बहिणीचे दुःख

Bhiniche Dukh
बहिणीचे दुःख

समीर आणि वैदेही दोघे आपल्या खोलीत बसले होते... समीर ने वैदेही साठी आज लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 5 तोळ्याचा लक्ष्मी हार गिफ्ट म्हणून दिला होता, आणि तो सगळ्यांना समजू नये म्हणून दोघे जेव्हा एकटे असतील तेव्हा द्यायचा ठरवला होता... आणि तसाच मुहूर्त साधून त्याने सकाळी उठल्याबरोबर आणि वैदेही तयार झाल्यावर तिच्या गळ्यात टाकला..तिने छान पैठणी नसली होती..त्याच्यासाठी छान तयार झाली होती...तो गिफ्ट देणार हे तिला ही माहीत होते...आणि मग ठरल्या प्रमाणे तसेच झाले... दोघे त्यांच्या खोलीत असेपर्यंत तिने तो हार गळ्यात घालून ठेवला ,काही सेल्फी काढल्या ,काही खास फोटो तिचे एकटीचे काढले.. आणि तितक्यात सई अचानक दार न वाजवता आत आली आणि ती येताच पटकन वैदेहीने पदर असा ओढून घेतला की तो हार दिसू नये सईला असा ठेवला...सगळे कसे अचानक झाले.... इतका महाग सोन्याचा पाच तोळ्याचा हार घेतला हे घरच्यांना कळू नये हे दोघांनी ठरवले होते...

समीर..."अग सई निदान नोक करून तरी यायचे..काय हे असे अचानक धडकतेस तू.."

सई आपल्या भावाच्या ह्या बोलण्याने जरा शांत होते...तिला आपण चूक केली हे समजते..

सई... सॉरी ह दादा, मी असे अचानक नको यायला हवे होते ,पण कारणच तसे होते रे...काल यांचा फोन आला होता.. त्यांना काही कामासाठी तातडीने पैसे हवे होते...माझ्या नंदेच्या सासरच्यांनी तिला घरातून बाहेर काढले आहे..आणि तिच्याकडे राहण्याची कसलीच सोय नाही...मग यांनी ठरवले की आजच तिला घर शोधायचे आणि तिला तिचे हक्काचे घर घेऊन द्यायचे आहे.. मग आम्ही ठरवले की ताईना घर घेण्यासाठी मी माझे दागिने आणि बांगड्या मोडून पैसे गोळा करून...त्यात तुझी ही मदत हवी आहे..


दादा... अग माझी मदत काय हवी ,तुला माहीत आहे ना सध्या किती अडचण सुरू आहे आमची ,पगार झाला नाही ,आणि तू इथे delivery साठी आली आहे ,तो ही खर्च आहे..आई बाबांचा खर्च...अश्यात मी तुला काय मदत करणार...

वैदेही....ताई नका काळजी करू, मला सांगा मी काही करू शकते का बघते..

सई.... नाही मला फक्त तुमच्या कडे ठेवलेला तो बाबांनी दिलेला हार द्या लॉकर मधून आणून, तो ही मी मोडेन आमच्या ताईंसाठी..म्हणजे त्यांना घर मिळेल आणि त्यांचा स्वाभिमान जपला जाईल... सोने नाणे काय त्यांच्या पेक्षा महत्वाचे नाही...ते तर होतच राहतील..

वैदेही.... अहो पण हे सगळे दागिने मोडणार का त्यांच्यासाठी

सई.... वहिनी दागिने शरीराची शोभा करतात ,मनाला तर ह्याची गरज नाही...आणि नवऱ्याची बहीण काय आणि आपली बहीण काय ....मला हेच महत्वाचे की मी कोणाच्या तरी अडचणीत कामी पडत आहे...

दादा... तू तुझ्यासाठी काहीच न ठेवता सगळे तुझ्या नंदेला कशी देऊ शकतेस..इतका ही उदार पणा बरा नाही..आणि भाऊजींनी ही लगेच घर घेऊन देण्यापेक्षा घर भाड्याने घेऊन द्यावे ,मग बघेल ती तिचे काय करायचे ते...तुम्ही का उगाच अंगावर ओढून घेत आहात..आणि तिचा नवरा असेल ना सक्षम करू द्या त्याला ही काही हालचाल.. हे नेहमीच काय ओझे डॊक्यावर घ्यायची सवय लागली तुम्हाला..

सई शांत राहून आता उत्तर देते

दादा एखाद्या भावाला हारण्यात मोठेपणा वाटतो तर एखाद्या भावाला हार लपवण्यात ...दिसले तुझे तुझ्या बहिणी प्रति कर्तव्य आणि काळजी..पण सगळेच तुझ्यासारखे प्रॅक्टिकल होऊ शकत नाहीत...पैसे आणि ऐपत असून ही नाही म्हणायचे धाडस त्यांच्या नाही...

दादा गप्प बसतो, त्याला आता समजले सईला काय म्हणायचे होते ते...

सई... माझे दुःख हेच आहे की माझा भाऊ मी मदत मागायला येते की काय ह्या आधीच आपले दुखडे सांगून मोकळा होतो...बहिणीला ओझे समजतो...पण प्रत्येक भाऊ असा नसतो...आणि म्हणून मला माझ्या नवऱ्याचा खरंच अभिमान वाटतो ह्या बाबतीत...तो नवरा म्हणून तर चांगलाच सिद्दी झाला आहे पण भाऊ म्हणून ही सगळे त्याचे गुण घेतात...बघ तुला त्यांचे थोडे ही गुण घेता आले तर...


कशी वाटली ही छोटी कथा...तुम्हाला सईने केले ते बरोबर वाटले का.?? सांगा कंमेंट मध्ये..