भितीलाही वेसण भावनांची

पाल्यांना हातुन घडणार कार्य, जोपर्यंत पुर्ण होत नाही तोवर काळ ही त्या मालकाच्या आधीच रहातो.

“भाउ एक न, ते अस अहो जाओ नको करत जाउस रे, वेगळच वाटत मला, मी लहान आहे तुझ्यापेक्षा, उगाच मोठा असल्याची फिंलींग येते राव, नावानेच हाक मार न मला” समीर

“अस कस नावाने हाक मारू, आता बहिणीच्या मिस्टरांना नावाने हाक मारतात का?” माधव

“अरे पण लग्नाआधी तर भावंडासारखे रहात होतो न, आता आवडली मला माझ्या मामाची मुलगी, तर काय लगेच अस अहो जाओ घालायच??” समीर नाराजी ने बोलतो.

“जरा थांबा तिलाच विचारतो मी” माधव मस्करी च्या सुरात बोलल

“अरे ए, लगेच तिला काय विचारतो, विषय आपल्यात आहे न?” समीर

“हा मग पुन्हा हा विषय नाही काढायचा” माधव

“ठिक आहे बाबा, दोघ भाऊ बहीण सारखेच आहात हट्टी” समीर हसतो.

फोन ठेवुन तो जसा मागे फिरतो तसा दचकतो. मागे ती ऊभी असते त्याला बघत,

“कोणाशी बोलत होते ओ?” समीरा बारीक नजरेने बघत समीर ला विचारते.

तिने काही ऐकल का याचा कानोसा देत तो बोलतो, “अग गावाला फोन केलेला माधव भाऊला”

तिने जस्ट हॉलमध्ये पोहोचली असताना त्याने फोन ठेवलेला होता.

इकडे गावी.

“सेम मामांसारखे आहेत, कधीच मोठेपणा घेत नाही” माधव त्याच्या आईला बोलतो.

“ते आज असते तर किती खुश झाले असते त्यांचा मुलाची प्रगती पाहून” प्रमिलाताई माधव ची आई. बोलताना त्यांचा कंठ दाटून येतो.

“पांडुरंगा, तुझेच निस्सीम भक्त होते ते, आणि तुझ्या कार्यातच अस व्हाव?” प्रमीलाताईंनी पांडुरंगाला हात जोडले.

इकडे समीरकडे

“सुट्ट्या टाकल्यात ना रे, आपल्याला पंढरपुरला जायच आहे, दरवर्षी प्रमाणे” सुशीलाताई समीर ची आई

“हो आई, टाकल्या आहेत सुट्ट्या, बाबा नाहीत म्हणून तिथे कसली ही कमी पडणार नाही” समीर

पुंडलीक राव, त्यांच्या नावाप्रमाणेच विठ्ठलाचे परम भक्त. पंढरपुरात खुप नाव होते त्यांचे.

विठ्ठलाचा आशिर्वाद भेटलाय त्यांना अस म्हटलं जायच. दरवर्षी ते न चुकता वारीला जायचे. तिथे आलेल्या प्रत्येक वारक-याला जेवल्याशिवाय कधीच सोडत नसत. वारीच्या दिवसात ते हमखास मंदीरात नाही पण त्यांच्या अन्नछत्रातच दिसायचे.

“सेवेकरी व्हा, आपला मालक तो आहे, तो सगळ संभाळून घेईल” विठ्ठला कडे बघत बोलायचे.

आणि विठ्ठलाच्या कृपेने त्यांना कधीच काही कमी पडल नव्हत. जेवढ गरजेपुरत होत, तेवढच ठेवायचे बाकी सगळ गरजूंना पोहोचवायचे.

पण या वर्षी ते नव्हते. मागच्या वर्षीची वारी त्यांची शेवटची ठरली होती. त्याची जाणीवही पुंडलीक रावांना आधीच झाली होती बहुतेक, कारण वारीला जाताना नेहमी ते येतो बोलायचे. पण ह्यावेळेस ते जातो बोलले होते. घरचे त्यांना भांडले पण होते. त्यावेळेस ही त्यांनी त्याच्याकडे बोट दाखवत बोलले होते, कर्ता करविता तोच.
शेवटी जे व्हायच तेच झाल, विठ्ठलाचे दर्शन घेतानाच त्यांना हर्ट अटॅक आला. दर्शनासाठी खाली वाकले तसे उठलेच नाही परत.

इकडे घरी जस माहीती पडल तस समीरने पटकन गाडी काढली. तो निघाला. बाकी पंढरपुर लाच होते. समीर चा मोठा भाऊ अमेरीकेत होता. त्याला यायला ही वेळ लागणार होता.

पंढरपुरला पोहोचता पोहोचता अचानक रस्त्यात एक मुलगा धावत आला, आणि समीरच्या गाडी समोर आला. समीरने करकचून ब्रेक मारला. पण तोवर उशीर जाला होता. तो मुलगा रस्त्यावर निपचित पडला होता. समीरने पटकन त्या मुलाला गाडीत घातले, सोबत त्याच्या त्याचे वडील होते. लागलीच त्याला हॉस्पीटलमध्ये भरती केल. जीव वाचला होता त्याचा.

“माफ करा मला” समीरने सगळी घडलेली गोष्ट सांगितली.

“साहेब नका टेन्शन घेऊ, खर तर मी भांडलो होतो त्याला म्हणुन तो असा धावत सुटला होता. तुम्ही जावा बर, तुमची गरज आहे तिथे, आम्हाला खरा विठठल तुमच्या बाबांनी दाखवला आहे” त्या मुलाचे बाबा, ही समोरच्या बाबांना ओळखत होते.

तेव्हापासून समीर ला गाडी चालवायची धास्ती पडली होती. भले तो एक स्किल्ड ड्राइव्हर होता पण आता ती जागा भितीने घेतली होती.

सगळे सोपस्कार आटपून ते परत घरी आले होते. परत येताना मात्र समीर ची हिम्मत झाली नाही गाडी चालवायची. येताना त्यांनी एकाला सांगुन गाडी मागवून घेतली होती.

आता या गोष्टीला वर्ष झाल होत.

पंढरपुर वरून सुशीला बाईंना फोन आला काय करायच म्हणून, समीरने तो फोन घेतला, “यापुढ ही तसच चालु राहील, बाबांच्या नावाने, आम्ही येतोय”

पलीकडल्या माणसाला समाधान वाटले.

“वहिनी ऐका न, अशा अवस्थेत कुठ तुम्ही तिकडे येता, मस्त माहेरी रहा, आराम करा” समीर त्याच्या वहिनीला सांगत होता. ति ७ महीन्यांची गरोदर होती.

“मला सख्ख्या मुलीपेक्षा जास्त जीव लावला होता त्यांनी, आणि त्यांच्या कार्याच्या वेळेस मला तु घरी आराम करायला सांगतोय” तारा चिडून बोलली. “तुझ्याबद्दल तुझ्या दादाला सांगुन देईल ह मी, की तु माझी काळजीच घेत नाहीस”

“काय, ह्याला काय अर्थ आहे, दादा ला जर कळल की मी तुम्हाला अशा अवस्थेत नेल तर तो मलाच भांडेल.” समीर ताराला समजावत होता.

दोघांची भांडण बघुन सुशीला बाई आणि समीरा मात्र हसत होत्या. त्यांनी निरजला कॉल लावला. त्याच्या कडून ताराने परमिशन घेतली.

ते सगळे निघाले. ह्यावेळेस पण त्यानी ड्राईव्हर घेतला होता. सगळ व्यवस्थित पार पडली होत.

 पण नियतीचे खेळ नेहमीच वेगळे ठरतात.

दर्शन देउन परत फिरताना ताराचा पाय घसरला, ती पोटावर पडली. क्षणभर काय झाल कोणालाच कळल नाही. सुशीला बाई पटकन तिच्याजवळ गेल्या . खुप विव्हळत होती ती. तिच विव्हळण पाहुन तिचे उपस्थीत लोकांच्या मनात कालवाकालव झाली.

समीर जा ड्राईव्हरला गाडी काढायला सांग. पण तिला पाहून त्या ड्रायव्हर ची हालत खराब झाली होती, त्याने गाडी चालवायला नकार दिला. शेवटी न रहावुन समीर पटकन गाडीकडे गेला.

त्याने गाडी उघडायला गाडीच्या दरवाजाला हात लावला. त्याला मागची सगळी घटना आठवली. त्याचा हात थरथरला.

मनात भितीने थैमान घातले. भावना ही त्यांच्या आवेगात होत्या.

भावना म्हणजे आपल्या मातीतल्या लोकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय.
 शेवटी भिती हरली, भावना जिंकली होती.

दुसरा पण काहीच उपाय नव्हता. त्याच्याशिवाय दुसर कोणी करूच शकल नसत. त्याने गाडी तारा जवळ आणली. तिला गाडीत घालुन गाडी हॉस्पीटल कडे धावयला लागली.

त्याच्या बाबांच्या वेळेस जशी घटना घडली होती, तशीच आता सुध्दा घडली, पण त्यावेळेस लहान मुल होत, पण ह्यावेळेस ब्रेक फेल झालेला ट्रकच समोर आला होता.
त्या ट्रकवाल्याले समोर येणारी गाडी बघुन ट्रकच स्टिअरींग वळवल. ट्रकचा बॅलेन्स गेला. आणि वाकडी होऊन समीर च्या गाडीवर पडणार तेवढ्यात ति तशीच वाकडी अडकली.

रस्त्यात ऊभे असणाऱ्या लोकांना वाटल की गेले आता गाडीसकट. पण तो ट्रक तसाच वाकड्या अवस्थेत अडकून राहीला होता. सगळ्यांना आश्चर्य वाटल.
समीरने डोळे उघडले. नामस्मरण करायला वर आकाशाकडे पाहीले. त्याला त्याचे बाबा आशिर्वाद देताना दिसले.

“आपल्या कडून होणार कार्य जोवर पुर्ण होत नाही, तोवर येणारा काळ ही त्याच्याच अधीन असतो”

समीरला त्याच्या बाबांचे शब्द आठवले.

ते हॉस्पिटलला पोहोचले. ति पोटावर पडल्यामुळे बाळ ७ व्या महिन्यातच जन्माला आल, अगदी त्याच्या आजोबा सारख होत ते. दोघही सुखरूप होते.

“त्याचे सेवेकरी आपण, त्याच्या दरबारात असताना बर काही होईल आपल्याला” सुशीलाबाई

“आता ह्याच्या सोबतीला बहिणीची तयारी करा रे” सुशिलाबाई समीर कडे बघत बोलल्या. समीरा ही लाजली होती.

समाप्त