भेटेल तिथे गं सजण मला - भाग ९

Its Horror Love Story


वेदीका- तू ईथे कसकाय ?

केदार - काय झालं नाही येऊ शकत का?

वेदीका- अरे म्हणजे..ईथे कोणी मूलगा येत नाही म्हणून विचारलं..हा शास्त्रीय कला शिकण्याचा तास असतो ना

केदार - तसं काय आहे ना..मी तबला विशारद आहे म्हणून आता रोज ईथेच येईल प्रँक्टीसला..तूम्हाला काही अडचन नाहीना..

वेदीका- छे छे आम्हाला कसली अडचन .उलट आता तूझ्या तालावर नाचू आम्ही..म्हणजे तू तबला वाजव आम्ही दोघी नाचू..होना वसू..

वसू रागात माझ्याकडे पाहत होती..
वेदीका- अरे साँरी मीओळख करून नाही दिली ....ही वसूंधरा माझी बेस्टी आणि डांस पार्टनर सूद्धा..

तेव्हापासून केदार,मी आणि वसू आमचा चांगला ग्रूप झाला...आम्ही सोबतच असू नेहमी असाईनमेंटस सूद्धा सोबतचं कंप्लीट करत होतो ...या काळातच मला केदारचा सहवास आवडत होता..कदाचीत केदारला सुद्धा मी आवडायला लागलेली...आम्ही रात्रभर फोनवर गप्पा मारायचो...

एकदा काँलेजमध्ये इंटर काँलेज डांन्स फेस्टिवल होतं ...आम्ही देखील पार्टीसीपेंट केलेलं ..मी आणि वसू रासलीला सादर करनार होतो..आणि तो तबला वाजवनार होता..मी तेव्हा ठरवलं की आम्ही जर जिंकलो तर मी केदारला प्रपोज करेल..ठरल्या दिवशी आमचा डांस सूरू झाला..आम्ही रासलीला सादर सुरू केली ...

" मधुबन में जो कन्हैया किसी गोपी से मिले
कभी मुस्काये, कभी छेड़े, कभी बात करें
राधा कैसे ना जले? राधा कैसे ना जले?
आग तन-मन में लगे
राधा कैसे ना जले? राधा कैसे ना जले?
मधुबन में भले कान्हा किसी गोपी से मिलें
मन में तो राधा के ही प्रेम के हैं फूल खिलें "

मी इतकी तल्लीन होऊन वसूसोबत नाचत होते की असं वाटतं होतं की वसू खरचं माझ्यावर प्रेम करतीये..

रीजल्ट अनाउंस झाल्यावर मी लगेच वसूकडे गेले..

वेदीका-मला तूला काहीतरी सांगायच आहे
वसू - मलापऩ.
वेदीका - ठीके..सांग
वसू - नाही पहीलं तू..
वेदीका- आय लव यू... हे कसं बोलू मी केदारला हे सुचतचं नाहीये..
वसू - काय ?..
वेदीका- हो अगं मला केदार खूप आवडतो..साँरी तूला नाही सांगीतलं मी आधी..पण आज मी ठरवलं होतं की जिंकल्यावर त्याला प्रपोज करेल..
वसू - मी पण ठरवलं होतं...
वेदीका-काय?..
वसू - काही नाही ..जा तू सांग त्याला तूझ्या मनातील भावना..

मी लगेच तेथून पळाले आणि केदारकडे गेले..आम्ही जिंकल्यामूळे केदारने मला मिठी मारली..मला वाटलं हीच ती संधी आहे..मी त्याच्या कानात बोलले ..आय लव यू...त्यानेपण मला रिप्लाय केला की आय लव यू टू..

वेदीका- काय ?

केदार - हो आय लव यू टू..

वेदीका - खरचं ..हो ..इतक्या दिवस तूला माझी जवळीक अवडतीये हे न कळन्या ईतका वेडा नाही मी..मीपण प्रेम करतो तूझ्यावर..पहिल्या दिवसापासून तू मला खूप आवडतेस

मी उत्साहाच्याभरात त्याला किस करू लागले.. मी होठ त्याच्या होठावर ठेवले तोच तो बोलला की नाहीआ वेदू..हे सगळं लग्न झाल्यावर..

वेदीका- काय लग्न ?

केदार - का काय झालं..लग्न नाही करणार का..

वेदीका- तसं नाही रे..एका दिवशीच येवढे धक्के नाही सहन होणार मला.. मी उद्याच माझ्या बाबांशी बोलते..ते नाही म्हणनार नाही..

केदार - मी अनाथ आहे..आमच्या अनाथलयातील माईला सांगतो मी तूझ्याबद्दल..

क्रमश:

🎭 Series Post

View all