भित्यापाठी ब्रह्मराक्षस

HOD of the family welfare.

"भित्यापाठी  ब्रह्मराक्षस"
©सौ. सुचिता वाडेकर...✍️

"भित्यापाठी ब्रह्मराक्षस" एखाद्या गोष्टीची जेव्हा आपल्याला प्रचंड भीती वाटते त्यावेळी ती आपल्या सोबत प्रत्यक्ष घडली आहे किंवा घडेल असे चित्र आपण पहात असतो.. म्हणजेच तसे विचार आपल्या मनात येतात आणि आपली भीती प्रचंड वाढते.. 

पण तुम्हाला हे माहीत आहे का.. या भीतीला पळवून लावण्याचे समर्थ्य आपल्या विचारात असते.. यासाठी मानसिकता देखील तितकीच महत्वाची ठरते. विचार आणि मानसिकता यांचा खूप जवळचा संबंध आहे. तुमचे विचार तुमची मानसिकता बदलू शकतात.  
आपण उदाहरण पाहूयात..  

सर्वांना माहीत आहे की कोणत्याही आजरात ऍलोपॅथी ने त्वरित आराम मिळतो. आयुर्वेदिक उपचार केले असता थोडा वेळ लागतो पण उपाय नक्की होतो आणि होमिओपॅथीमध्ये जास्त वेळ लागतो पण अगदी जुनाट आजार देखील नाहीसा करण्याची क्षमता त्याच्यात आहे.

असे असताना देखील अर्सेनिक गोळ्यांच्याबाबतीत 3 दिवस 2 गोळ्या घेतल्या की प्रतिकारशक्ती वाढते आणि कोरोना होत नाही.. या विचारावर आपण विश्वास ठेवून त्या गोळ्या घेतो.. किंवा 'वाफ घ्या.. काहीही होणार नाही' असे म्हणतो.. ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो.. 'हे काय आहे..' एक प्रकारे या विचाराने आपली मानसिक शक्ती वाढतेय.. म्हणजेच कोरोना सोबत लढण्याचे खरे सामर्थ्य प्रत्येकाच्या विचारात आहे. 

एखाद्या गोष्टीची जेव्हा आपल्याला प्रचंड भीती वाटते त्यावेळी ती घटना आपल्या सोबत प्रत्यक्ष घडली आहे किंवा घडेल असे चित्र आपण पहात असतो.. म्हणजेच तसे विचार आपल्या मनात येतात आणि आपली भीती प्रचंड वाढते.. आणि कालांतराने तसे घडते देखील म्हणून घाबरून.. नको त्या विचारांना नकळतपणे खतपाणी घालून वाढवण्या ऐवजी सकारात्मक विचार करूयात.  

शक्य तेवढे आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय देखील करूयात.. पोषक व ताजा आहार घेऊयात.. रोज व्यायाम करूयात..  अगदीच नाही जमले तरी ओंकार, 12 सूर्यनमस्कार घालूयात.. प्राणायाम, कपालभाती अनुलोमविलोम करूयात... शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य देखील तितकेच महत्वाचे आहे.. जमल्यास ध्यानधारणा करूयात.. याने मानसिक आरोग्य उत्तम राहील आणि सकारात्मक विचार देखील वाढीस लागतील.. नकारात्मक विचार आले तरी त्यांना झटकून टाकणे सोपे जाईल.   

जे घडणार असेल ते चुकणार नाही.. काळजी घेणं आपल्या हातात आहे.. पण त्याचा सामना करण्यासाठी शक्ती तर हवी ना.. मग ती नकारात्मक विचार करून वाया घालवण्यापेक्षा सकारात्मक विचार करून कोरोनाला पळवून लावूयात.. तुम्हाला काय वाटते. 

त्यातून काही झालंच तरी घाबरून जायचे नाही तर फाईट द्यायची.. शेवटी "भित्यापाठी  ब्रह्मराक्षस" तेव्हा घाबरू नका.. मात्र काळजी जरूर घ्या.. ????????

• लेख आवडल्यास जरूर शेअर करा...  मात्र नावासहित. साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.  धन्यवाद ! ????????

©सौ. सुचिता वाडेकर... ✍️