Login

भेटली तू पुन्हा! भाग - तेहतीस

भक्ती विश्वराज
भेटली तू पुन्हा !

भाग - 33


“ नानू , पाणीपुरीने कुठे पोट भरत का ? नाही नं.. मग सांगा मम्माला सकाळी पण जेवली नाहीये ती.. अनहेल्दी फूड खाऊ नये.” राज गाल फुगवत रागात बोलला..

“ तुझ्यापर्यंत आल्या वाटतं बातम्या .” ती हळूच पुटपुटली . तिने रावसाहेबांकडे पाहिलं . त्यांनी हसत खांदे उडवले.

“ ओय माझा बच्चा गाल नको फुगवू .” तिने त्याच्या गालावर ओठ टेकवले.

“ नको ना रागवू पिल्लू .. कित्ती कित्ती दिवसांतून आज पाणी पुरी खाल्ली मी.. ती पाणीपुरी खरचं इतकी टेस्टी होती ना की मग मला राहवलच गेलं नाही. मी खातच गेले. अगदी पोट भरेपर्यंत पाणीपुरी खाल्ली.. नेक्स्ट टाईम मी तुला ही सोबत घेऊन जाईल मग आपण जास्त प्लेट पाणीपुरी खाण्याची स्पर्धा करू आणि त्यात मीच जिंकून दाखवेल बघच तू .” ती हसून बोलली.

“ ओहहो मम्मा मी काय त्यासाठी रागवलोय का?” त्याने त्याच्या कपाळावर हात मारला.

“ मग कशासाठी रागवला आहेस ?”

“ तू जेवण का स्किप केलसं ?” तो कपाळावर आठ्या पाडून म्हणाला..

“ अरे पिल्लू मी बाहेर गेले होते ना मध्येच कसं जेवण करू. यापुढे पुन्हा असं करणार नाही.. सॉरी.” तिने तिचे दोन्ही कान पकडून बोलली. राजने पटकन तिचे हात खाली घेतले.

“ मम्मा तू ना कधी कधी मला लहान मुलीसारखी वाटते.” तो तिच्या गळ्यात हात घालून हसून बोलला..

“ आम्हाला तर त्याच्यांत अजूनही लहान खोडकर मुलगी दिसते. रावसाहेब हसत म्हणाले..

“ बाबा .” तिने नजरेनेच तक्रार दाखवली.

“आणि यापुढे जेवण अजिबात स्किप करायचं नाही..” तो तिला दटावत होता. तीही लहान मुलीसारखी मान हलवून होकार देत होती..

“ ओके . गुड गर्ल.” गमतीतच त्याने तिचे गाल ओढले..

“ राज आज नानू जवळ झोप. रात्री मला वर्क करायचं आहे.” त्याने मान डोलवली.

“ मिठ्ठू रात्री जास्त जागे राहू नका.”

“ हो बाबा.”


त्यांच्यासोबत कसेबसे दोन घास ढकलून ती तिच्या कामाच्या रूममध्ये आली.. डिझाइन पाहून तिने कापड कट करायला सुरवात केली. बोटांमुळे त्रास होत होता पण काम करणं गरजेच होत. खाली कपडा पसरवून डिझाईन नुसार एक एक भाग कट करून पुन्हा पिना अडकवून दिल्या. या कामात सकाळचे चार वाजले. आता हात आणि कंबर भरल्यामुळे तिने उभ राहून हात पाय स्ट्रेच केले आणि रूमच दार लावून ती तिच्या रुममध्ये गेली.. बेडवर तिने स्वतःला झोकून दिलं. डोळे तर बेडवर गेल्यावरच बंद झाले. सकाळी राजच्या चुळबुळी मुळे आणि सुंगधित वासाने तिला जाग आली.. जडावलेले डोळे जबरदस्तीने उघडायचा प्रयत्न करत होती. डोळे उघडून पाहिले तर समोर ताजे सुवासिक फुलांचा गुच्छ घेऊन राज बेडवर बसून तिच्या उठण्याची वाट बघत होता..

“गुड मॉर्निंग मम्मा.” राज फुलांचा गुच्छ तिच्या समोर धरला. ती हसाली

“गुड मॉर्निंग पिल्लू.” तिने गुच्छ हातात घेऊन राजलाही मिठीत घेतले.

“आज सकाळी हे फुल का?”

“ मम्मा काल मी जरा रागवून बोललो तुझ्याशी म्हणून.”

“ गुणी माझं बाळ ते.” तिने पटापट त्याच्या गालावर कपाळावर ओठ ठेवून पापे घेतले..

“ तू नाराज नाहीस ना ?” त्याने तिची हनुवटी धरून बोलला.

“ अजिबात नाही. या लाडोबावर मी का नाराज होवू.” तिने पुन्हा त्याला छातीशी कवटाळून घेतले.



सकाळ प्रसन्न झाल्याने सर्वांसोबत नाश्ता करून ती बुटिककडे निघाली. गाडीतून उतरून ती आत आली. सगळेच आपआपले काम डेडिकेशनने करत होते.. लिली ही तिच्या कामात मग्न होती म्हणून तिच लक्ष नव्हतं. तिला आवाज न देता ती तिच्या केबिनमध्ये आली. आल्याबरोबर ऑफिस मधल्या दादाने तिला मसाला चहा आणून दिला..
“ थॅक्यू दादा ..” म्हणून तिने कप ओठाला लावला. एक घोट घेतल्यावर छान वाटलं..

“ डीलर सोबत बोलण झालयं माझं. लवकरच मालाची डिलीव्हरी होईल..” ती आत आल्या आल्याच म्हणाली.. लिलीने भक्तीकडे निरखून पाहिलं.

“ ओह्ह हो .. केसात गुलाब माळलाय आणि गुलाबी गुलाबी दिसाताय. उफ्फ ! ये गालातलं हसू वेगळचं काही सांगतेय आज काय स्पेशल आहे. सरांनी दिला की काय वॉव! ..” आनंदाने तिचे डोळे चमकत होते. “ कित्ती आनंदाची बातमी आहे. सरांसोबत पॅचअप झाल पण कधी ? मला नाही सांगितल तुम्ही?” ती उत्साहाने मोठ्यानेच बोलली नंतर मला सांगितल नाही म्हणून गाल फुगवून बसली..


“ अग हळू जरा आणि पहिलं तुझ्या वायफळ प्रश्नांच्या गाडीला जोरदार ब्रेक मारं.” भक्ती म्हणाली तसं फुगलेलं गाल अधिकच फुलले.

“ का ब्रेक मारू.. ही बातमी ऐकून मला तर नाचावसं वाटतयं. माझ्या आनंदावर विरजण पाडू नका..” ती नाक मुरडत बोलली.

“लिलावती बाळा हा केसात माळलेला गुलाब राजने सकाळी दिलाय आणि गालातलं मंद हसू ही त्याच्यामुळेच गालावर दिसतयं. आज उठल्या उठल्या डोळ्यांसमोर फुलांचा बुके घेऊन साहेब हजर होते.. काल जरा रागवून बोलला सॉरी म्हणून बुके होता..” आताही त्याच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव आठवत तिच्या ओठांवर स्मित पसरलं होतं.

“सकाळी इतकी सुंदर प्रसन्न झाली ना माझी. मी नाराज होऊ नये म्हणून इतके प्रयत्न केलेत. मी खरंच खूप भाग्यशाली आहे. त्याने आई म्हणून माझी निवड केली. या प्रोजेक्ट नंतर मी माझा वेळ माझ्या बाळाला देणार आहे. आता लवकरच पिल्ल्याचा पाचवा बर्थडे येणार आहे पण वयापेक्षा जास्तच हुशार आणि समजूतदार झाला आहेस माझ. आणि राहिली गोष्ट त्या खडूस चिडलेल्या सरांची तर ते मला आता असे गिफ्ट देऊन सप्राईज करणं अशक्य आहे. डोक्यात नुसता राग भरला असणार … म्हणून तर ऐकायला आणि भेटायला तयार नाहीत. मी बोलायला जातेय ते फक्त माझ्या बाळासाठी. त्याला वडिलांच प्रेम मिळावं .पण अजूनही मी त्यांना माफ करणार नाहीये.” बोलतांना तिने चेहरा वळवला. लिलीने तिच्या खांद्यावर हात ठेवला.

“ मॅम होईल सर्व ठीक .” लिली धीर देत होती.

“ हम्म .” भक्ती वळली. लिलीला तिच्या डोळ्यांच्या कडा ओलसर दिसल्या.

“ बरं . ते बाकीच्या डिलर सोबत बोलणं झाल?” तिने विषय बदलवला.

“ एका सोबत झालाय बाकीच्यांना करते फोन ..”

“ ओके. मग मी निघते. वेळ दिला तर बरेच होईल.”

“हो जा तुम्ही मी बघून घेईल सर्व..” भक्ती जाण्यासाठी पर्स घेऊन निघाली. .

“ एक मिनिट काहीतरी विसरलात.” लिलीच बोलणं ऐकून भक्ती जागेवरच थांबली..

भक्ती काय विसरली असेल? तुम्हाला माहिती आहे का?

भेटूया पुढच्या भागात.


तुम्हाला उत्कंठा लागली आहे जाणून घेण्याची हे मला समजत आहे. पण मी लगेच उघड करू शकत नाही. हळूहळू एक एक कडी उलगडत जाईल.. आशा आहे की तुम्ही मला समजून घ्याल.
तुम्ही देत असलेल्या प्रतिक्रिया साठी खूप खूप आभार.
आणि पुढेही असेच प्रेम देत राहा.