भेटली तू पुन्हा !
भाग - 37
भाग - 37
“ माझी मॅडम कुणाच्या बापाला घाबरत नाही..” भक्तीच्या आधीच लिली ऍटिट्युड मध्ये विश्वराजला म्हणाली..
“ कुणाच्या बापाला घाबरत नसेलही पण आपल्या मुलाच्या बापाला मात्र घाबरते.” तो गालात हसत पुन्हा भक्तीला डिवचत म्हणाला. त्याचा बोलण्याचा रोख भक्तीला समजला होता…
“ वेट अ फाईव्ह मिनिट्स.” भक्ती पलीकडून म्हणाली..
“ काय म्हणालात ?” लिलीने विचारले.
“ काय म्हणालात ?” लिलीने विचारले.
“ आय अम कमिंग.” भक्तीने फोन कट केला.. ते ऐकून विश्वराजचे ओठ हलकेच रुंदावले होते. लिली ही एक भूवई उंचवून हाताची घडी घालून ऐटित त्याच्याकडे बघत होती..
“ एवढुशी दिसते, केवढं बोलतेस आणि ऍटिटयूड तर एवढा तुझ्या मॅडमा सारखाच . नवऱ्यालाच मागे फिरायला लावणार माझ्यासारखं.” विश्वराज अंगठा आणि तर्जनी मधील अंतर दाखवला. त्यानंतर हाताचा पंजा इतक अंतर दाखवलं आणि पुढे तर दोन्ही हातांमधल अंतर दाखवत म्हणाला. त्याच्या बोलण्यावर लिली मांजरीसारखे बारीक डोळे करून त्याच्याकडे बघत होती.
“ त्यांच्या सोबत राहते तर वाण नाही पण गुण तर लागतीलच आणि नवऱ्याने बायकोच्या मागे नाही तर काय दुसऱ्याच्या बायकोच्या मागे फिरावं? .. दुसऱ्या मुलीच्या मागे गेला तर अजिबात सोडणार नाही त्याला असा बुकलून काढेन नं …” लिली न झालेल्या नवऱ्यावर तोंडसुख घेत होती.
“ अगं बाई थोडी तरी दया कर त्या न झालेल्या नवऱ्याची .”
लिली ने नाक मुरडलं आणि दोघेही हसले..
भक्ती जिथे शो होता तिथेच एका रूममध्ये बसून बघत होती.. स्टेजवरचे रॅम्पवाक करतांनाचे व्हिडिओ लॅपटॉप वरून बघत होती. काही कपड्यांची अडचण आल्यास ती लवकरात लवकर ती अडचण दूर व्हावी आणि मुख्यतः विश्वराजचा पहिलाच शोमध्ये तिला कुठलाही प्रकारचा अडथळा येऊ द्यायचा नव्हता.. जोपर्यंत हा ब्रॅन्ड लॉन्च यशस्वी रित्या होत नाही . ती ही स्वस्थ बसणार नव्हती.. रजत लिली तर होतेच पण ती तर दूर राहून लक्ष ठेवून होती..
काही मिनिटांतच ती लिली होती त्या ठिकाणी आली..
रेड कलरची कुर्ती पॅन्ट वेअर करून त्यावर रेड कलरचा चिकनकारी रेशमी दुप्पटा एका खांद्यावर घेतलेला.. केस कर्ल करून मोकळे सोडलेले आणि कानात लांब असलेले झुमके.
“ हे भक्ती..” पाठीमागून आवाज आला..
“ हाय .. एलोरो .” भक्ती तिला हलकेच एका बाजुने मिठी मारली.
“तू आता येतेस यार ..” .
“ हो .. ते जाऊ दे .. काय कमाल दिसतेस तू ऐलोरा..”, भक्ती तिचं मनापासून कौतूक करत म्हणाली
“ बिकॉज ऑफ यू .. तू डिझाइन केलेला ना हे आऊफिट म्हणून.”
“ तू सुंदरच इतकी आहे की तू कोणत्याही ड्रेसमध्ये सुंदर दिसते.” भक्ती स्तुती करत होती.
“ काहीही असतं तुझं … सुंदर दिसणं म्हणशील तर अस दिसावं लागतं म्हणून तर काम मिळतात . पण तू तर अशी सुंदर आणि गोड दिसतेस ना अगदी जीव ओवाळून टाकावा.” ऐलोराने तिच्या गालावर ओठ टेकवले..
“ चल.” म्हणत ती हाताला धरून स्टेजवर घेऊन आली.
“हॅलो एव्हरीवन,अटेंशन प्लीज”
“टुडे द डिझायनर हूज ब्युटीफुल कलेक्शन वी सॉ इज मिस भक्ती रणदिवे. लेट्स ऑल गिव्ह हर अ बिग राऊंड ऑफ अपलॉस .”
एलोरा भक्तीला घेऊन मध्ये आली आणि आता पुन्हा एकदा तिची नव्याने ओळख करून दिली.. तिची नजर विश्वराजला शोधू लागली आणि गर्दीत ही तिच्याकडेच बघत असतांना तो तिला दिसला.
भक्ती दोन्ही हात जोडून तिच्या गोड आवाजात हसून ‘थॅक्य यू’ म्हणाली.. एक नजर पुन्हा त्यांच्याकडे बघितलं. “नाही घाबरत मी कोणाला.” नजरेतून हेच सांगण्याचा प्रयत्न करीत होती.
पुन्हा सर्वानी टाळ्या वाजवल्या. भक्ती आणि एलोरा तिथून मागे गेल्या.. एलोरा तिथून चेंज करायला निघून गेली. तसं तिने लिलाला विचारले .
“ लिली मिस्टर अभ्यंकर कुठे आहेत?” तो आता तिला दिसत नव्हता.. त्याच्या सोबत बिझनेस मॅन आणि फॅशन इंडस्ट्री मधील व्यक्ती बोलत शुभेच्छा देत होते. आणि त्याच्या हातात हार्ड ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक घेत होते.. त्याच्या हातात ही ग्लास होता..
“ ते तिकडे आहेत.” लिलीने एका दिशेने खूण करत सांगितलं.
ते बघून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. तिने नाक मुरडलं..
“लिली, चल ना घरी .. आपलं काम झालायं . माझं पिल्लू वाट बघत असेल. झोपला तर बोलणं ही होणार नाही. .”
“ ओके मॅम चला निघू आपण.”
“ तुम्ही व्हा पुढे मी रजतला सांगून आलेच.”
“ हो .. मी बाहेर आहे . ये लवकर .”
विश्वराजला तिथून बाहेर यायचं होत पण सगळे बोलण्यात गुंतले होते की त्याला तिच्याकडे येता येत नव्हतं. ती बाहेर आली तेव्हा गाडी तिच्या समोर आली होती..
विश्वराजला तिथून बाहेर यायचं होत पण सगळे बोलण्यात गुंतले होते की त्याला तिच्याकडे येता येत नव्हतं. ती बाहेर आली तेव्हा गाडी तिच्या समोर आली होती..
“ काका थांबा थोडावेळ लिली येतेय.”
“ हो ताईसाहेब .”
“एक्सक्युज मी…” पाठीमागून आवाज आला.
“ डिझायनर भक्ती रणदिवे...” आशुतोष तिच्या जवळ येत म्हणाला..
“ हो ..”
“हॅलो मी आशुतोष केळकर …” त्याने हात समोर केला..
“ हॅलो.. “ तिनेही हलकेच हात मिळवला.. तेवढ्यात तिच्याजवळ येणाऱ्या विश्वराजला ते दोघेही हॅन्डशेक करतांना दिसले . तो तिथेच थांबला .
“ आजचे कलेक्शन मला इतके आवडलेत की लगेच मी बुक करून टाकले...”
“ थॅक्य यू व्हेरी मच.”
“ इथे विचारणं बरोबर नाही पण तरीही विचारतो.. मी एक फिल्म करतोय तर माझे आऊटफिट डिझाइन कराल?” ती थोड्या विचारात पडली.. तोपर्यंत लिली तिच्याजवळ पोहचली..
“ हॅलो सर .. मी तुमची फॅन आहे प्लिज एक सेल्फी.”
“ हो का नाही.” लिली त्याच्यासोबत तिच्या मोबाइल मध्ये सेल्फी घेतली..
“ मॅम तुम्ही ही या ना .” लिलीने भक्तीच्या तिच्या बाजुला उभ करतं आशुतोषला विनंती करत त्यालाच फोटो घ्यायला सांगितला. हे बघून विश्वराजच्या चेहऱ्यावर हसू उमललं होतं.
“ सॉरी आशुतोष जी मला आता निघावं लागेल. तुम्ही तुमचं कार्ड द्या. मी नंतर कळवते.” तितक्यात त्याचा पी.ए ने कार्ड पुढे केलं.
“ मॅडम घे कार्ड.” लिली ने कार्ड घेतलं.
“ ओके बाय गुडनाईट सर तिकडे मिडिया तुमच्यासाठी उभी आहेत..
“ मॅम चला लवकर आपल्याला वेळ होतोय.” लिली घाई करत म्हणाली. दोघही गाडीत बसून निघून गेल्या मग आशुतोष ही गाडीत बसून निघाला. बाहेर तरीही त्याचे फोटो काढले गेले.
“ लिली , मला एक सांग तू कधीपासून या सुपरस्टारची फॅन झाली आणि कधी मुव्ही बघितले आणि त्यांच्या एका तरी मुव्हीच नाव सांग बघू ?” भक्ती हाताची घडी घालून तिला विचारत होती.
“ मॅम मी तर उगाचच त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवत होते.” लिली डोळा मारत म्हणाली..
“किती आगाऊ आहेस गं.” भक्ती तिच्या दंडाला हलकी चापट मारत हसत म्हणाली आणि दोघही हसू लागल्या..
“ मॅम तुम्ही उद्याच निघणार आहेत ना ?”
“ हो उद्याच निघावं लागेल .”
“ आज घरी कुणीच नाहीये. माझ्यासोबत घरीच चल आणि सकाळी घरी जाऊन बॅग घेऊन आपण लगेच निघूया .”
“ मॅम बुटिक .”
“ रजत सांभाळून घेईल.”
“ बरं ..”
भक्तीने रावसाहेबांना फोन लावला..
“बाबा आबांची तब्येत कशी आहे?”
“… .”
“ बाबा..”
“ बरं बोलते मी ..”
“ राज.. पण त्याला काय बोलू बाबा ?”
“ आता झोपले ते .. बोलावं तर लागेलच मिठ्ठू.”
“ उद्या सकाळी निघते.”
“ काळजी घ्या मिठ्ठू… हवंतर त्यांना बोलून घ्या .. एकट्या असल्यावर घाबरतात तुम्ही.”
“ बाबा .. मी काय लहान आहे का? बाहेर सिक्युरीटी आणि गार्ड पण आहेच ना … जाऊ द्या ठेवते फोन .” तिने लगेच एक नंबर फिरवला.
“ मला भेटायचं आहे तेही आत्ताच्या आत्ता.” एवढं बोलून तिने फोन कट केला. घरी येऊन ती तिच्या रूममध्ये गेली. राजचा फोटो हातात घेतला.
क्रमश ..