Jan 29, 2022
कथामालिका

भेटली ती पुन्हा (भाग १)

Read Later
भेटली ती पुन्हा (भाग १)

आज पाऊस जरा जास्तच कोसळत होता... संजय आज ऑफिसमधून निघे निघे पर्यंत उशीरच झाला... सगळं ऑफिस पाऊस खूप पडतोय म्हणून जरा लवकरच रिकामं झालं होतं पण उद्या आईचा वाढदिवस म्हणून सुट्टी टाकलीय तर आजच काम संपवून निघुया या विचाराने संजय काम करत बसला होता पण कधी आठ वाजून गेले त्याला कळलंच नाही.... त्याच्यामुळे थांबावं लागलेल्या ऑफिस बॉयला सॉरी म्हणत त्याने सगळं आवरलं आणि खाली उतरला.... बाहेर पाऊस बराच वाढला होता... आता ट्रॅफिक ही बरच असेल या विचाराने त्याने आपला रेनकोट घातला आणि बाईक चालू केली...... वातावरणात बराच थंडावा आला होता... तो बरसणारा पाऊस बघून संजयला चहाची तल्लफ आली... कधी एकदा घरी पोहचतो आहे आणि गरमागरम चहाचा आस्वाद घेतो आहे असं त्याला झालं.. पावसाचा तो गारवा, ते अल्हाददायक वातावरण त्याच्या मनाला ही गारवा देत होतं... पाऊस असा बरसला की त्याला भूतकाळात रमायला भाग पाडणारी "ती" आजही त्याचा पिच्छा सोडत नव्हती.... नऊ वर्षांनंतर सुद्धा...............................मुंबईच्या ट्रॅफिक मधून वाट काढत, साचलेल्या पाण्यातून बाईक चालवत संजय "ती"च्या आठवणीत कधी रमून गेला त्याचं त्यालाच कळलं नाही... कॉलेजचे ते अल्लड दिवस, तो धुंद पाऊस आणि "ती"..... "ती"च्यामुळेच तर संजयला न आवडणारा पाऊस आवडायला लागला होता.... इतक्यात "अरे बाईक तर बंद पडली!!! आत्ता या पावसात कसा घरी जाऊ? जिकडे तिकडे पाणी साचलय... ऑटो, टॅक्सी पण दिसत नाहीय!!" संजय अचानक बंद पडलेल्या बाईक मुळे अस्वस्थ होऊन स्वतःशीच बडबडत होता... काय करावं या विचारात असतानाच त्याची नजर समोरच्या चहाच्या टपरीवर गेली.... पावसात गरमागरम चहाचा आनंद घ्यावा या विचाराने बाईक कडेला लावून तो रस्त्याच्या त्या बाजूला गेला... मस्त गरमा गरम आल्याचा चहा हातात घेत त्याने एक घोट घेतला.... "अहाहा!!!! पाऊस आणि चहा म्हणजे स्वर्गीय सुख...!!" चहाचा दुसरा घोट घेत त्याने समोर नजर टाकली तर त्या पावसात समोर एक बाई आपली छत्री कशीबशी पकडायचा प्रयत्न करत होती... वाऱ्याचा आवेग एवढा होता की तिची त्री उलटी होत होती आणि त्यामुळे ती पूर्ण भिजली होती... कसं बसं स्वतःला सावरत त्या बाईने रस्ता क्रॉस केला आणि वाऱ्याने चेहऱ्यावर आलेले आपले ओले केस बाजूला करत आपली तिने साडी व्यवस्थित केली....


जेमतेम बांधलेले, विस्कटलेले ओले केस.... बारीक फुलाफुलांची डिझाईन असलेली निळी साडी, हातात तुटलेली छत्री अशा अवस्थेतील ती संजयच्या बाजूला येऊन उभी राहिली... आडोसा मिळावा म्हणून.... पाऊस कमी झाला की नीघुया या विचाराने.... ती आपल्याच तंद्रीत होती... भिजलेली.... भिजल्यामुळे काहीशी ओशाळलेली.... आपल्याला कुणी बघतय का हे जाणून बुजून बघणं टाळणारी.... संजयने मात्र तिने तिचे भिजलेले केस बाजूला करताच "ती"ला ओळखलं होतं.... आज नऊ वर्षांनी "ती" दिसली होती.... गळ्यात छोटंसं मंगळसूत्र होतं..... जरा अस्ताव्यस्त वाटली पण त्याला तेव्हा "ती"........


"बोलू का मी तिच्याशी??" तिनेही ओळखलं असेल का मला?? मला ओळखून "ती" इथे माझ्या बाजूला आली असेल का?? छे.... तिचं तर लक्षच नव्हतं आजूबाजूला... तिने ओळखलंच नसेल का मला?? ती लगेच निघून गेली तर???" मनात असंख्य विचार घेऊन हातात चहाचा ग्लास तसाच घेऊन संजय उभा होता... एव्हाना त्या चहाच्या ग्लासात पावसाचं पाणी आपल्या आठवणी सकट मिसळून सुद्धा गेलं होतं..... तो मात्र विचारातच होता की "बोलू की नको!!!!" मनातली घालमेल चेहऱ्यावर न आणण्याचा निष्फळ प्रयत्न करत तो आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलू लागला....क्रमशः.............?️?️पुढचा भाग लवकरच.....


वाचकहो, कथा आवडली असल्यास लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा... पुढचा भाग वाचण्यासाठी मला फॉलो ही करू शकता आणि आपल्या अमूल्य प्रतिक्रया देऊन मला नक्की कळवा....


©® रश्मी केळुसकर.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Rashmi Keluskar

Housemaker

सकारात्मकता आणि लिखाणाची आवड यांचा मेळ साधत व्यक्त होणारी मी?