भेटली तू पुन्हा!
भाग - 35
भाग - 35
विश्वराजने ऑर्गनायझर टीमला फॅशन शो साठी तयारीला लावलं होतं. फॅशन शो साठी मॉडल्सचे हि ऑडिशन घ्यायची होती.. तो ही त्यांच्या कामात खरच व्यस्त झाला होता. अंजली इंडस्ट्रियल मध्ये ही लक्ष द्यायचे होते.. तर तो आता तिथूनच इकडचे काम करत होता.. तो आजही ऑफिसला आला नव्हता.. भक्ती ऑफिसला येऊन गेलेली होती.. तिथला स्टाफ तिला सारखं पाहून कुजबूजायला लागल्या होत्या..
“या मॅडम कोण आहेत . रोजच ऑफिसमध्ये बघते मी त्यांना?” मोहिनी
“ माहित नाही कोण आहेत.सरांना भेटायला येतात पण सर तर ऑफिसमध्येच येत नाही..” रूपल.
“ काय भानगड आहे बाबा ही.काहीतरी गडबड दिसतेय मला..”
“ मला तर अमर सरांनी यांच्यासाठी काल रागवलं म्हणून आज मी त्यांना सरांच्या केबिनमध्ये पाठवून दिलं..” सोनिया त्यांची गॉसिप ऐकत म्हणाली..
“ म्हणजे स्पेशल व्यक्ती असणार. सरांची गर्लफ्रेंड?”
“ गर्लफ्रेंड किंवा एक्स ?” एकीने आणखी एक शंका व्यक्त केली..
“ गर्लफ्रेंड किंवा एक्स ?” एकीने आणखी एक शंका व्यक्त केली..
“ या आणि गर्लफ्रेंड?”
“ व्हाय नॉट शी लूक्स रियली ब्युटीफूल अँड हॉट. ” रोनित
“अरे काही काय बडबताय .. पहिलं आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती नसेल तर आपण बोलून तर्क विर्तक करू नये आणि दुसरं अमर सरांनी बघितल ना आपल्याला असं तर आजच आपल्याला सर्वांना टर्मिनल लेटर हातात मिळेल..” केव्हाची शांत असणारी प्रिया त्यांना चिडून बोलायला लागली..
“चिलॅक्स प्रिया. “ तिला चिडलेलं पाहून रोनित म्हणाला.
मग सगळेच आपआपल्या जागेवर जाऊन कामाला लागले ...
भक्ती थोडा वेळ वाट बघून ती निघून गेली होती. ऑर्डर पूर्ण करायचे असल्याने तिने त्याकडे लक्ष देत होती..
*******************************
आज ही भक्ती लंच टाईमला आली होती.. सरळ केबिनमध्ये जाऊन बसली. खूपच राग आला तिला रोज हेलपाटा करत येत आहे तरीही किंमत नाही.. आता येतच नाही खूसट कुमार बघाच आता रागात तिने टेबलवरच्या फाईल तिने जोरात खाली आदळल्या.. तिथला ब्रास ही खाल फेकला. खाली फेकल्याने तो ब्रास फुटला आणि त्याचा आवाज बाहेर आला.. सगळे काम सोडून केबिनकडे लक्ष देऊ लागले.. सोनियाने अमरला फोन करून मॅम आल्याच कळवलं होत . तो ही बाहेर गेलेला असल्याने धावतच केबिनमध्ये आला. समोरचा नजारा पाहून तिथेच थांबला ..
फाईल इतरत्र फेकलेल्या ब्रासही फोडलेला. त्यातले फूल ही विखुरलेले.
“ मॅम .” अमरने भीतच आवाज दिला..
“ मी येणारच नाहीये अमर सांगा तुमच्या सरांना ..” ती मोठमोठे श्वास सोडत भरभर चालत बाहेर गेली.. गाडीत बसून ती निघून गेली. अमरने फोन केला.
“ सर मॅम नी..” “आय नो पाहिलं मी सर्व .” विश्वराज अमरच वाक्य पूर्ण करत म्हणाला..
“रागात निघून गेल्या त्या पुन्हा न येण्यासाठी .”
“तिला यावं तर माझ्याकडेच लागणार आहे .” विश्वराज तिरकस हसत म्हणाला.
रागातच ती गाडीत बसून निघून गेली. . केबिनमध्ये ती लांब श्वास घेत विचार करत राहिली.. मोबाइलच्या रिंगमुळे तिची विचारांची शृंखला तुटली. स्क्रिनवर आदी होता वेळ न दवडता कॉल उचलून तिने कानाला लावला.. चेहऱ्यावरच्या राग जाऊन प्रेमळ भाव आले.
“ हा बोल पिल्ल्या..”
“ मम्मा, कुठे आहे? जेवलीस तू?”
“ बुटिकमध्येच आहे रे बाळा .. तू आणि नानू जेवलेत?” तिनेच त्याला उलट प्रश्न केला..
“ हो … नानू आणि मी आता बसतोय. तू हि जेवण करून घे.. मी थोडयावेळात व्हिडिओ कॉल करतो..
“ राज मी जेवते नंतर . चल आता मी माझं काम करतेय बाय.”
“मम्मा ..” त्याचा नाराज झालेला आवाज .
“पिल्लू मला काम आहेत रे.” ती शांत आवाजात म्हणाली. नंतर तिने फोन कट केला . वॉशरूम मध्ये जाऊन तोंडावर पाण्याचा शिपका मारला.. बाहेर येऊन बघते तर लिली साईड टेबलवर जेवण लावत होती. तसाही लंच ब्रेक झाला होता. मग तीही काही न बोलता जेवायला बसली. जेवण झालं तसं तिचे काम करू लागली अशातच पंधरा वीस दिवस निघून गेले..
***********************************************
आज सर्व आऊटफिट डिलीव्हर करायचे होते म्हणून ती सकाळीच बुटिकमध्ये आली.. सर्व ड्रेसेस मेनीक्वीन वर चढवलेले होते. तिने सर्वांवर शेवटची नजर फिरवली.
“ वेलडन ॲण्ड काँग्रॅच्युलेशन माय टीम.” तिने सर्वांच्या समोर त्यांच टाळ्या वाजवून अभिनंदन केलं.
“हिप हिप हुर्रे sss.” सगळ्यांनी एकच कल्ला केला..
“ लिली ..”
“ येस मॅम .. मी करते .” तिचा इशारा समजून लिली पुढच्या कामाकडे वळली..
“ रजत ..” रजत आणि लिली आणि काही मंडळी डिलीव्हरीच्या कामाला लागले..
अमर डिलीव्हरी उतरवून घेतली.. मेनीक्वीन वर चढवून काही इन्स्ट्रक्शन देऊन लिली आणि रजत निघून गेले..
ऑर्डर्स लवकर पूर्ण झाल्याच्या आनंदाताच समुद्र किनारी असलेल्या रेस्टॉरेट सनशाईन मध्ये छोटी पार्टी दिली होती..
संध्याकाळी सात वाजता सनशाईनमध्ये तिची आणि लिलीची वाट पाहत होते.. तिघेही खाली उतरले. आधीच हॉटेलचा एक प्रायव्हेट एरिया बुक केलेला होता..
भक्तीने अँकल लेंथ असलेला ब्लॅक स्लीवलेस गाऊन, गळ्यावर आणि बाहीवर नेटची जाळीदार असलेल जॅकेट वेअर केलेले आणि सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं तिच्या सोबत असलेल्या आदिराजने. सर्व त्यांच्याकडे आश्चार्याने पाहू लागले सोबत त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह ही निर्माण झाले. ती त्यांच्या समोर आली.
“ वेलकम एव्हरीवन..” भक्तीने सगळ्यांना ग्रीट केलं.. सगळे राजकडे बघताना तिला दिसत होते. त्यांच्या डोळ्यांतील प्रश्न भक्तीने वाचले होते
“ तुमची सगळ्यांची उत्सुकता न ताणून धरता मी माझ्या आयुष्यातील स्पेशल वन लकी चार्म ला भेटवणार आहे आणि तो आहे माझा मुलगा आदिराज .” सगळ्यांची तोंडे उघडीच राहिली होती.. तिच्या पर्सनल लाईफ बद्दल कोणाला काही माहित नव्हते.
“ मॅम.. मजाक कर रहे है ना ?” त्यातील एक जण म्हणाला..
“ नो, हि इज रेअली माय सन .” भक्ती स्मित करत म्हणाली.. तिने राजकडे बघितले..
“ हाय एव्हरीवन
आय ॲम आदिराज..” तो सगळ्यांकडे बघत हसून बोलत ओळख करून देत होता. . प्रतित्युर म्हणून सगळ्यांनी हॅलो बोलून त्याचे स्वागत केलं .
आय ॲम आदिराज..” तो सगळ्यांकडे बघत हसून बोलत ओळख करून देत होता. . प्रतित्युर म्हणून सगळ्यांनी हॅलो बोलून त्याचे स्वागत केलं .
“एव्हरीवन क्नोज व्हाय वी आर हियर, सो धिस इज अ स्मॉल सेलिब्रेशन एन्जॉय.” असं बोलून भक्तीने पार्टीला सुरवात केली..
“ वन मिनिट मॅम ..” लिली एक टू टायर केक वेटर सोबत घेऊन आली..
“ लिली काय हे ..”
“ मॅम मी नाही या सर्वांनी करायला सांगितल .”
“ चला कट करूया , या सर्वांनी इकडे आहे.” तिने सर्वांना बोलावून घेतले. मध्ये राज त्याच्या मागे भक्ती लिली रजत त्याच्या आजूबाजूला सगळ्यांनी हात लावून केक कट करून घेतला. .
क्रमश ..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा