट्ट धरून सारखी रडत होती. तिच्या आई बा चे एकत्रच दहण झाले. सारे जण निघुन गेले.त्या दोघी बहीणी खिन्नपणे घराला पाहात होत्या.तेवढ्यात गाडीचा आवाज आला. गाडीतुन तेव्हाचा तो साहेब खाली ऊतरला यांच्या जवळ आला. तुमचे काही सामाण घ्या व माझ्यासोबत चला म्हणाला.कोसळलेल्या दुःखाने विचार करण्याची शक्तीच संपली होती.मनात कुठलीही शंका न घेता ती आपल्या बहीणीसोबत त्याच्या गाडीत बसली. अशा गाडीत ती पहील्यांदाच बसली होती.एसीची थंड हवा अंगावर आली.दुःखा सोबतच आता भुकेमुळे ग्लाणी आली लहान बहीनही हीच्या मांडीवर डोक ठेवून झोपली होती. . गाडी थांबली तशी ही ऊठली त्याने घर ऊघडू दिल. मी येतोच सांगुन तो गाडी घेवून बाहेर गेला.
त्या दोघी आत आल्या दोन खोल्या व एक स्वयंपाकघर होत घरात एकट्या माणसाचेच सामान होते. टेबलावर एक फोटो फ्रेम होती, त्या मधे साहेब एक बाई व एका मुलाचा फोटो होता. ते त्यांच कुटूब असाव सगळीकडे नजर फिरवून ती सोबतच गाठोळ घेवून बसली.त्या मधुन तीने एक फोटो काढला त्यामधे तीचे आई बाबा व त्या दोघी बहीणी होत्या .त्या वरून हात फिरवतांना तिचे डोळे भरून आले.एका यात्रेत खुप दिवसा आधी काढलेला तीच्या कुटूंबाचा तो फोटो होता.थोड्या वेळात तो साहेब आला त्याने आणलेल पार्सल तीच्या हातात दिल तेव्हा तीला वेगळाच वास आला. मी खाल्ल आहे तुम्ही खाऊन घ्या म्हणाला.तीने ते ऊघडल बहीणीला दिल तीला खायची ईच्छाच होत नव्हती. पण बहीणीसाठी एक घास तोंडात टाकला, मी खाते तु पण खा म्हणाली तशी ती जेवली. हीला भुक लागली होती पण घास घशाखाली जातच नव्हता. हात धुवून.,कचरा आवरून आली तर बहीण तिथेच झोपी गेली होती. ही भीतीला टेकून बसली. डोळे झोपेने जड झाले होते, तसा तिला साहेबाचा आवाज आला ते तिला बोलवत होते. ही आत डोकावून पाहीले ते पलंगावर ऊशीला टेकून बसले होते. ऎ नाव काय तुझ, पाणी आण बर,ही वळली व स्वयंपाक घरात आली. माठातील पाणी घेवून ती त्यांना दिले. वापस यायला निघाली तसा त्याने तिचा हात पकडला.पाण्याची तहान तर भागवली पण दसरी तहानपण भागवण अस म्हणुन त्यान तीचा हात आेढला. तशी ती बेडच्या कोपर्यावर आदळली.तो मादक नजरेने तीला पाहु लागला. ती खुप घाबरला, अशी नजर तो किडसवाण्या स्पर्शाने तिचे शरीर गार पडले.सर्व शक्ती एकवटुन तिने सुटण्याचा पर्यत्न केला. पण त्याने आणखी घट्ट तीचा हात धरला. ती रडायला लागला.शक्य तसा विरोध करत होती. पण त्याला दारू, व वासनेची नशा चढली होती. ती कोवळी पोर किती सहण करणार,थोड्या वेळात तीची झटपट थांबली.खोलीत कितीतरी वेळ नुसता तीच्या कन्हण्याचा आवाज येत होता,ती वेदणेने विहळत होती.कशीतरी ऊठली. घसाला कोरड पडली म्हणुन पाणी प्यायला गेली.तिला धड चालताही येत नव्हते. रस्त्यात अडकुण पडली. खाली तीची बहीण झोपली होती.तिच्याच पायाला पाय अडकला होता.तिने पटकण बहीणीला ऊठवले. एक वेळ आत डोकावुन पाहल तो बेडवर पालथा झोपला होता.नशेच्या धुंदीत तो झोपला होता.ती बहीण काही विचारत होती पण काही न बोलता ती तिला आेढतच चालत होती.बराच वेळ त्या चालतच होत्या. सकाळी अंधारतच त्या एका झोपडीजवळ आल्या तिने बहीनीला सांगीतले सकाळ झाली ते लोक ऊठले की तु त्याच्या घरी जा.आईची दुरची बहीण आहे ती ,आईसोबत मी आली होती एकदा ईथे त्याना आई बाबा वारल्याच सांग त्या देतील तुला सहारा. आणी ताई तु कुठे निघाली म्हणत ती रडायला लागली पण हीने लक्ष दिल नाही.कुणावर कस अवलंबुन राहणार, पोटाला भुक तर लागणारच ,ती कशी भागवणार या सगळ्या प्रश्नांनी डोक्यात काहुर माजल होत. घडल्या प्रकाराने तिला स्वताच्याच शरीराच किडस येत होता.उजडण्या आधि ईथून निघायला हव म्हणुन ती चालू लागली.बहीण ताई ताई म्हणुन आवाज देत होती. काळजात कालवाकालव होत होती.कुठ जायचे, काय करायचे काहीच माहीत नव्हते. दिवस असाच फिरण्यात गेला. दिवसभर काहीच खाल्ल नव्हते. अंधार पडायला आला होता. आता ती एका बस थांब्यावर बसली होती.खुप थकली होती सर्व अंग ठणकत होत.सर्व अंग आवळुन पायावर डोक ठेवून बसली होती.बाजूला दोन मध्यमवयाच्या बाया बसल्या होत्या. बस आली तशा त्या ऊठल्या,जवळ आल्या कुठे जायच विचारू लागल्या.कुठे नाही,कुठे नाही,घाबरून सांगु लागली.त्याच्या नजरेन हे वाट चुकलेल पाखरू हेरल.बस आली त्या तीला चढायला सांगत होत्या,पण माझ्याजवळ पैसे नाहीत म्हणत ती उतरू लागली.मी काढते तुझ तिकीट म्हणत एकीने तीचा हात पकडला व बसमध्ये बसवल.सकाळी त्या तीला या वस्तीत घेवून आल्या होत्या.रोज तीचा साैदा होत होता.पोटाला अन्न मिळत होत.पण या कोरोणा मुळे कुणी ईकडे फिरकलच नव्हत.भुकेने परत पोटात कळ आली.तशी ती विचारचर्करातुन बाहे्र आली.
तेवढ्यात जेवण घेवून येणार्या दोन गाड्या आल्या.त्यांना कसलेतरी ब्याॅनर लावले होते, गाड्या थांबल्या तशा सर्व महीला जेवन मिळवण्यासाठी गर्दी करत होत्या .चारपाच तास वाट पाहुन भुकेमुळे त्यांच्या संयमाचा बांध तुटला. प्यास्टीकच्या पिशवित भाजी आणी पेपरमधे रोल केलेल्या पोळ्या मिळत होत्या.हिच्या हातात अन्न देतांना त्यांनी फोटो काढले तिला ते कसेतरीच वाटले,मनातच पुटपुटली भिकारी नाही हो आम्ही, मजबुर आहोत. तिचे डोळे भरून आले.घरा जवळ आली,हात धुतले. जेवण्यासाठी पेपरमधिल पोळी काढल आणी खावू लागली.खाताखाता तिच लक्ष पेपरवरील जाहीरातीवर गेल.नर्स,वार्डबाय साठि भरती होणार होती.एका सामाजिक संस्थेने या महीलांना रोजगार मिळावा म्हणुन काही प्रशिक्षण शिबिर चालवले होते.तेव्हा हिचे नर्सचे प्रशिक्षण झालेले होते.ते आठवुन तिने हात धुतला ,पेपरमधिल जाहिरात लक्षपुर्वक वाचली.मोबाईल घेतला व आॅनलाईन अर्ज केला.आठ दिवस असेच निघुन गेले, कधी उपाशी तर मिळाले काही तर कधी अर्धपोटी जेवून दिवस काढत होती.वस्तितील काहींना कोरोनाची लागण झाली होती. वर्दळीच्या रस्त्यावर शुकशुकाट होता.तिने मोबाईल पाहीला तिच्या अर्जाला उत्तर आले होते.आजच तिला काही प्रशिक्षण दिले जाणार होते. ती बाथरूमध्ये गेली आंघोळ करून तयार झाली.सांगितल्या प्रमाणे दहा वाजता एक गाडी तिला घ्यायला आली.त्यात काही नर्स होत्या त्यानी हिची प्राथमिक तपासणी करून सोबत येण्यास सांगीतले.दोन दिवसाचे प्रशिक्षण दिले .आता तीला एका दवाखाण्यात नोकरी भेटली होती.
. ती मन लावून काम करत होती.रात्रं -दिवस रुग्णांची सेवा करीत होती, ते ठिक होवून घरी जात होते. जातांना हिने केलेल्या सेवेचे खुप काैतुक करत. त्यांना बर होवून जातांना सर्वाना खुप आनंद व्हायचा. पण केव्हा निराशा पण पदरी पडत होती. सर्व डाक्टर, नर्सेस जिवाची पर्वा न करता राबत होते.रोगच असा भयंकर आला होता त्याने सर्व जगालाच विळखा घातला होता त्या प्रसार असा होता की पेशंन्ट सोबत कुणी घरच पण येवू शकत नव्हत.त्यांची सर्व काळजी नर्ससेलाच करावी लागे.त्यामध्ये सर्व वयोगटातील पेशंन्ट असायचे,अगदी काही महीण्याच्या बाळा पासुन तर अगदी म्हातारी झालेले.सर्वाची सेवा ती खुप प्रेमाणे करायची ईथेच तिला सगळे नाते मिळाले होते. ती कुणाची लेक,कुणाची ताई तर काही चिमुकल्यांची आईपण झाली होती.ज्या शरीराचा तिला कीळस यायच, ज्या जगण्याचा तिला वाट आला होता तेच शरीर आज धंन्य झाल्याचे वाटत होते.रुग्ण सेवेला तीने स्वःताला अर्पण केले होते. त्या बदनाम वस्तीतील ती भयानक काळ रात्र संपुन तिच्यासाठी एक प्रसन्न पहाट झाली होती.
कथा पुर्ण काल्पनिक आहे
पुष्पा प्रमोद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा