भेटली तू पुन्हा !
भाग -27
थोड्यावेळा पूर्वी जेवायला म्हणून ती त्या दोघांना बोलावायला आली तेव्हा “ येस तुझी ही विश लवकरच पूर्ण होईल.” विश्वराजच्या तोंडून निघालेले शब्द तिला ऐकू आले. आदिराजही खुश होऊन लगेच त्याच्या मिठीत शिरला. त्या दोघांना बघून तिच्या मनाला समाधान वाटले.
“ राज …” आवाजाच्या दिशेने दोघांच्या माना तिकडे वळल्या.
“ मम्मा ..” राज तिच्याकडे धावत आला.
“ राज जेवायला बोलवले तिकडे.. सर्व वाट पाहत आहे..”
“अंकल चला जेवायला बसूया .” राज त्याच्याजवळ येत म्हणाला.
“ मी नंतर बसतो.” विश्वराज आदिराजला हसून म्हणाला.
“ चला आपण सोबत बसूया ना प्लिज .” तो आर्जव करत म्हणाला.
“ओके.” लगेच होकार दिला त्याने पहिल्यांदाच त्याचा मुलगा त्याला सोबत जेवणाची रिक्वेस्ट करत होता. ती तिरकस नजरेने त्याच्याकडे बघत होती आणि त्याने तिच्यावर नजर फिरवली की त्याच्याकडे दुर्लक्ष करत इकडे तिकडे बघत होती.. आदिराज विश्वराजचा हात पकडून पुढे गेला पण लगेच तो थांबला मागे वळून बघितलं त्याची मम्मा त्याला तिथेच दिसली..
“ मम्मा चल ना .” तिला तिथेच उभ राहिलेले बघून आदिराजने तिला म्हटले. दोघांचे हात एकमेकांच्या हातात होते.
“अं.. हो …” कसेबसे तिने तोंडातून शब्द बाहेर काढले आणि तिही त्याच्या मागे गेली.
त्यांच्या मागे चालणारी भक्ती त्याच्यां सोबतच चालू लागली. आदिराज बोलतच त्याने दुसऱ्या हाताने भक्तीचा हात पकडला. मम्मा डॅडच्या हात पकडून तो डॅडशी बोलत होता. भक्ती मात्र शांत झाली होती. त्यांची वाट बघणाऱ्या लिलीने त्या तिघांना एकत्र येतांना बघून पटकन मोबाइल काढत पटापट दोनचार फोटो क्लिक केले. सुरजित अनन्या त्यांची वाट बघत होते.. आधीच त्यांचे टेबल राखून ठेवले होते.. ते बघून विश्वराजला खूपच ऑकवर्ड वाटले.
“मिस्टर सिंग प्लीज डोन्ट बी फॉर्मॅलिटी.”
“मिस्टर अभ्यंकर माझ्या म्हणण्यावर तुम्ही पहिल्यांदा इकडे आलात आणि पाहुण्यांच आदरातिथ्य करणं परंपरा आहे आमची.”
“पण उत्सवमूर्ती तुम्ही दोघं आहात मिस्टर ॲड मिसेस.. .”
“.. ..” सुरजित चेअर कडे निर्देश करत म्हणाला.
सर्व टेबलावरती बसले. अनन्या आणि सुरजित उत्सवमूर्ती असल्याने मध्ये बसले होते.
सजवलेल्या ताटात शाही पदार्थ ठेवले गेले होते. प्रिया राजश्री अनन्याच्या बहिणी त्याना उखाणा घेऊन घास भरवायला म्हणत होत्या.. दोघांनी एकमेकांना उखाणा घेत पहिला घास भरवून घेतला.. जेवण झाल्यावर अनन्याची पाठवणीची तयारी केली गेली.. ममता यांना अश्रू अनावर झाले. बाबांची ही अवस्था वेगळी नव्हती.. सुरजित अनन्याचे लव मॅरेज असले तरी आई बाबांसाठी मुलीची पाठवणीचा क्षण खूप हळवा असतो. ती रडत सगळ्यांना भेटत होती. भक्ती जवळ येऊन तिने तिला मिठी मारली.
सजवलेल्या ताटात शाही पदार्थ ठेवले गेले होते. प्रिया राजश्री अनन्याच्या बहिणी त्याना उखाणा घेऊन घास भरवायला म्हणत होत्या.. दोघांनी एकमेकांना उखाणा घेत पहिला घास भरवून घेतला.. जेवण झाल्यावर अनन्याची पाठवणीची तयारी केली गेली.. ममता यांना अश्रू अनावर झाले. बाबांची ही अवस्था वेगळी नव्हती.. सुरजित अनन्याचे लव मॅरेज असले तरी आई बाबांसाठी मुलीची पाठवणीचा क्षण खूप हळवा असतो. ती रडत सगळ्यांना भेटत होती. भक्ती जवळ येऊन तिने तिला मिठी मारली.
“ ये माऊ कुठे निघालीस तू आणि रडते का? थोड्यापूर्वी तर ‘ हॅपी होतीस ?” राज अनन्याजवळ येऊन तिला रडलेलं बघून विचारत होता .
“ हे तुझे अंकल घेऊन चालले मला .” तिने सुरजितकडे बघत म्हटले.
“ का ?” राजने सुरजितला विचारलं .
“ लग्न झालं न आता मग सासरी जावं लागेल तिला .”
“ अंकल मग लग्न तर तुमचं ही झालं मग तुम्हीही तुमच्या सासरी जायला पाहिजे. .”
“ हो … ही हिच्या सासरी मी माझ्या सासरी जातो.” सुरजित त्याला हसून म्हणाला तसे सगळे हसायला लागले.
“ माऊ रडू नकोस. तुला जर नाही जायचं तर नको जाऊस पण प्लिज रडू नकोस. मला नाही आवडत असं रडलेलं..” आदिराज अनन्याचे अश्रू पुसत म्हणाला तसं अनन्याने त्याला मिठीत कवटाळून घेतले..
“ नाही रडत .” अनन्याने तिचे डोळे पुसून त्याच्या कपाळावर ओठ टेकवले..
“ आय मिस्ड यू पिल्लू.”
“ मिस्ड यू टू माऊ. तू मला भेटायला येशील ना?” तिने मान डोलवली आणि त्याच्या गालावर ओठ ठेवले.. अनन्या भक्तीजवळ येऊन तिच्या मिठीत शिरली.
“ आज सगळं समोर आले असेल त्यांच्यासोबत बोलून सोल्व करून घ्या राजसाठी.” भक्तीला ऐकू जाईल इतक्या हळू आवाजात ती कानात बोलली.
“ हम्म..” अनन्या सगळ्यांचा निरोप घेऊन गाडीत बसून निघून गेली.. ममता दूर जाणाऱ्या गाडीकडे बघत उभ्या होत्या. भक्तीने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून थोपटले.. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते..
“ काकू .. जीजूचं खूप प्रेम आहे अन्यावर.. नका काळजी करू.” ती बोलत त्यांना आत घेऊन आली.. लिली आणि राज रूममध्ये गेले होते.. सुरजित सोबत बोलून विश्वराज निघण्याच्या तयारीत होता.. रूममध्ये आल्यावर विश्वराजने अमरला सुचना देत बॅग पॅक करायला सुरवात केली..
“ एका तासात आपण निघतोय.” आवाजाच्या टोनवरून आपल्या बॉसच काहीतरी बिनसलेलं दिसून आले.
“ ओके सर.”
“ उद्या पोस्ट पॉन केलेल्या मिटिंगचे शेड्युल अरेंज कर. आणि हो मला न विचारता माझा टाइम कोणालाच देऊ नको.इट्स द्याट क्लियर.” तो थोडं रागातच बोलत होता.
“ येस सर.” अमर बाहेर निघून गेला.. विश्वराजचा फोन वाजला. त्याने नंबर बघितला पटकन उचलून कानाला लावला.
“ बेटा तुम्ही फोन केलेत . आम्ही तेव्हा महाराजांच्या मठात होतो.”
“ बाबा .. मला मुलगा आहे हे का लपवलतं माझ्यापासून .. का सांगितलं नाही बाबा मला .. का? … माझा परिवार असूनच मी त्यांच्यापासून इतके वर्ष दूर राहिलो? आज माझ्यासमोर माझा मुलगा उभा राहिला पण माझं दुर्देव बघा की त्याचा बाप असूनही त्याला माहिती नाही की मी त्याचा बाबा आहे. चुकीच काहीही न करता मी शिक्षा भोगत राहिलो आणि भोगतोय. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती बाबा..” तो उदिग्न स्वरात म्हणाला.
“ विश्वराज ऐकून घ्या माझं..”
*बाबा तुम्ही या बाबतीत तिला काहीच म्हटले नाहीत.. ” त्याच्या शब्दात तक्रार होती.
“ विश्वराज शांत व्हा ! आधी ऐकून घ्या माझं. तुम्ही इथे या बोलूया आपण. ” विश्वराजने फोन कट करून ठेवून दिला.. हताश होऊन तो बेडवर बसला. आदिराजचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर फिरत होता.. आदिबद्दल जी ओढ जाणवत होती त्याचं उत्तर त्याला मिळालं होत. अस्वस्थ राग घेऊन तो बेड वर बसला. रुमच्या बाहेर आलेल्या अमरला भक्ती पॅसेजमध्येच दिसली.. भक्ती त्याच्या समोर उभी राहिली..
“ कोणती रूम?” भक्ती
“ मॅम सरांनी डिस्टर्ब करायला नाही सांगितले प्लिज आत जाऊ नका .. सद्ध्या ते खूप चिडलेले आहेत.” अमर भक्तीला त्या रूममध्ये जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न करत होता.
“ प्लिज..” भक्तीने त्याला विनंती केली.. एकीकडे बॉस एकीकडे त्यांची पत्नी कोणाचं ऐकावं आणि त्याच्या मनाने भक्तीचं ऐकण्याचा कौल दिला. अमरने रूमची चावी तिच्या जवळ दिली.
“ थॅक्यू.” भक्ती छानशी स्माईल देत म्हणाली. ती तिथून निघाली.
‘हि तर माझ्याच रुमच्या पलीकडची रूम आहे.’ ती रूमकडे जात होती.. तिने दाराला चावी लावून फिरवली. नॉब फिरवला तसा दार उघडल गेलं. आवंढा गिळत तिने आत पाऊल टाकले.. हॉल शेजारीच एक रूम होती . ती त्याची बेडरूम होती.. तिने दारावर टकटक करून वाजवलं काही क्षणांत तिने दार आत ढकलले.
“ अमर तुला मी डिस्टर्ब करू नको म्हणालो होतो.” विश्वराज आवाजात जरब आणत म्हणाला.. पण विश्वराज दरवाजाकडे पाठ असल्याने त्याने वळून बघितले नव्हते.
“गो अवे ॲन्ड डोन्ट डिस्टर्ब मी .” विश्वराज मागे न वळता म्हणाला पण, जेव्हा त्याच्या आवाजाला प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा त्याने मागे वळून पाहिले.. भक्ती त्याच्यासमोर उभी होती.. तिला समोर बघून त्याच्या डोळ्यांत राग जमा झाला..तिच्याकडे बघतच त्याने पॉकेटमधून फोन काढून कॉल केला..
“ तुला एकदा सांगितलेलं कळत नाही. माझा वेळ कोणालाही देऊ नको म्हणून बोललो होतो न तुला पण, तुला माझी ऑर्डर फॉलो करायची नाहीये तर ठिक आहे. आता ऑफिसला येण्याची गरज नाही. यु आर फायर.” त्याने फोन कट करून ब्लेझरच्या खिशात खुपसला.
“वि.. विश्वराज ..”
क्रमश ..
पुढचा भाग लवकर पाहिजे असल्यास पटापट कमेंट करा. लवकरच भेटू पुढच्या भागात जमल्याच उद्याच. कमेंट करायला जर विचार करत असाल तर मी ही फक्त विचारच करेल. चला तर मग भराभर कमेंट करा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा