भेटली तू पुन्हा !
भाग - 30
भाग - 30
आदिराज फ्रेश होऊन बाथरूममधून बाहेर आला. भक्ती ही तिथे तिची बॅग घेऊन आली तर साहेब बाहेर पळायच्या तयारीतच होते.. “ पिल्ल्या ,तुझं ताट वरच आणायला लावते?”
“ मम्मा मला भूक नाहीये . मला नानूंना सगळ सांगायचं. भूक लागली तर खाऊन घेईल मी. तू जेवण करून आराम कर.” तो बोलून पटकन नानूंच्या रूमकडे निघाला. रूम मध्ये आल्यावर त्याने पाहिले की त्याचे नानू फोनवर बोलत होते..
“नानू ..”त्याने आवाज दिला.
“ राज या ना . मग सांगा काय काय धमाल केली.” रावसाहेबांनी कुतूहलाने विचारले. आदिराजने तिथे गेल्यापासून तर सर्व एक एक सर्व सांगू लागला. विश्वराजबद्दल ही बोलून झालं.टॅब घेऊन ते तिथले एक एक फोटो दाखवत होता.. त्याचा आणि विश्वराज दोघांचा व्हिडिओ ही दाखवला. त्या व्हिडिओमध्ये दोघेही अत्यानंदाने नाचत होते.. दोघांच्या चेहऱ्यावर हास्य कायम होते. रावसाहेब कौतुकाने मन लावून ऐकत आदिराजच्या चेहऱ्यावरची चमक बघत होते.
‘धक्का तर त्यांना बसलाच आहे. जेव्हा आपला मुलगा समोर असून बाबा ऐवजी अंकल म्हणत असेल किती यातना होत असतील त्यांच्या मनाला एक बाप म्हणून मी समजू शकतो विश्वराज..’ ते व्हिडिओ बघत मनात विचार करत होते. इकडे ऑफिसात ही विश्वराज तोच व्हिडिओ बघत होता.. व्हिडिओ बघतांना त्यांच्याही चेहऱ्यावर प्रसन्न हसू आलं होतं
.
भक्ती ही फ्रेश होऊन बाहेर आली.. मेलला रिप्लाय ही द्यायचा होता.. विचार करून डोकं दुखायला लागलं होतं.. कडक चहा पिऊन बरं वाटेल म्हणून ती खाली आली.. किचनमध्ये जाऊन तिने स्वतःसाठी चहा करायला घेतला.. चहा कपात ओतून ती तिच्या रूमच्या बाल्कनीत गेली. बाल्कनीत पहिलीच नजर समोरच्या बंगल्यात गेली.. तो इथे नसणार याची तिला खात्री होती.. दार बंद होते. तिने नजर वळवली आणि बाहेरच समुद्र बघत चहा पिऊ लागली.. चहा पिऊन जरा तरतरी आली. तिने लॅपटॉप उघडून काम करायला लागली. नवीन डिझाईन बनवून कापड मटेरियल सर्व गोष्टीचा बारकाईने विचार करत होती.. या गडबडीत सूर्य मावळून अंधारल्या गेलं होतं. तिने मेलला रिप्लायच दिला नसल्याचे तिच्या लक्षात आले नव्हते.. लॅपटॉप बाजूला ठेवून जडावलेली मान आणि पाठ तिने मागे टेकवले. बाहेर गार वारा अंगाला स्पर्शत असल्याने तिने डोळे बंद केले. त्यातच तिला कधी झोप लागली तिला कळलेच नाही. इकडे राज ही नानूंसोबत गप्पा करतच त्यांच्या मांडीवर निजला होता..
.
भक्ती ही फ्रेश होऊन बाहेर आली.. मेलला रिप्लाय ही द्यायचा होता.. विचार करून डोकं दुखायला लागलं होतं.. कडक चहा पिऊन बरं वाटेल म्हणून ती खाली आली.. किचनमध्ये जाऊन तिने स्वतःसाठी चहा करायला घेतला.. चहा कपात ओतून ती तिच्या रूमच्या बाल्कनीत गेली. बाल्कनीत पहिलीच नजर समोरच्या बंगल्यात गेली.. तो इथे नसणार याची तिला खात्री होती.. दार बंद होते. तिने नजर वळवली आणि बाहेरच समुद्र बघत चहा पिऊ लागली.. चहा पिऊन जरा तरतरी आली. तिने लॅपटॉप उघडून काम करायला लागली. नवीन डिझाईन बनवून कापड मटेरियल सर्व गोष्टीचा बारकाईने विचार करत होती.. या गडबडीत सूर्य मावळून अंधारल्या गेलं होतं. तिने मेलला रिप्लायच दिला नसल्याचे तिच्या लक्षात आले नव्हते.. लॅपटॉप बाजूला ठेवून जडावलेली मान आणि पाठ तिने मागे टेकवले. बाहेर गार वारा अंगाला स्पर्शत असल्याने तिने डोळे बंद केले. त्यातच तिला कधी झोप लागली तिला कळलेच नाही. इकडे राज ही नानूंसोबत गप्पा करतच त्यांच्या मांडीवर निजला होता..
फोनच्या रिंगने भक्तीला जाग आली. जाग येतच तिने बाहेर अंधार बघितला. टेबलवरचा मोबाइल उचलून कानाला लावला..
“ हा बोल लिली.” तिचा आळसवलेला आवाज .
“ मॅम तुम्ही झोपला होतात काय? सॉरी.”
“ हो अगं नवीन डिझाइन तयार केले नंतर जरा डोळा लागला. बोल काय म्हणतेस ?”
“त्या मेलला रिप्लाय दिला नाही मग मी देऊ का?”
“ बरं दे पाठवून मग बघू पुढे काय होतयं ते.”
“ ठीक आहे मी पाठवते लगेच .”
“ हम्म .. उद्या भेटू ऑफिसला.”
“हो.” दोघांनी फोन कट केला. फ्रेश होऊन ती खाली गेली. स्वयंपाक घरात जाऊन ती जेवणाची तयारीला लागली.. रावसाहेब आणि राज बाहेर गार्डन मध्ये होते.. जेवण बनवून तिने टेबलवर लावले.. आदिराज रावसाहेब जेवणाला बसले..
“ तिने दोघांना वाढलं आणि तिने स्वत लाही ताट वाढून घेतले. आदिराजची अधूनमधून बडबड चालू होती. जेवणं झाली तसं तिने आणि रेखाकाकूने आवरून घेतलं आणि ती तिच्या रूममध्ये काम करत बसली. नातू आजोबाची जोडी ही फिरून परतली होती.
“ मिठ्ठू आत येऊ.” रावसाहेबांनी तिला रूमबाहेरून आवाज देत विचारलं.
“ बाबा आत या ना विचारताय काय. या .”
“ काय म्हणताय बाबा काही बोलायचं होत का?”
“ हो … बोलायचं तर होतं आणि तुमच्या केसांना तेल हि लावून द्यायचं होतं. .”
“ तुम्ही कशाला त्रास करताय बाबा.. मी लावेल नंतर.”
“ एवढ्याने कसला त्रास होतोय मला. आधीही लावून देत होतोच.” तितक्यात गणू काका तेलाची वाटी घेऊन आले.
“ नानू आधी मला .” तो नानूच्या पुढ्यात बसला.
“ हो आधी तुम्हालाच.”
“ बाबा मी हे आवरून घेते तोपर्यंत.” भक्ती तिचं समोरील काम आवरू लागली. रावसाहेब त्याच्या केसांना तेल लावून देत हलक्या हाताने मालिश करून देत होते. राजचे डोळे पेंगुळायला लागले होते. डोळ्यांवर झोप यायला लागली होती.. त्यांच्या मांडीवरच त्याने मान टाकली..
“अरे झोपलेत.” रावसाहेब राजच्या केसातून हात फिरवत म्हणाले. भक्तीने त्याला व्यवस्थित झोपवून त्याच्या अंगावर पांघरले. दोघंही बाल्कनीत गेले.
“ मिठ्ठू, चला बसा तुम्ही.”
“ बाबा तुम्ही बसा मी मस्त चम्पी करून देते. छान वाटेल तुम्हाला.”
“अरे पण मी तुम्हाला लावून देतो. तुम्ही नंतर लावून द्या मला.”
“ नाही मी लावून देते आधी .” म्हणत भक्तीने तेलाच्या वाटीत हात बुडवून रावसाहेबांच्या डोक्यावर हलक्या हाताने फिरवू लागली..
“ मिठ्ठू, जादू आहे तुमच्या हातात.”
“ काही काय बाबा.”
“ चला आता तुम्ही बसा .”
“ पण बाबा मी लावेल नंतर.”
“ पण बिन नका करू मिठ्ठू. बसा बरं लवकर ..” रावसाहेब आग्रह होते. मग तीही त्याच्या समोर खाली बसली.
“ तुमचं काम कसं चालू आहे?” त्यांनी बोलायला सुरवात केली.
“ फॅशन शो अगदी महिन्यावर आलयं बाबा. लवकर सर्व ड्रेस रेडी करायचे आहेत. त्याचचं काम चालू आहे. ऑफिसला जाऊन सगळ्यांना सांगाव लागेल..”
“ फॅशन शोसाठी तर भरपूर वेळ होता मग मध्येच हे.”
“ मिस्टर अभ्यंकर रावांची कृपा .”
“ हो .”
“ हम्म ..”
“ पण आमची मिठ्ठू हे चॅलेंज पूर्ण करून जिंकूनही दाखवेल. हे मिस्टर अभ्यंकराना कुठं माहित आहे.” ते स्मित करत
“ बाबा उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका.” ती गाल फुगवत म्हणाली.
“ आम्ही खरे तेच बोलतोय.”
“ मिठ्ठू तुमचं विश्वराज यांच्या सोबत आदिराज विषयी बोलणं झालं .”
“ नाही. ते लगेच इकडे निघून आले. पुन्हा बोलणं झालचं नाही.”
“मग आल्यावर तुम्ही त्यांच्याशी कॉल करून बोलण्याचा प्रयत्न नाही केला.”
“नाही.”
“मिठ्ठू राजने आम्हला विश्वराजशी भेट त्यांना माहिती असलेलं शिवाय त्या दोघांचा नाचतानाच व्हिडिओ ही दाखवला. किती खुश होते ते दाखवतांना बोलतांना. त्यांच्याविषयी भरभरून बोलत होते. त्यांच वागणं , बोलण, कूल आहेत अगदी सांगत होते. यांना बघून माझ्या डॅडची आठवण ते पण असेच असतील का? असेच असायला हवे पण मी त्यांना हे नाही सांगू शकलो की तेच तुमचे डॅड आहेत आणि कायम राहणार आहेत. मिठ्ठू जेव्हा आपला मुलगा समोर असूनही त्याला एक बाप म्हणून मिठी मारून जवळ घेता येत नाही तेव्हा तो बाप हतबल होतो आणि त्यात आपण त्यांच्या आयुष्यातील अनमोल ठेवा हिरावून घेतला. तुम्ही आम्हाला सत्यनला शब्दात अडकवून दिलं पण यामध्ये आदिराजचा काही दोष नसतांना त्यांना त्यांच्या बाबाच्या प्रेमापासून वंचित राहावं लागत आहे. तुम्ही काही न सांगता तेव्हाची तुमची परिस्थिती आम्ही समजून घेतली तेव्हा काय घडलं होतं. कसा कट रचला होता. सर्व समजलं होतं आम्हाला.” रावसाहेब बोलत होते आणि ती वळून आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होती.
“ बाप आहोत आम्ही तुमचे. तुम्हाला त्रासात पाहून काळीज तुटतं होत आमचं. काही दिवसांनतर शोधून काढले होते आम्ही. मान्य तेव्हा त्यांच्या कडून अपराध झाला पण त्याची शिक्षा त्यांना देऊन झाली. आता नका देऊ. आज त्यांनाही खूप त्रास होत असणार आपल्या परिवारापासून दूर राहून तो त्रास दिसतोय आम्हाला लहानपणी त्यांनी बापाविना आयुष्य काढलं तेच त्यांच्या मुलाच्या वाट्याला येतं. याचा किती त्रास होत असणार .” तिच्या डोळ्यांत पाणी आलं. तिने ते लगेच पुसून काढले.
“ पण मी ही त्यांचाच सुखाचा विचार केला होता ना बाबा.” गळ्यापर्यंत दाटून आलं होतं तिला. कसा बसा आवाज स्थिर ठेवून होती..
“ हो मिठ्ठू तू ही त्यांच्या सुखाचा आनंदाचा विचार केला आणि त्यांनीही पण परिस्थिती आणि काही वाईट प्रवृत्तीचे लोक तुमच्या विरोधात होती.” ती बाबांच्या बोलण्यावर विचारात पडली..
“चला आता झोपा तुम्ही. सकाळी ऑफिसला जाणार आहात नं आराम करा .. यासर्वांत तब्येतीला जपा. हल्ली तुम्ही खूप दुर्लक्ष करत आहे.. आम्ही सगळीकडे लक्ष ठेवून असतो .” रावसाहेब तिच्या डोक्यावर हात फिरवत थोपटत म्हणाले आणि तिथून जाण्यासाठी निघाले.
“ बाबा .” भक्तीच्या हाकेने त्यांनी वळून पाहिले. ती लहान मुलींसारखी बाबांच्या कुशीत शिरली. त्यांनी ही तिला मायेने जवळ घेतले.
क्रमश ..
माझ्या सर्व वाचक मित्रमैत्रिणांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ..आणि आजचा हा भाग कसा वाटला हे कमेंट्स मध्ये लिहा. या भागात विश्वराज नव्हता तुम्ही मिस केलं का?.. लवकरच भेटू पुढच्या भागात.
धन्यवाद
©® धनदिपा सम्राट
धन्यवाद
©® धनदिपा सम्राट