Login

भोळा शंभो

भोळा शंभो (अभंग रचना)

अभंग रचना


*शिर्षक- भोळा शंभो*

भोळा शिव शंभो
पावतो भक्ताला
धावून हाकेला
येतो सदा//१//

कैलासात त्याचे
आहे रे निवास
मनी माझ्या ध्यास
दर्शनाचा//२//

बारा जोतिर्लिंगे
मंदिर शिवाचे
विविध नावाचे
देवस्थान//३//

महादेव आहे
पार्वतीचा पती
पुत्र गणपती
नि कार्तिक//४//

महादेवा शिरी
गंगा जटेमध्ये
नाग गळ्यामध्ये
शोभे छान//५//

करुनी प्राषण
विषाचा तो प्याला
निलकंठ झाला
शंकर हा//६//

उघडतो जेव्हा
तिसरा तो डोळा
हालतो सगळा
भुतल हा//७//

दैत्यांचा तो देव
नंदी हे वाहन
प्रथम पूजन
नंदीचेच//८//

आवडते त्याला
बेलाचेच पान
दुधाने न्हाऊन
अभिषेक//९//

-------------------

सौ.वनिता गणेश शिंदे©®

🎭 Series Post

View all