भेटेल तिथे गं सजण मला भाग १

Its a hounted love story


रात्रीचे 3 वाजलेले ... गेल्या 6 महिन्यांपासून विक्रांतला झोप नव्हती लागत.. सारखा तो प्रसंग आठवायचा ... स्वत:ला दोष देत बसायचा..." का मी माझ्या मीत्राला न्याय मिळावा म्हणून माझी नोकरी गमावली?...ईथे कोणालाच काही पडलेलं नाहीये "...तेवढ्यात त्याला मेल आला सूदर्शन लाँ फर्म कडून....विक्रांतला सिलेक्ट केलेलं इंटरव्हूव साठी... त्याला खूप आनंद झालेला लगेच दूसर्यादिवशी गोरेगावला गेला.. त्याला सूदर्शन चक्रपाती यांनी इंटरव्यूव्ह घेऊन सिलेक्ट केले..त्यावर विक्रांतने त्यांना प्रश्न केला की

विक्रांत - सर तूम्हाला माहीत आहेच की मी जीथे काम करायचो तिथून हकलून लावलय मला...मिडीयामध्ये कीती माझ्यावर लांच्छन लावलेत तरी तूम्ही मला सिलेक्ट केलंत.....का ?

सुदर्शन - मला तूझ्यासारख्याच वकीलाची माझ्या टीममध्ये गरज आहे...ज्याने  मित्रावर केलेल्या बलात्कारा बद्दल लाँ फर्मच्या प्रसिद्ध मालकावर गून्हा नोंदवला...ज्याने मिडीयाच्या असंख्य प्रश्नांना तोंड दिले..जो भविष्यातील परिणामांची फीकर न करता संकटांचा सामना करतो ...तो वकील नक्कीच मला माझ्या फर्म मध्ये हवाय..

विक्रांत - थँक्यू सो मच सर.. मी नक्कीच सत्याचा साथ देऊन तूमच्या टीमला हेल्प करेन..

सुदर्शन - पूरे आता ..तू लवकरात लवकर दिल्लीला ये केसेस आल्यात खूप.

विक्रांत - दिल्ली ?

सुदर्शन - हो दिल्लीच ...तूला आमच्या मेन ब्रांचमध्ये निवडलयं मी..

विक्रांत - ठीके सर मी उद्याच निघतो दिल्लीला..

विक्रांत त्याच्या मिनाक्षीलाही  खूषखबर सांगतो.. तीला पण खूप आनंद होतो..

विक्रांत - पण मिनू मला तूला सोडून नाही जायचयं.. तू पण चल ना सोबत..

मिनाक्षी - नाही नको तू जा.. जसं तूला तूझं काम प्रीय आहे तसं मलाही आहे..ईथे माझे स्टूडंट्स वार्यावर सोडून कशी जाऊ मी..नाहीतरी आपल्या नशिबी मुल नाहीये ...आणि  लहान मूलांमध्ये मन रमत माझं ..तू दिवसभर कामात राहशील.. जा तू सगळकाही सेटल झाल्यावर येईल मी.

विक्रांत - पण मिनू लोकेशन दिल्ली आहे..(विक्रांत टेंशन मध्ये विचारात गूंग होतो)

मिनाक्षी - हो मग जा की.. भूतकाळ विसरून तूला पूढे जावचं लागेल ...कधीना कधी तरी तूला संकंटांना तोंड द्यावेच लागेल..

विक्रांत - पण मिनाक्षी ती तिकडेच राहते ना.. मला भिती वाटतेय..

मिनाक्षी - ए बाबू तू तूझ्या कामासाठी चाल्लाय एवढं लक्षात ठेव..तूझा मित्र सँमी पण तीकडेच राहतो ना कामानिम्मीतं
..त्याच्या रूमवर रहा तू..बीचारा  तो एकटाच राहतोय..तूझी साथ मिळेल त्याला जा तू बिन्धास्त..

मी म्हणजे विक्रांत, आता रिषभ नाहीतर ईथुनपुढे मी तूमच्याशी बोलेल काऱण कथा माझ्यावर लिहलीये ना मग मीच सांगतो...

मी लगेच समीर उर्फ सँमीला काँल केला..

सँमी - ए विक्या कसाय भावा... तू तर चांगलाच फेमस झालायसं..बातम्यांमध्ये पाहीलं तूला..

मी - मी मजेत आहे..तू कसाय ?..

सँमी - मीपण  मजेत आहे..लोकांना सोलूशन देतो रोज..सायकँस्ट्रीकचं कामच ते..साँरी राव मी काय माझं गूनगान गातोय..तूझा जाँब गेला कळालं मिनाक्षी कडून..

मी - अरे तेच सांगायला काँल केलाय.... मी दिल्लीला येतोय सूदर्शन फर्म मध्ये सिलेक्शन झालयं..

सँम - काय...?.."दी सूदर्शन चक्रपाणी" यांच्या फर्म मध्ये ?

मी - हो..म्हणून म्हटलं तूला विचारावं तूला फ्लँटमेट हवा होता ना..

सँम - ओ..!  आय कान्ट बिलीव दिस... तू येतोय ईकडे..आरे तूझाचं फ्लँट आहे ..ये कधीपण ..आल्यावर सांगतो तूला ईकडच्या हाँट चीक्स मूलींचे एक एक किस्से... बार पण आहेत बरंका ईथे जवळच....तूला माहीतीये आपण दोघे किती धमाल करायचो....

मी - नालायका बास की हे थेरं तूझी...चल बाय उद्याच येतोय ..पत्ता दे..

मी बायकोचा निरोप घेऊन गेलो दिल्लीला..तेच ते जूने रस्ते ...जूनंच वातावरण ...माझी डेस्टनी का मला पून्हा मागे खेचतीये ....नक्कीच काहीतरी वेगळं घडणारे माझ्याबाबतीत..

मी दरवाजा क्नाँक करतो...

सँमी - ओहो..लूक हू इज इन टाउन.. कम बडी गीव्ह मी हग..

मी - या डूड... काय सांगू तूला खूप मीस केलं मी 4 वर्षात.. चल आता तूझ्या मित्राचं आदरातीथ्य कर नीट..

सँम -  हो नक्कीच ..जा तू फ्रेश हो ...गरमा गरम ट्रेंडींग डाल्गोना काँफी करतो..

मी आणि सँम काँफी पीत असताना मी टेबलवरील मँगजीन वाचायला घेेतो..आणि मला तिचा फोटो दिसतो...

सँम - ही तीच आहेना.. प्रसिद्ध उद्योगपती झालीय हरामी..
शांत का तू....तूला काय झालं.. असं बोलता बोलता विचारांमध्ये का गूंग होतोस सारखा..

मी - का मला पून्हा दिल्लीत आणलं देवाने... (मी भावूक झालो).चार वर्षापूर्वी किती प्रेम करायचो मी तिच्यावर पण ती नालायक निघाली  रे.. त्यावेळेसचं नेमकं मिनाक्षीच्या बाबांनी माझ्याकडून वचन घेतलं,  की मी माझ्या बेस्टफ्रेंडशी लग्न करावं असं..बिचारे मिनाक्षीच्या मोडलेल्या लग्नामूळे हर्टअटँकने वारले..

सँम - रिलँक्स बडी..इतका बिन्धास्त निडर तू ....मी आहे ना दिल्लीत, सो चील..

मी - सँम्या...

Everytime I decide to take  certain path ,  but my destiny pulls me elsewhere.

But this time

I am going to do exactly  what I want.

Crossroads can go to hell

सँम - दँटस् लाईक अ गूड बाँय..चल संपव काँफी लवकर...जेवायचं बघू काहीतरी..


मी आणि सँमने डीनर केलं आणि आम्ही झोपी गेलो.. नेहमी प्रमाणे मी ईथेही लवकर उठून स्वत:साठी गवती चहा बनवला ...गँलरी मध्ये बसून चहा पितानी आजच्या नव्या दिवसासाठी सेल्फी घेतला...नंतर सँम पण उठला त्याला ब्रेड बटर आणि चहा दिला.. मला बोलला

सँम - झाली का तूझी अंघोळ ?

मी - हो आता मला लवकर अंघोळ करायची सवय लागलीये..

सँम - शट् यार चान्स हूकला माझा...मी पण लवकर उठायला पाहीजे होते..म्हणजे दोघांनी सोबतचं अंघोळ केली असती..

मी - होका नालायक अजून तुझा बालिशपणा गेला नाही वाटतं

सँम - ओ माय गाँड..वीक्या मान्य आहे मला की तूझं लग्न झालयं..पण मला हे पण ठाऊक आहे की तूझं लग्न कोणत्या परिस्थीतीत झालं.. मला वाटलं नव्हतं की तू इतका बोअर झालाय आता ..पहिल्या सारखा राहिला नाहीस


मी : बास झाली तुझी बडबड..बरं चल आवरतो मी, आजचा पहिला दिवस आहे निघतो...मला असिस्टंट पण शोधायचा आहे माझ्या केसेसच्या हेल्पसाठी..

मी पांढरा शर्ट ,ब्लँक पँन्ट टिपीकल वकीलीपेशा प्रमाने कपडे घालून निघालो बाईक वर .....एका सिग्नलला बाईक थांबवली पण माझी बाईक क्राँस लाईनच्या थोडी पूढे गेलेली.. तेवढ्यात ती आली तिला रस्ता क्राँस करायचा होता.. माझ्या बाईक पूढे येऊन थांबली, मला तीच्या हाताने इशारे करून सांगत होती बाईक मागे घे..मी तीच्याकडे रागाने पहात होतो.."हीची हिम्मत कशी झाली माझी बाईक मागे घेयला सांगतेय"..मी मागे घेत नव्हतो तर ती अजून पूढे आली आणि तीचे दोन्ही हात हालवून मला इशारे करून बाईक मागे घे सांगत होती..सगळेजन मी नियम मोडल्यामूळे माझ्याकडे तीरकस नजरेने पहात होते..म्हणून मी नाईलाजाने बाईक मागे घेतली..मला एक स्माईल देऊन ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या रेस्टाँरंंट च्या बाहेरच्या बाजूला चेअर वर जाऊन बसली आणि लँपटाँप मध्ये काहीतरी खटपट करू लागली...

दिसायला छान होती ती..गोरा वर्ण.. थोडे मोठे केस , केसांची बट तिच्या कपाळावरून पूढे येत होती..घारे डोळे.. कानात काळ्या रंगाची छोटी बटनं...डोळ्यांच्या भूवयीला सुद्धा रेखीव आकार दिलेला.. सडपातळ देहावर घातलेला ग्रीन रंगाचा टिशर्ट एकदम फीट बसलेला..एकदम स्टाईलीश होती ती...मी तीला पुन्हा पाहीलं पण तीने नव्हतं पाहीलेलं मला.. कारण मी हेल्मेट घातलेलं,तेवढ्यात मागून गाड्यांच्या हाँर्नचा आवाज आल्यावर मी भानावर आलो आणि मी गेलो फर्मवर.


क्रमश..

🎭 Series Post

View all