भेटेल तिथे गं सजण मला - भाग ८

It's Horror Love Story


मी लगेच वेदीकाला काँल केला..हँलो वेडू कूठे आहेस तू..
वेदीका - अरे मी तूझीच वाट पाहतेय..तूझ्या रूमवर आलेय...ये लवकर तू..
मी - होका..एक काम कर सँमकडे फोन दे..
सँम - हा बोलना विक्या..
मी - हे बघ तूला आपल्या मैत्रीचा वास्ता..तू आज रात्रभर काही करून आपल्या रूममधून वेदीकाला जाऊ नको देऊस..मी आल्यावर सगळं सांगेन तूला..
सँम - ठीके विकी..बाय..

मी डायरी वाचू लागलो..

नमस्कार मी वेदीका अग्नीहोत्री.. मी नूकतेच या काँलेजला अँडमीशन घेतले म्हणून आता रोज काँलेजच्या लायबरी मध्येच ही माझी रोजनिशी लीहीत राहनारे..

काँलेज मला खूप आवडले..मला लहानपासूनच क्लासीकल डांस करायला आवडतो म्हणून मी काँलेज मध्ये सूद्धा डांस सेशन्स न चूकता अटेंड करते..माझ्या अशा शास्त्रीय डान्स करण्यामुळे मला मित्र नाहीत जास्त. सगळ्या मैत्रीणीच आहेत.. कारण पोरांना मॉडर्न जमान्यातील डान्स करणाऱ्या ,कंबर हलवणाऱ्या मुली आवडतात...वसुंधरा ही माझी बेस्टी , आम्ही नेहमी सोबत असायचो..लेक्चर बूडवून मूव्हीला जायचो..नदीच्या किनार्यावर ,डोंगरावर , मोकळ्या हायवेवर सगळीकडे आम्ही हिंडायचो...आम्ही एकत्र वर्गात दिसलो नाही तर मॅडम बोलयच्या " तुझी बायको कुठंय वेदीका " अशी आमची जोडी सगळीकडे फेमस होती.

मला नेहमी वाटायचं आपलापण कोणीतरी राजकूमार येईल जो जगातले सगळे सूख माझ्यापायाशी आणून ठेवेल..जो माझी केअर करेल आम्ही एकमेकांचे दुख शेअर करू..ज्याचा सोबत मी रोमांस करेल खूप...
माझ्या नखऱ्यानी मला काँलेजमधील खूप पोरं फक्त वासनेसाठी फाँलो करायचे..काहीजन सेक्ससाठी वीचारायचे..मला ते लागत असतं तर मी केव्हाच शरीरसुख मुलांकडून भोगलं असतं...पण मी माझ्या स्पेशलच्या शोधात होते..

मला अजूनही तारीख लक्षात आहे, दिनांक 15 जूलै 2005 तो काँलेजमध्ये आला ...मला पहील्या लेक्चरला उशीर होईल म्हणून मी धावत होते क्लासरूमकडे..मी वर्गात जाणार तोच त्याला धडकले .. दोघांचे फोन्स खाली पडले..त्याने मला सावरलं मी बघतचं राहीले त्याच्याकडे..मस्त भगवा करलचा शर्ट घातलेला होता त्याने ...त्याच्या त्या मिशा एका सरऴ आडव्या लाईन मध्ये होत्या ..तो मला साँरी बोलत होता पण माझं लक्ष नव्हतं त्याच्याकडे.. शेवटी त्यानेच पूढाकार घेतला..

तो - अगं ताई कूठे लक्ष आहे तूझं ..हा घे तूझा फोन..

मी - काहीनाही साँरी..

आणि आम्ही वर्गात आलो मला त्याचा थोडा राग आलेला कारण ताई बोललेला तो मला..

मी लेक्चर मध्ये लक्ष देत होते...त्यावेळा मला जाणवलं कोणीतरी मागे माझ्याकडे टकलावून पाहतयं..मी मागे पाहीलं तर तो हिरो मला हातात फोन घेऊन इशारा करत होता मला नाही कळले लवकर..शेवटी त्याने त्याच्या हातातील फोनने मला मेसेज केला..मला मेसेज आला मी फोनवरचा मेसेज पाहीला तर नंबर अनोळखी होता..त्यात लिहलं होतं की.."चूकून माझा फोन तूझ्याकडे आलाय..ब्रेकमध्ये भेटू" ..मी "ठीके " असा रीप्लाय दिला...त्याचं लक्ष नाहीये ही खात्री करून मी त्याचा फोन उचकू लागले..त्याचे काही फोटोस मी माझ्या मेलवर पाठवले ...ब्रेकमध्ये भेटलो आम्ही..तेव्हा कळालं की ह्याचं नाव केदार आहे तर.. मला त्याने विचारलं की संगीत या विषयाचं सेशन कूठे होतं..त्याला मी सांगनार तोच वसूने मला ओढतचं कँन्टीनकडे नेलं..वसू सोबत असतानी मी विसरून गेले त्याला..मी आणि वसू डांस प्रँक्टीस करत होतो हाँलमध्ये ...मी तीन चार गीरक्या घेतल्या तालावर तोच मी दरवाजामधून केदारला येताना पाहीलं..माझा आणि वसूचा डांस झाल्यावर मी स्वतःहून त्याला भेटले..


क्रमश:

🎭 Series Post

View all