Login

भेटली तू पुन्हा ! भाग - सात

दुरावलेले दोघे
भेटली तू पुन्हा !

भाग - सात


“मिठ्ठू, अकरा वाजलेत घरी केव्हा येणार आहेस . मुलगा आणि म्हातारा बाप काळजी करत असतील याचं भान राहिलं नाही का तुला.. मुलगा समजूतदार आहे तक्रार करत नाही म्हणून इतकंही गृहीत धरून त्याला दूर ठेवू नकोस. या वयात लहान मुलांना आईवडिलांचा सहवास पाहिजे असतो. बाप जवळ नाही पण त्याच्या आईने तरी त्याला वेळ देणं गरजेचं आहे. फार कोमजून गेलयं माझं बाळं. कामाच्या वाप्यात एक आई आहे विसरू नकोस मिठ्ठू.” रावसाहेब बापाच्या काळजीने भक्तीची कानउघडणी करत होते. जाणीव करून देत होते. राजला आईवडिलांची गरज आहे. हे बोलण्यातून समजावत होते.

“सॉरी बाबा यापुढे असं होणार नाही सॉरी .” ती रडवेल्या आवाजात म्हणाली.

“तुम्ही दोघं जेवलेत का?”

“हो.. मम्मा आल्यावर सोबतच जेऊ बोलत होता. पण मी समजाऊन खाऊ घातले त्याला..”

“इथून निघालेच बाबा मी .”

“ व्यवस्थित ये.”

“ हो.” फोन कट करून ती आणि लिली पार्कींगमध्ये आल्या.. भक्ती गाडी काढायला गेली पण गाडी काही स्टार्ट होत नव्हती. तिने खूप वेळा प्रयत्न केला पण गाडी चालू व्हायचं नाव घेत नव्हती. “आधीच उशीर झाला आहे आता आणखी होईल.” भक्ती वैतागत बडबडत होती.


“मॅम चला पुढे आपण कॅबने जाऊ.” लिली म्हणाली. भक्तीने तिला संमती दिली. भक्तीने गाडी लॉक करून गेट कडे वळल्या.

“मॅडम गाडी बिघडली मग आता घरी कसे जाणार?” सिक्युरीटी गार्डने त्याने बाहेर उभे पाहून विचारले.

“कॅब बुक केलीय काका.” लिली

“मॅडम, इतक्या रात्री कॅब ने नका जाऊ.”

“आज पर्याय नाही काका. ड्रायव्हरला बोलावलं असतं पण तो आधीच सुट्टी वर गेलाय. बाबांना सांगितले तर आणखी काळजी करत बसतील.” तितक्यात एक गाडी त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली. गाडीची काच खाली झाली.

“what happened .” तो भक्तीकडे बघत म्हणाला पण भक्तीने त्याच्याकडे एक नजर वर करून ही बघितलं नाही. तिने गाडी आधीच ओळखली होती. ती कॅबची वाट बघत होती. कॅब यायला अजून वेळ होता. बिचारी लिलीच गाडी जवळ गेली.

“सर, आमची गाडी खराब झाली आम्ही कॅबची वाट बघतोय.”

“ओके. चला सोडतो तुम्हाला.” विश्वराज भक्तीकडे बघत म्हणाला.

“काही गरज नाही लिली कॅब येईल थोड्यावेळात आपण जाऊ.” भक्ती नाक फुगवून म्हणाली.

“ मी सोडतोय तुम्हाला.” तो राग आवरत पण स्पष्ट स्वरात म्हणाला.

“लिली.” आता तर त्याच्याही रागात भर पडत होता. विश्वराजने कपाळावर दोन बोटे घासली आणि लगेच गाडीतून खाली उतरला.

“लिली तुला काही …” भक्ती बोलतच होती की, विश्वराज तिच्यासमोर येऊन उभा राहिला.

“it's too late. It is not safe to go by cab.” त्याच्या आवाजात एक प्रकारची जरब होती..

“do you understand.” तो एक एक पाऊल पुढे टाकत म्हणाला. जशी तो तिच्याकडे एक एक पाऊल टाकत होता तशी ती एक एक पाऊल मागे जात होती.

“understand.” त्याच्या डोळ्यात राग दिसत होता. त्याच्या डोळ्यातील राग पाहून तिने खाली वर मान हलवली. ती चूपचाप गाडीत मागच्या सिटवर जाऊन बसली. बाजूला पाहिलं तर लिली आधीच बसलेली दिसली..

“ही कधी बसली.” भक्ती मनातच बोलली.

“मी ड्रायव्हर नाहीये.” तो मोठ्यानेच म्हणाला. लिली तर खाली मान घालून बसली ती वर पाहतच नव्हती. भक्ती धूसफूसतच फ्रंट सिटवर जाऊन बसली. त्याने गाडी स्टार्ट केली.. ती खिडकीच्या बाहेर बघत होती. गाल फुगलेलेच दिसत होते. भक्तीचा चेहरा पाहून त्याला गाल ओढून त्यावर ओठ टेकवून मिठीत घ्यावे वाटत होते. इतकी ती क्यूट दिसत होती. तिला पाहून तो गालात हसत होता. गाडी थांबली भक्तीने वळून पाहिलं. लिलीचं घर आलं होत.

“थॅक्यू यू सो मच सर, गुडनाईट.” लिलीने विश्वराजचे आभार मानले.

“गुड नाईट मॅम.” लिली निरोप घेऊन गेली.

“गुड नाईट .” त्याने पुन्हा गाडी चालू केली. भक्तीचा मोबाइला वाजला.

एन्जॉय युअर लॉग ड्राइव्ह आणि डोळे मारण्याचा इमोजी असलेला मॅसेज स्क्रिनवर झळकला..


“हॅऽऽ.. लॉग ड्राईव्ह.. तेही या खडूस चिडक्या बोक्यासोबत ..घरापर्यंत जाणं मुश्किल आहे. किती अवघडलेपणा वाटतेय.. आणि ही माकडतोंडी म्हणतेय एन्जॉय युअर लाँग ड्राइव्ह.” ती मनातच वैतागत बडबड करत होती पण ओठांची हालचाल मात्र होत होती. अचानक गाण्याचा आवाज आला. विश्वराजने गाडीतील म्युझिक सिस्टीम वर हळू आवाजात गाणे लावले होते.

आओगे जब तुम ओ साजना
अंगना फूल खिलेंगे
बरसेगा सावन झूम झूमके
दो दिल ऐसे मिलेंगे

नैना तेरे कजरारे हैं, नैनों पे हम दिल हारे हैं
अनजाने ही तेरे नैनों ने वादे किए कई सारे हैं
साँसों की ले मद्धम चलें, तोसे कहे
बरसेगा सावन...

चंदा को ताकूँ रातों में, है ज़िन्दगी तेरे हाथों में
पलकों पे झिलमिल तारें हैं, आना भरी बरसातों में
सपनों का जहाँ, होगा खिला खिला
बरसेगा सावन…

उस्ताद राशिद खान त्याच्या सुमधूर आवाजातून विश्वराजच्या मनातील भाव सांगत होते... तो त्या त्यांच्या सुंदरआठवणीत हरवत होता. इकडे भक्तीची ही अवस्था वेगळी नव्हती.. बोटांची हालचाल करत चेहरा खिडकी कडे वळवून बाहेर बघत नाही. तिच्याही डोळ्यांसमोर त्या आठवणी एक चिलचित्रां प्रमाणे समोर फिरत होत्या. डोळे पाणावलेले होते. तिने बाहेर बघतच डोळे पुसले आणि चेहरा निर्विकार केला.. आता यावेळेला सर्व सुरळीत असते तर मी आणि आदि त्याच्या डॅडसोबत असते.. तो विचार करूनच तिने डावीकडचा ओठ हलकासा उंचावला. पण नाही असं नाही होऊ शकत म्हणत तिने पुन्हा चेहरा भावनाशून्य केला… तो अधून मधून तिच्या चेहऱ्याकडे पाहत तिचा चेहरा वाचण्याचा असफल प्रयत्न करत होता.. ती डोळे मिटून पडली होती. बसल्याच जागी तिचा आता डोळा लागला होता.. शरीराने आणि मनाने थकली होती. तिला विश्वराज समोर असल्यावर खूप कठीण जात होत स्वतःला सावरणं. खिडकीकडे मान वळवलेली तिने झोपेतच उजवीकडे मान वळली.. त्याने तिची सिट थोडीशी मागे केली आणि मानेजवळ उशी ठेवली.. तिच्या मानेला झटका बसू नये म्हणून, तिच्या गालावर हलकेच नकल्स फिरवले. झोपेतही ओठांवर हसू आले. ते पाहून त्याचेही ओठ हलले... आता तिला तो बिनधास्त बघू शकत होता.
तिला जाग आली तेव्हा गाडी बंगल्यासमोर थांबलेली होती.

“ मला उठवलं का नाही मिस्टर अभ्यंकर.”

‘उठवलं असतं तर हा चान्स मिस झाला असता माझा.’ तो विचार करत होता. ती गाडी बाहेर आली.. तो ही बाहेर आला..


“थॅक्य यू मिस्टर अभ्यंकर..” त्याच्याजवळ येऊन तिने हात पुढे केला.

“ इट्स माय प्लेझर.” त्यानेही हात मिळवला.

“गुडनाईट मिस्टर अभ्यंकर.” तिने हात सोडवत म्हणाली.

“गुडनाईट.. भक्ती..” तो पुढे बोलायच्या आतच ती गेटच्या आत शिरली.. मेन डोरजवळ जाऊन ती क्षणभर थांबली. अजूनही तिला वाटत होतं तो अजून तिथून गेलेला नाही. तिने मागे वळून पाहिले तर तो अजूनही तिच्याकडेच बघत होता. मन दाटून आले आपल्याच जवळच्या चावीने तिने दार ओपन केलं आणि पटकन आत जाऊन न वळता दार लावून घेतले. डोळे ओलावले होते ते पुसून ती सरळ बाबांच्या रूममध्ये गेली..

बाबा अजूनही जागे होते. बेडवर बुक वाचत बसले होते..

“मिठ्ठू, किती उशीर झालेला बाळा ..” ते सौम्य स्वरात म्हटले.

“सॉरी बाबा, आता उशीर नाही करणार..”

“जा जेवण करून घे…”

“ बाबा जेवलात तुम्ही दोघं..याला घेऊन जाते माझ्या रूममध्ये.”

“हो, झालयं आमचं .. याला इथेच राहू दे.. उगाच झोप खराब होईल.. खूप लेट झालाय तू जेवण करून आराम करं.”

“ हो बाबा ..” रूमचे दार लोटून ती तिच्या रूममध्ये गेली.”

सर्वात आधी ती टॉवेल घेऊन शॉवर खाली उभी राहिली. शॉवर च्या पाण्यात तिच्या डोळ्यांतील पाणी झरझर वाहत होतं. ‘विश्वराज सतत का येताय माझ्यासमोर? हे काम लवकरच पूर्ण करावं लागेल. त्याआधी आदि बद्दल ही कळायला नको. नाहीतर माझ्या आदिला...नाही नाही मी असं काहीही होऊ देणार नाही. मरून जाईल मी..’ बाहेर येऊन तिने अंगावर नाईट गाऊन चढवला. रेखाकाकू जेवणाचं ताटं घेऊन आली.

“ काकू, जेवण नको.. अजिबात इच्छा नाहीये.”

“ भक्तीताई , थोडं तरी खाऊन घ्या. रिकामंपोटी झोपू नाही.”

“काकू, खरचं नको ..प्लिज.”

“ बरं दूध तर तेवढं पिऊन घ्या.”

“चालेल घेऊन या..” रेखाकाकूने दूध आणून दिले आणि दुधाचा ग्लास घेऊन ती बाहेर गॅलरीत बसली.. गॅलरी तशी मोठी होती.. हॅगिंग चेअर .. छोटी बाग लावलेली .. छोटा टेबल चेअर
दोन्ही हात रेलिंगला पकडत ती बाहेर बघत होती. विश्वराजची गाडी दिसत नव्हती. नूकतीच पोर्णिमा होऊन गेलेली असल्याने आकाशात पूर्ण चंद्र दिसत होता. ती त्या चंद्राकडे बघत होती आणि तो चंद्राला निहाळणाऱ्या तिला न्याहळत होता. गाडी एका बाजूला पार्क करून तो लाइट खांबाच्या साईडला उभा राहून तिला एकसारखा बघत होता पण तिला तो दिसायचा प्रश्न नव्हता कारण त्या खांबावरील लाईट बंद होता. पिंक नाईट गाऊन मोकळे केस साफ नितळ चेहरा त्या अवतारात ही त्याला ती आवडत होती.. चंद्राकडे बघून बडबडत होती. ओठांची हालचाल आणि डोळ्यांचे भाव स्पष्ट सांगत होते.

“ माझचं कौतुक करत असेल. असचं रोज पाहता यावं यार हिला.” त्याने फोन लावला.

“हॅलो अमन. विश्वराजचा आवाज ऐकून अमनने खाडकन डोळे उघडले.

विश्वराजने अमनला का फोन केला असेल? काय बोलायचं असणार ? का त्याने सकाळ होण्याची ही वाट पाहिली नाही? याची उत्तरे पुढच्या भागात .. भाग कसा वाटला ते सांगितलं तर जर बरं होईल .भेटूया मग