Login

भेटली तू पुन्हा! भाग - छत्तीस

भक्ती विश्वराज
भेटली तू पुन्हा !

भाग - 36



"एव्हरीवन क्नोज व्हाय वी आर हियर, सो धिस इज अ स्मॉल सेलिब्रेशन एन्जॉय.” असं बोलून भक्तीने पार्टीला सुरवात केली..

“ वन मिनिट मॅम ..” लिली एक टू टायर केक वेटर सोबत घेऊन आली..

“ लिली काय हे ..” 

“ मॅम मी नाही या सर्वांनी करायला सांगितल .”  

“ चला कट करूया , या सर्वांनी इकडे आहे.” तिने सर्वांना बोलावून घेतले. मध्ये राज त्याच्या मागे भक्ती लिली रजत त्याच्या आजूबाजूला सगळ्यांनी हात लावून केक कट करून घेतला..


 एकमेकांना केक  भरवून आनंद साजरा केला.. टेबलवर स्टार्टर मागवलं सर्वांनीच खायला सुरवात केली. राज आल्यामुळे त्याच्यासमोर ड्रिंक करू शकत नव्हते.. लिली राजला डान्स फ्लोवर वर घेऊन गेली. रजत सोबतच काही जण ड्रिंक करण्यासाठी गेले.. तर काही गाण्यांच्या बोलावर थिरकू लागले.. मुलीही उठून डान्स करायला धावल्या.. लिलीने आदिराज आणि भक्तीला जबरदस्ती करून नाचायला ओढलं.. सगळेच तिला आग्रह करू लागले म्हणून ती तिथेच उभी राहून थिरकायला लागली. 

त्याच सनशाईन मध्ये वरच्या फ्लोवर विश्वराज त्याची बिझनेस डिलसाठी मिटिंग घेत चार तास आधीपासून आलेला होता.. डिनर ही त्यांच्या सोबतच होणार होता.. तो जेवत असतांनाच अमर त्याच्या जवळ येऊन त्याच्या कानात सांगितले… 


“हं?” त्याने एक भूवई उंचावून प्रश्न केला त्यावर अमरने होकारार्थी मान हलवली. यांचं जेवण झालं तस विश्वराज त्यांच्यासोबत खाली आला. 

“ ओके मिस्टर अभ्यंकर .. नेक्स्ट मंथपासून पुढच्या प्रोसिजरला लगेच सुरवात करूया.” 

“ शुअर मिस्टर सबनिस.” शेकहॅन्ड करत सबनिस गाडीत बसून निघून गेले.. विश्वराज आणि अमर पार्टी सुरू होती तिथे आला. तिथे दुरुनच तो त्यांच्या कडे बघत होता. ती लिली आणि राज डान्स फ्लोअरवर नाचत होते.. भक्ती तर त्याच्यासोबतच डान्स करत होती. राज ही खूप खुश वाटत होता.. दूर उभा असणारा विश्वराज दोघांना बघून आनंदित झाला होता...  राजला तर कित्येक दिवसानंतर समोर बघत होता.. आज ही ती नेहमी पेक्षा जास्तच सुंदर दिसत होती.. दोघांना मिठीत घ्यावं त्याला खूप वाटत होतं.. 

“मॅम मे आय. .” त्यांच्यासोबत काम करणारा एक तरूण कलीग अदबीने तिच्यापुढे हात करत म्हणाला..  

“ सॉरी पण मी माझ्या मुला सोबत डान्स करतेय.” तिने त्याला नम्रपणे नकार दिला..त्याने आदिराजला विचारले आणि तो ही पटकन हो म्हणाला. आता तर नकार देण्याचं काही कारण उरल नव्हतं. भक्ती त्याच्यासोबत डान्स करायला लागली. तिला दुसऱ्यासोबत डान्स करतांना बघून विश्वराजच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या.. 


“ हे गाईज .. तुम्ही तुमचं चालू द्या. मला घरी जावं लागेल..” 

“ मॅम थांबा ना आत्ताच तर आले.”  

“नाही मला जावं लागेल. तुम्ही पार्टी एन्जॉय करा . बाय.” बोलून ती आणि आदिराज निघाले.


भक्तीने सर्वांचा निरोप घेतला. लिलीही त्यांच्या सोबतच निघाली..

 विश्वराज भक्तीला नाचतांना बघून रागातच तो निघून गेला. 
 
  
*********************


आज शो ची ट्रायल होती.. सगळ्या मॉडेल्स नी ड्रेस ट्राय करून रॅम्प वॉक करत होत्या.. लिली आणि रजत आधीच तिथे गेले होते.. तिथूनच ती भक्तीला अपडेट देत होती..  स्टेज डेकोरेशन लाईटस् म्युझिक सर्व याचे अपडेट अमर घेत होता.. उद्याच्या फॅशन शो ला मिडिया, तरुण वर्गात ‘जवाँ दिलो की धडकन फेम फॅशन दुनियातही प्रसिद्ध असलेला अभिनेता आशुतोष केळकर  प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होता. 


लिली आणि रजत तर तिथे होते. काही अडचण आल्यास भक्ती तिथे लक्ष लावून होती.. शो ला जरा अवकाश होता .. या रॅम्प वॉकला सुरवात करणारी एलोरा अजूनही आलेली नव्हती.. सर्वच तिची आतुरतेने वाट पाहत होत्या.. बाकी सगळ्या मेल फिमेल मॉडेल्स तयार होत होत्या. थोड्याच वेळात सुरवात होणार होती की आशुतोष ही त्या अटायर घेण्यासाठी तो रूममध्ये तयार व्हायला आला.. या सर्वांचे व्यवस्थापन करणारा मॉडेल्सना ट्रेन करणारा मॅडी एलोरा आली नाही म्हणून काळजीत सतत कॉल करत येरझारा घालत होता..


“ एलोरा अब तक आई क्यू नही. कितनी बार बोला उसे टाइम पे पहुंचना है .. हद कर दी इस लडकी ने. थोडी देर मे शो शुरू होने वाला है।”  तो बडबडत कॉल लावातहोता..

“ मैंने सुना है आशुतोष सर भी हमारे साथ वॉक करने वाले है ।” 

“ या इट्स ट्रू ..”

“ वॉव यार ..” त्या मॉडेल्स खुसफुसत होत्या.. 

तितक्यात एलोरा ही धावत आली.. 

“ सॉरी मॅडी …” ती छोटा चेहरा करत म्हणाली… ती पटकन मेकअपरूम मध्ये गेली.. दिलेला ड्रेस वेअर करून ती समोर चेअरवर बसली ब्युटिशियन तिचा त्यानुसार मेकअप करत होत्या. ती आणि बाकीचेही सर्व मॉडेल्स रेडी झाल्या. मॅडी सर्वांना नेहमी सारख्याच सुचना देत होता.

 
“एव्हरीवन इज रेडी टू गो ऑन स्टेज?” 

“ येस .” सर्वच एकत्र म्हणाले.. 

शो च्या होस्टने सगळ्यांच स्वागत केले..

“ welcome to Abhyankar fashion world New collection.”

लाईट कॅमेरा म्युझिक सुरू झालं आणि एलोरा चेहऱ्यावर हास्य  भरपूर आत्मविश्वासाने स्टेजवर एका चालीत समोर आली.. तिच्या पाठोपाठ एक एक मॉडेल्स चालत समोर आले. त्याची चालण्याची लकब त्यांचा पेहराव खूप सुंदर तितकचं आकर्षक दिसत होतं. अभ्यंकरच्या नवीन कपड्यांचा कलेक्शनचे सुंदर प्रदर्शन त्यांच्यात हावभावात प्रत्येक चालीत दिसत होता.. नवीन लॉन्च केलेल्या ड्रेसची रंगसंगती सुबक नक्षीकाम सर्वांच्या पसंतीस उतरल्या होत्या.. त्या आत गेल्या नंतर मेल मॉडेल्स स्टेजवर आले..  सर्वांनाच हे नवीन महिला पुरुषांचे आऊटफिट आवडले होते. आजपासून ते मार्केट येणार होते.. पहिल्यांदाच विश्वराज या फॅशन इंडस्ट्रीमध्ये उतरला होता.  पहिलाच ब्रॅन्ड घेऊन तो आला होता.. आणि यामागे एकमेव कारण भक्तीला इकडे परतण्यासाठीच या क्षेत्रात उतरला होता.. आजचा पहिला फॅशन शो करत पारंपारिक वेडिंग कलेक्शन लॉन्च झाला होता. त्याचा पहिला शो यशस्वी पार पडत होता.. मध्ये थोडावेळ विश्रांती घेऊन पुन्हा शो सुरू करण्यात आला.. त्यातूनच नवीन युनिक कलेक्शन वेअर करून मुली स्टेजवर रॅम्पवॉक करत आल्या. सुपरस्टार  आशुतोष केळकर सुंदर अशा अटायर मध्ये तयार होऊन स्टेजवर रॅम्प वॉक करत आला. उत्साही तरुणी वर्गाने तो आल्यावर टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.. शेवटी सुंदर कलेक्शन करणाऱ्या डिझानयरचे नाव घेण्यात येऊन तिला स्टेजवर बोलवण्यात आले.. 
पडद्यामागे राहणारी भक्ती रणदिवे ही आताही समोर आली नव्हती.. त्याबदल्यात लिली स्टेजवर जाऊन आली.. तिच्या मॅडमासाठी वाजणाऱ्या टाळ्या बघून भारावून गेली..  

“ मॅम तुम्ही स्टेजवर यायला हवं होत.” लिली अपडेट घेत असणाऱ्या भक्तीशी बोलत होती.. 

“ पळपुट्या लोकांना जगासमोर यायला नेहमी भिती वाटत असते.” विश्वरान फोनवर असलेल्या लिली जवळ येऊन बोलला.

“तुमच्या मॅडमांना ही भिती  वाटत असेल.” तो पुन्हा  उपहासात्मक पणे म्हणाला.

 जेणे करून पलीकडून ऐकणाऱ्या भक्तीला ऐकू जावं. असं बोलून त्याने तिला डिवचलं होतं.. भक्ती ऐकून रागात श्वास घेत होती.


“ माझी मॅडम कुणाच्या बापाला घाबरत नाही..” भक्तीच्या आधीच लिली ऍटिट्युड मध्ये विश्वराजला म्हणाली.. 

“ कुणाच्या बापाला घाबरत नसेलही पण आपल्या मुलाच्या बापाला मात्र घाबरते.” तो गालात हसत पुन्हा भक्तीला डिवचत म्हणाला. त्याचा बोलण्याचा रोख भक्तीला समजला होता… 

“ वेट अ फाईव्ह मिनिट्स.” भक्ती पलीकडून म्हणाली..
“ काय म्हणालात ?” लिलीने विचारले.

“ आय अम कमिंग.” भक्तीने फोन कट केला.. ते ऐकून विश्वराजचे ओठ हलकेच रुंदावले होते. लिली ही एक भूवई उंचवून हाताची घडी घालून ऐटित त्याच्याकडे बघत होती.. 


“ एवढुशी दिसते, केवढं बोलतेस आणि ऍटिटयूड तर एवढा तुझ्या मॅडमा सारखाच . नवऱ्यालाच मागे फिरायला लावणार माझ्यासारखं.” विश्वराज अंगठा आणि तर्जनी मधील अंतर  दाखवला. त्यानंतर हाताचा पंजा इतक अंतर दाखवलं आणि पुढे तर दोन्ही हातांमधल अंतर दाखवत म्हणाला. त्याच्या बोलण्यावर लिली मांजरीसारखे बारीक डोळे करून त्याच्याकडे बघत होती.

“ त्यांच्या सोबत राहते तर वाण नाही पण गुण तर लागतीलच आणि नवऱ्याने बायकोच्या मागे नाही तर काय दुसऱ्याच्या बायकोच्या मागे फिरावं? .. दुसऱ्या मुलीच्या मागे गेला तर अजिबात सोडणार नाही त्याला असा बुकलून काढेन नं …” लिली न झालेल्या नवऱ्यावर तोंडसुख घेत होती.

“ अगं बाई थोडी तरी दया कर त्या न झालेल्या नवऱ्याची .”  

लिली ने नाक मुरडलं आणि दोघेही हसले.. 

क्रमश ...


आधी तर लिहलेला पूर्ण भाग डिलीट झाला. मग लिहायला मन रमत नव्हतं. सध्या मोबाइलची अवस्था खूप खराब झाली आहे..
असं काही नाही की मला राग आला. राग यायचा प्रश्न काय आहे? मला तुमच्या मतांचा आदर आहे.भाग वेळवर येत नसल्याने तुमची नाराजी समजू शकते. आणि रिप्लाय देण्याच तर मध्येच मोबाइल बंद होतो तर ॲपमधून बाहेर पडते. म्हणून रिप्लाय करायला जमत नाही.ताप्तुरती चालू झाला आहे पण किती वेळ राहिल सांगता येत नाही आणि खरच तुमच्या गैरसोय मी दिलीगरी व्यक्त करते.. क्षमा असावी माझ्या वाचक मैत्रिणींनो .. कमेंटचे स्वागत आहे. कथा आवडत असल्यास प्लिज अभिप्राय कळवा..

🎭 Series Post

View all