भूत बंगला - ५

Its a series of episodes of the haunted house, and the events happened in the past regarding that house.

'हे प्रसंग काल्पनिक असून त्याचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही, असे आढळ्यास निव्वळ योगायोग समजावा.'

मागील भागात :- पटनाईक श्री आणि शशि  ला आपापला प्रॉपर्टी चा वाटा देण्याचं ठरवतात. शशि त्याच्या बाबांना भेटण्याचे ठरवतो. शशि भेटून गेल्या वर पटनाईकांचा मृत्यू होतो.

आता पुढे .... 

 पटनाईक गेल्याच्या १ वर्षा नंतर .... 

शारंगधर पटनाईक गेल्या नंतर श्री आणि शशि मध्ये बऱ्याच वेळा वाद झाले त्या कारणास्पद ते वेगळे राहू लागले. शशि त्याच्या वडिलांच्या घरी राहत होता तर श्री आपल्या पत्नी सह भाड्याच्या खोलीत राहू लागलेला. 

एके दिवशी श्री शशि कडे येतो सोबत त्याची पत्नी ही असते. ते पोहोचतात तेव्हा  तेथे खान, पटनाईकांचे मित्र आलेले असतात... श्री तेथे शशि ला विनंती करायला येतो की आत्याला आणि त्याच्या पत्नी ला त्यांच्या घरात राहण्याची परवानगी द्यावीकारण त्याची पत्नी गरोदर आहे पण हे ऐकण्या आधीच शशि आणि खान श्री आणि त्याच्या पत्नीला हाकलवून लावतात. 

(ह्या कथेच्या भाग -२ मधील घटना)

श्री आपल्या पत्नी सह काही दिवसांनी पुन्हा शशि कडे येतो, तेव्हा तो काही कागदपत्र आणि एक रिव्हॉल्वर घेऊन येतो सोबत... 

" दादा मला तुझी सही हवी आहे ह्या कागदांवर"

कसले रे कागद ह्यात लिहले आहे की तू हे घर आमच्या नावावर करत आहेस. 

"काय! आता तुला हे घर बळकावायचे आहे! चालता हो इथून"

" दादा बऱ्या बोलण्याने ह्या कागदांवर सही कर नाही तर ह्याचे परिणाम वाईट होतील" 

"श्री तू जा इथून समजत नाही तुला मी बोललो ते!"

"दादा " श्री रिव्हॉल्वर काढतो

"तू मला मारणार, अरे मार ना मग मी पण बघतोच तू मला कसा मारतोस ते"

 त्या दोघं मध्ये हातापाई होते... तेव्हा श्वेता म्हणजेच श्री च्या पत्नी ला चुकून गोळी लागते. 

"श्वेताSS नाही" श्री किंचाळतो. 

शशि तसाच थबकतो .. तो सुन्न होऊन झालेला प्रकार पाहत असतो. 

" दादा तू हे काय केलंस! माझ्या श्वेता ला चक्क मारून टाकलंस आणि सोबत तिच्या पोटातल्या बाळा ला पण. मी आता तुला सोडणार नाही.अरे हो पण मला तुझी सही हवी आहे ह्या कागदांवर ती दे मग तू जा कुठे जायचे ते जेल मध्ये जा किंवा स्मशानात हाहाहा!" श्री ला वेड लागल्या सारखे तो बोलू लागतो. 

श्री शशि  ला धक्का मारून खाली पाडतो आणि त्याच्या मानेवर पाय ठेवून उभा राहतो. तितक्यात शशि ची पत्नी त्याच्या बाळासह खाली कसला आवाज आला म्हणून बघायला येते. 

" या या वाहिनी बाई, बरे झाले तुम्ही ही आलात"

" आहो हे काय चालू आहे तुमच्या दोघांचे! भावजी सोडा त्यांना" 

" शितल जा इथून तू, प्लिज ऐक माझं" दबक्या आवाजात.

" अरे हो! बरोबर बोललात तुम्ही तुम्हालाच आता वर पाठवलं पाहिजे बघा तुमच्या नवऱ्याने काय केले माझ्या श्वेता ला"

" शितल जा इथून तो तुला आणि श्रावण ला मारून टाकेल"

" वाह ! दादा स्वतःच्या कुटुंबावर आले तर घाबरलास काय! घे मग त्यांना ही  मी श्वेता आणि बाबांजवळ पाठवतो" आणि दोन गोळया झाडून शितल आणि श्रवण  ला मारून टाकतो. 

" शितल नाहीSS श्रवणSS अरे नराधमा काय केलंस तू" श्री त्याच्या माने वरचा पाय काढतो. 

"जा तुझ्या बायको आणि बाळा ला शेवटचं बघून घे" श्री त्याच्या कॉलर ला धरून उठवतो त्याला आणि त्याच्या पत्नी कडे नेतो आणि त्याच्या मृत पत्नी पाशी ढकलतो त्याला शशि खाली पडतो..

" सही कर लवकर ह्या कागदांवर"श्री त्याच्या खिशातला पेन शशि वर फेकतो. आणि शशि ला गोळी झाडतो ती त्याच्या  डाव्या हाताला लागते. 

" आSS माझे आता कुणी नाही ह्या जगात घे तू सर्व" शशि सही करतो. 

" अरे थांब दादा तू इतक्यात जाऊ नकोस, तुला काहीतरी सांगायचे आहे. तू जायच्या आधी तर तुला हे कळलेच पाहिजे, तुला माहितीये त्या दिवशी तू बाबांना भेटायला त्यांच्या खोलीत गेला होतास तेव्हा मी तुला आत जाताना पाहिले होते, मला काही तरी गडबड वाटली म्हणून साठेंना गाडीत बसवून मी पुन्हा आत आलो, सगळं ऐकलं मी तुमचा संभाषण, हाहाहा! आणि तू गेल्या नंतर मी बाबांना भेटायला गेलो तेव्हा मी त्यांना सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करायला सांगितली होती पण ते काय काय बडबडायला लागले, शशि बरोबर बोलला होता तू तास नाहीस जसा दाखवतोस, वगैरे वगैरे.. त्यांनी सर्व माझ्या नावावर करायला नकार दिला, म्हणून मला प्रचंड राग आला आणि मी त्यांचा ऑक्सिजन काढून टाकला. आणि बाबा स्वर्गात गेल्या वर मी तो पुन्हा त्यांच्या नाकाला लावला"

" अरे काय केलंस तू हे पापी माणसा! तू चक्क बाबांना... " शशि ला रडू कोसळते. 

" अरे तेवढेच नाही तर साठे काकांना  पण त्यांच्या जवळ पाठवले, चायला सारखे काना माघे किरकिर करत होते. मला प्रत्येक गोष्टीला उपदेश देत बसायचे, एक दिवशी लोणावळ्याला मीटिंग ला गेले असताना त्यांना कळले कि बाबांचे टेंडर मीच फिरवले आणि ते तुला सर्व सांगायला येणार होते. म्हणून त्यान्ना तिथेच लोणावळ्याच्या दरीत फेकले." 

"काय तू टेंडर फिरवले! आणि साठेंना सुद्धा मारले! अरे तू देवा च्या वेषातला राक्षस निघालास रे! आता फोन करतोच पोलिसांना!'

तो धडपडत उठत होता की तितक्यात श्री त्याच्या वर गोळी झाडतो. आणि तितक्यात खान तेथे थबकतो झालेला प्रकार पाहून तो घाबरतो आणि धाव घेतो, गाडीत बसतो आणि गाडी पळवतो त्याच्या माघे श्री ही आपली गाडी घेऊन त्याचा पाठलाग करतो. खान रस्त्यात त्याची नजर चुकवून घामेघूम झालेला, छाती धधडत्या अवस्थेत त्याच्या घरी पोहोचतो.. 

"आलात तुम्ही!"

"शिरीन सबसे पहले सब दरवाजे बंद कर और खिड़कियाँ  भी बंद कर"

"पर जनाब सुनिए तो.. आपसे मिलने..." 

" आपण सगळं नंतर बोलू शिरीन तू पहिले मी सांगतो ते कर" 

" अरे पर श्री आया है।"

"क्या! किधर हैं वो और तुम ठीक हो ना"

"हाँ मैं ठीक हु, वो गॅरेज में बैठा है"

"तुमने यह पहले क्यों  नहीं बताया!"

"मैं कबसे आपको वही बोलने की कोशिश कर रही थी." 

"ठीक हैं,तुम यहीं रुको! बाहेर येऊ नकोस मी बोलावल्या शिवाय"

" हां ठीक हैं।"

खान गॅरेज मध्ये जातो तेव्हा श्री खुर्ची वर बसून त्याच्या समोरच्या टेबल वर दोन्ही पाय ठेवून ते एकमेकांना टकटक करत बसला होता आणि त्याच्या हातात रिव्हॉल्वर असते त्यात तो गोळ्या भरतो आणि त्याचे बुलेट चक्र गोल फिरवत असतो..खान थरथरत्या अंगाने तेथे पोहोचतो... 

" तू इथे का आला आहेस"

" अरे! तुम्ही सगळं ऐकलं ना खान चाचा म्हणून मला इथे यावे लागले"

" मैं कुछ नहीं जानता, मैंने कुछ नहीं सुना, मुझे बक्श दो"

" ऐकलं कसे नाही पाहिले तर ना दादा ला मारताना मला रिस्क नाही घ्यायची"

श्री खान वर गोळी झाडतो.. गोळी चा आवाज ऐकून शिरीन पळत बाहेर येते आणि श्री तिला ही मारून टाकतो. आणि दोघांना त्यांच्या गॅरेज मध्ये पुरतो.

🎭 Series Post

View all