भीती नावाचा महाराक्षस

Why fear causes in mind? What to do to overcome on fear? Do read this informative blog.

भीती नावाचा महाराक्षस:-

निशांत (नाव बदललेले) एक गोड मुलगा. आई बाबांचा खूप लाडका कारण एकुलता एक. आई बाबा दोघेही सर्व्हिस करणारे. निशांत ची सकाळची शाळा. ती आटपुन दुपारी घरी यायचा. दुपारी जेवण करायला बाई यायची त्याचे जेवण झाली की सगळे आवरून जायची. 
दुपारी 3 ते 5 तो एकटाच असायचा.  दररोज 5 वाजता ग्राउंड वर खेळायला जायचा. खेळून 7 वाजता यायचा तोपर्यंत आई आलेली असायची. रात्री अभ्यास जेवण करून झोपून जायचा. 

सगळे छान आणि सुरळीत सुरू असताना एके दिवशी दुपारी त्याला एकटे थांबायची भीती वाटली. 
नको वाटले त्याला एकटे थांबायला. 
एकटे असताना घरी कोणीतरी येईल आपल्याला काहीतरी करेल अशी त्याला भीती वाटली. त्याच्या छातीत धडधड व्हायची आणि  त्याच्या मनात सारखे भित्रेपणाचे विचार यायला लागले.

ती भीती दिवसेंदिवस वाढत गेली आणि त्या भीती चे रूपांतर नंतर एका भयगंडात झाले. 
हे सगळे त्याच्या आई बाबांना कळल्यावर या भीती वर उपाय करण्यासाठी त्यांना समुपदेशनाची  गरज पडली. 
आणि योग्य समुपदेशनामुळे निशांत यातून पूर्णपणे बरा झाला.

आता यामध्ये एक गोष्ट नक्की होती की, निशांत ची भीती जी त्याच्या मनात निर्माण झाली होती त्याचा समूळ नाश करणे आवश्यक होते.

आता आपण शोधुयात की भीती निर्माण का होते?
खरेतर भीती हि एक संकल्पना आहे जी वेगवेगळ्या कारणाने निर्माण होत असते.
ह्यात माणसाच्या मानसिकता अर्थात मनाचे विचार यांचा अभूतपूर्व सहभाग असतो.
आपण असे म्हणूयात की, एखादी व्यक्ती, प्रसंग, घटना, किंवा वस्तू  यातील कशाबद्दल ही भीती वाटू शकते.

भीती लवकरात लवकर नष्ट करणे सगळ्यात महत्वाचे!

कशी करता येईल हे पण बघुयात!

1.  भीतीला ओळखा. भीती कशाची वाटते हे जाणून घेणे फार महत्त्वाचे. हे ओळखल्यावर सर्वात प्रथम या भीतीचे मूळ शोधून काढणे गरजेचे. ह्या मुळाशी आपल्याला एक विचार नक्की सापडतो जो या भीतीचे कारण बनलेला असरो.

2. भीतीला मान्य करा. यातून तुम्हाला हे जाणवेल की आपण भीतीला कश्यापद्धतीने स्वीकारून  नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे. 

3. भावनांवर संयम मिळवणे आवश्यक. ही सगळ्यात मोठी गोष्ट. कारण हीच पद्धत योग्य पध्दतीने भीतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी   सर्वात योग्य ठरते. लहान मुलांना वाटणाऱ्या भीतीमध्ये त्यांना बरे करण्यासाठी पालकांचा आणि समुपदेशकांचा मोठा रोल असतो.
समुपदेशक CBT चा येथे उपयोग करतात.

4.  मेडीटेशन करून स्वतःला संयमित करणे हे फारच उत्तम. मेडीटेशन करताना आपण जेवढे एकाग्र होऊ तेवढे आपल्याला भीती या संकल्पनेतून बाहेर पडायला मदत होईल.

5. स्वतःमधील कौशल्ये ओळखून त्यात वृद्धी करत राहणे. यामुळे परिस्थिती हाताळण्यासाठी जो आवश्यक आत्मविश्वास लागतो तो निर्माण होतो. 

चला तर मग आपल्या मनातील दडलेल्या भितींना ओळखूयात आणि त्यांना पूर्णपणे नष्ट करूयात नाहीतर या भीतीचे रूपांतर एका मोठ्या राक्षसात व्हायला वेळ लागणार नाही.

काळजी करू नका. काळजी घ्या!

©®अमित मेढेकर