भेटली तू पुन्हा !
भाग - 34
भाग - 34
" बरं . ते बाकीच्या डिलर सोबत बोलणं झाल?” तिने विषय बदलवला.
“ एका सोबत झालाय बाकीच्यांना करते फोन ..”
“ ओके. मग मी निघते. वेळ दिला तर बरेच होईल.”
“हो जा तुम्ही मी बघून घेईल सर्व..” भक्ती जाण्यासाठी पर्स घेऊन निघाली. .
“ एक मिनिट काहीतरी विसरलात.” लिलीच बोलणं ऐकून भक्ती जागेवरच थांबली..
“ काय विसरले.” विचार करत चावी पर्स मोबाइल सर्व चाचपडून शोधत होती. .
“ आहे सर्व मग काय ?” प्रश्नार्थक नजरेने पाहिले.
“ अरे इथेच तर होते.” लिली टेबलकडे काहीतरी शोधत होती.
“ अगं काय शोधतेस . . काही नाही विसरली मी ..” इकडेतिकडे शोधणाऱ्या लिलीला पाहून भक्ती वैतागली होती. तरीही लिली थांबायच नाव घेत नव्हती. इथे तिथे कोपरा न कोपरा शोधत होती..
“ अग बाई सांग नाहीतर जाते मी ..” ती वळत पुढे जायला निघाली.
“हे सापडलं सापडलं . . हे बघा .” लिलीने मुठीत घट्ट पकडून घेतले. भक्ती ही उत्सुकतेने तिच्याकडे बघत होती. ओठ ही हलकेच रुंदावले होते.. लिलीने हाताची मुठ तिच्या ओठांसमोर धरत ती ओठांमध्ये पुटपुटली. तिचं हळुपार पुटपुटणं बघून तिच्या वेडेपणावर भक्ती खळखळून हसायला लागली.
“अगदी वेडी आहेस .” भक्तीने लिलीच्या डोक्यात टपली मारली.
“ हेच स्माईल इथेच विसरला होतात. .” ती हसत डोळे मिचकवत म्हणाली.
“तिथे गेल्यावर याची गरज पडू शकते आणि खर सांगू तर हसल्यावर तुम्ही अजूनच सुंदर दिसता.”
“ हो का ..” लिलीने भक्तीचे प्रेमाने गाल ओढून थोपाटले.
“ चल येते मी जेवणाला सोबत नसणार .. राजने चौकशी केली तर सांगू नकोस .. भूक लागली तर खाऊन घेईल.” भक्ती लिलीला प्रेमळ दम दिला.
“ हो. आज सरांसोबत लंच टाईम.”
“लंच करायला भेटायला तर हवा ना बघू आजही टाळतात का ते.. जरा काम लवकर करण्यावर भर दे.. ट्रायल पण व्हायची आहे. येते मी.”
“ मॅम डोन्ट वरी .”
“हम्म चल बाय.” भक्ती निघून गेली आणि लिली ही तिच्या कामाकडे वळली.
भक्ती विश्वराजच्या ऑफिसला पोहचली.. रिसेप्शनिस्ट जवळ चौकशी केली..
“ मॅम सर अजून आले नाहीत.”
भक्ती विश्वराजच्या ऑफिसला पोहचली.. रिसेप्शनिस्ट जवळ चौकशी केली..
“ मॅम सर अजून आले नाहीत.”
“ ओके मी थांबते .” ती समोरच असलेल्या वेटिंग एरियात वाट पाहत बसली..अमर फोन वर बोलत बाहेर पडत असतांना रिसेप्शनिस्ट सोनियाने अमरला आवाज दिला..
“एक्सक्युज मी सर .. “ तिने आवाज दिला. त्याने थांब म्हणून खुणावले. बोलणं होताच त्याने फोन कट केला आणि तिच्याजवळ आला.
“काय झालं सोनिया ?”
“ सर मिस रणदिवे मॅम सरांना भेटायला आल्या आहेत.”
“ कुठे ,कधी आलेत ते? मला का नाही सांगितलं ?” त्याचा आवाज वाढला होता. तो त्या दिशेने निघाला .
“ एक तासा झाला असेल. .वेटिंग एरियात बसलेत.”
“ एक ता..स वेटिंग एरियात बसलव तू त्यांना ..” तो चिडला..
‘कोण आहे माहिती नाही तुला आणि काही सांगू ही शकत नाही. जोपर्यंत सर मॅम काही बोलत नाही तोपर्यंत तरी.’
‘सर आज ऑफिसला आलेच नाही हे सांगाव लागेल मॅमना .. पण आता ही दोघं माझा कबुतर करतील. इकडून तिकडे. कबतूर जा जा कबतूर जा जा.’ तो मनात बडबडला.
“ सॉरी सर ..” ती मान खाली घालून म्हणाली.
“ व्हॉट सॉरी .. त्यांना वाट पाहायला लावायची नाही. मला सांगायचं .”
“ आय एम सॉरी .” सोनिया पुन्हा म्हणाली.
“ गो टू युअर वर्क.” तो भक्तीच्या समोर आला.
“ सॉरी मॅम .. तुम्ही इथे वाट पाहत बसलात.” तो माफी मागत म्हणाला.
“इट्स ओके अमर .. मला सांगा सर कधी येणार आहेत? बोलायचं मला आणि खरच माझ्याजवळ टाईम नाहीये.
“ एक्स्ट्रीमली सॉरी मॅम सर आज ऑफिसला येणार नाहीत.” तो खाली मान घालूनच म्हणाला.
“ ओके. मिस्टर अभ्यंकर कुठे आहेत ?” ती शांत आवाजात म्हणाली.
“ मॅम ते ..”
“ ओके .. कळलं मला तुमचे ड्रेसेस मी तयार करून ठेवते.” ती तरातरा पावल टाकत बाहेर पडली.. मनात तर असा राग आला होता तिला पण तिने स्वतःला शांत केलं आणि तिच्या बुटिककडे निघाली.. तिच्या केबिनमध्ये जाऊन चेअर वर बसली.. समोरचा पाण्याचा ग्लास उचलून तिने तो गटागटा संपवला.. तिथे काम करणाऱ्या दादा कडून एक कडक चहा मागवून घेतला.. चहा पिऊन जरा तरतरी आली आणि ती रूममध्ये जाऊन काम करू लागली.. भरभर हात चालवत होती.. ड्यू डेटच्या आधीच तिला ड्रेस डिलीव्हर करायचे होते.. त्याकरिता तिच नव्हे सर्वच ओव्हर टाईम करत होते.. रात्री बाराच्या ठोक्याला सर्वच बाहेर पडले.सर्व सहकऱ्यांसाठी बसची सेवा अगदी घरपोच केली होती. ती ही मग घरी जाण्यासाठी निघाली. वॉचमन ने गेट उघडले तशी गाडी आत आली.. गाडीच्या आवाजाने रावसाहेब बाहेर आले.
“ मिठ्ठू खुप उशीर झालात .. जेवलात का तुम्ही? खूप थकलेल्या दिसताय.” रावसाहेब तिच्या जवळ येत म्हणाले.
“ हो बाबा जेवण माझ्या टिमसोबतच केलं. तुम्ही आणि राज जेवलात आणि झोपला तो.” ती सोफ्यावर बसत डोळे मिटूनच म्हणाली.
“ हे घ्या पाणी .” रावसाहेबांनी पाण्यचा ग्लास तिच्यासमोर धरला..
“ बाबा मी घेतलं असत .” तिने पटकन ग्लास घेऊन पाणी पिले.
“मिठ्ठू जा बेटा रूममध्ये आराम करा.”
“ हो .. आधी राजला बघून येते.” ती रावसाहेबांच्या रूममध्ये गेली. बेडवर राज शांत झोपला होता.
“ हो .. आधी राजला बघून येते.” ती रावसाहेबांच्या रूममध्ये गेली. बेडवर राज शांत झोपला होता.
“ सॉरी बच्चा.” तिने त्याच्या कपाळावर ओठ ठेवले..
“ गुडनाईट बाबा .” बाबांचा निरोप घेऊन ती तिच्यारूममध्ये आली. फ्रेश होऊन अंघोळ करून ती पुन्हा तिच्या कामाला लागली. हातातील काम पूर्ण झालं तसं तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं . बेडवर येत ती तिच्यावर आडवी झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळ लवकर उठून ती बुटिकला निघून आली. आल्या बरोबरच ती कामात गढली…
***************************************
विश्वराजने ऑर्गनायझर टीमला फॅशन शो साठी तयारीला लावलं होतं. फॅशन शो साठी मॉडेल्स साठी हि ऑडिशन घ्यायची होती.. तो ही त्यांच्या कामात खरच व्यस्त झाला होता. अंजली इंडस्ट्रियल मध्ये ही लक्ष द्यायचे होते.. तर तो आता तिथूनच इकडचे काम करत होता.. तो आजही ऑफिसला आला नव्हता.. भक्ती ऑफिसला येऊन गेलेली होती.. तिथला स्टाफ तिला सारखं पाहून कुजबूजायला लागल्या होत्या..
क्रमश ..