Login

भेटली तू पुन्हा ! भाग - बत्तीस

भक्ती विश्वराज
भेटली तू पुन्हा !

भाग - 32


विश्वराज तिला पाहण्यात गुंतला. बाहेर गेलेल्या अमरचा फोन वाजला. भक्तीने आणखी किती वेळ लागणार हे विचारण्यासाठी फोन केलेला..

“ मॅम, मी पुन्हा एकदा जाऊन बघतो आणि तुम्हाला लगेच कळवतो.” त्याने फोन ठेवून दिला आणि लगेच मिटिंग रूममध्ये गेला..

“ सर ?”

“ आय ॲम बिझी नाऊ.”

“ बट सर मॅम ऑलरेडी तीन तास झाले थांबलेत.”

“ हम्म .”

थोड्यापूर्वी जेव्हा तिचा फोन वाजला होता. बऱ्याच दिवसातून श्रीरंगचा फोन असल्याने ती हसून बोलायला लागली..

“ हॅलो?”

“ हॅलो . कशी आहेस ?”

“ मी मस्त पण तू कसा आहेस? किती दिवसांतन फोन केलास? कुठे होतास इतके दिवस?”

“अरे किती ते प्रश्न करताय मॅडम आधी श्वास तर घेऊ दे मला. .. मी आधी तुझ्या पहिल्या प्रश्नाच उत्तर देतो.. मी तर ठणठणीत आहे बॉस .. इथेच होतो पण खूप बिझी होतो. आता जर निवांत झालो म्हटलं तुला फोन करावा.. कामात आहेस का?”


“ हो आणि नाही ही .” ती हसत

“ म्हणजे ?”

“ एका मिटिंगसाठी बाहेर आलेय तर त्या सरांची वाट बघतेय.”

“ एका ब्युटीफूल गर्ल ला ऑफिसात बोलावून वेट करायला लावत आहे. कौन है वो नासमझ इंसान?” तो नाटकी सुरात बोलत होता आणि त्याच्या बोलण्याने का होईना ती हसायला लागली.

“ तू पुन्हा सुरू झालास..” ती बोलतच होती की अमर आत आला..

“ मी बोलते नंतर .” बोलून तिने कॉल कट केला..

“ म मॅम…” अमर जरा भीतच बोलत होता..

“ ते सर .. सर बाहेर मिटिंग साठी गेलेत.” तो एकवेळ तिच्याकडे बघून खाली नजर वळवली..

“ मग हे आधी का नाही सांगितल. आमच्या वेळेची काही किंमत आहे की नाही. चार तास वाट पाहून हे सांगायला आलात तुम्ही.” लिली अमरच्या अंगावर धावून गेली. तिचा पवित्रा बघून तो दोन पावलं मागे सरकला.

“लिली शांत हो.”

“एक्स्ट्रीमली सॉरी मिस्टर अमर .. लिलीच्या वतीने मी तुमची माफी मागते..”

“ मॅम तुम्ही सॉरी नका म्हणू. प्लिज. माझ्यामुळे तुम्हाला त्रास
झाला ॲम सॉरी.” अमर दिलगिरी व्यक्त करत होता.

“मॅम तुम्ही का?..” लिली..

“ लिली ..” भक्तीने तिच्याकडे सुचकपणे पाहिलं.

“ सॉरी .” नाक मुरडतच ती म्हणाली.. लिलीने तिच्याकडे रोखून
पाहिले. लिली आपल्याला फरक पडत नाही असे भाव दाखवत पर्स घेऊन केबिनच्या बाहेर निघाली.


“ वन्स अगेन सॉरी आणि मिस्टर अभ्यंकरांना थॅक्यू बोला माझ्याकडून. उद्या ही याच वेळेला हजर राहिलं मी .. तेव्हा नवीन बहाणे शोधून ठेवा म्हणावं.” अमर खाली बघून ऐकत राहिला. बोलून ती ताडताड पावले टाकत बाहेर निघून गेली. तिने जो निरोप दिला होता तो आधीच त्याच्याजवळ पोहचला होता.. आताही तो लॅपटावरून तिला ऐकत पाहत होता..

“ राज तुझी खूप आठवण काढतो.”

“... …..”


“ मी पण काढते रे . आय मिस यू.” मघाशी कॉलवरचं तिच्या तोंडून दुसऱ्यासाठी निघालेलं मिस यू . त्याच्या काळजाला टोचून गेलं आणि वाट पाहायला लावणाऱ्याने आता न भेटायचा निर्णय घेतला..

“ सर .. मॅम नाराज होऊन गेल्यात”

“हम्म.”

“ उद्या ही येणार आहेत मॅम.”

“ हम्म .” पुन्हा एक हुंकार आला.

“ सर एक विचारू का?” त्याने धाडस एकवटून विचारले.

“मॅम आल्या होत्या तर तुम्ही का नाही बोलले?”

“ ती माझ्याशी बोलण्यासाठी किती प्रयत्न करते. बघू देत मलाही.” बोलून विश्वराज पुन्हा कामाला लागला आणि अमरही तिथून बाहेर पडला.


संध्याकाळचे पाच वाजले तरीही भक्ती आणि लिली ‘मिलन टेक्सटाईल’ कंपनीत जाण्यासाठी निघाले… जवळच असलेल्या ब्रांचमध्ये जाऊन त्यांनी कापड मटेरियल सिलेक्ट केलं. ऑर्डर करून ॲडव्हान्स रक्कम जमा करून ते परतरले.


“मॅम खूप भूक लागली हो आता चला काहीतरी खाऊ नाहीतर इथेच माझा जीव निघून जाईल.” लिली तिच्या पोटाला पकडत बिचारा चेहरा करून बोलत होती.. दुपारचं जेवण दोघांच स्किप झालं होतं.. लिली ऑफिसा मध्ये नाश्ता केला होता पण भक्तीने काहीही घेतलं नव्हतं. भूक तर तिलाही लागली

“ दादा एखाद्या कॅफेकडे गाडी घ्या.”

“ हो ताईसाहेब.”

“मॅम कॅफेत नको. इथे मस्त एक स्टॉल आहे. तिथे जाऊया.”

“ ठीक आहे…” ड्रायव्हर दादांना गाडी एका बाजूला थांबवून ह्या दोघी ही पायी चालत त्या स्टॉलजवळ गेल्या..

पाणी पुरी बघूनच त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि दोघांनीही मनसोक्त पाणीपुरीचा आस्वाद घेतला.. भक्तीने ही खूप वर्षानंतर ही स्टॉलवरची पाणीपुरीवर आडवा उभा हात मारला. भक्ती खुश होऊन गाडीकडे जायला वळली..

“ भैया सुकी पाणीपुरी दो.”

“ अय्या मी विसरलेच होते की.” लिलीच वाक्य ऐकून भक्ती मागे वळली.

“पाणीपुरी नंतर सुकीपुरी खाणं शास्त्र असत ते.” त्या भैय्याने तिला एक सुकीपुरी पापडी बटाटा कांदा बारीक शेव त्यावर चाट मसाला भुरभुरला आणि तिच्या हातावर ठेवला. तिने त्याला पटकन तोंडात टाकला.. “ आणखी दो .” तिच्या वाक्यावर भक्ती हसली.. त्याने अजून एक सुकीपुरी तिच्या हातावर ठेवली.

“अजून एक .” ती तोंडात टाकून म्हणाली.

“अगं एक प्लेट सुकी पुरीच घेऊया का?”

“ नको झालं माझं .” पैसे देऊन दोघे गाडीकडे वळल्या.. आता गाडी घराकडे वळली.


“ लिली दूसरी कंपनीकडून कापड मटेरियल बघून घेशील. मी उद्या मिस्टर खडूसच्या ऑफिसला जायचं आहे.. ”

“ओ हो .. खडूस.” लिली भक्तीच्या खांद्याला धक्का मारत चिडवत होती. भक्ती जबरदस्ती हसण्याचा प्रयत्न केला.

‘खडूस, रागीट बोका, सडलेलं कडू कारलं, गरम डोक्याचा गोरिला. म्हटलं काही कमी झाला असेल पण नाही जास्तच वाढला आहे. आत असूनही भेटला नाही.. मी पण आता कमी वेळात ड्रेस पूर्ण करून दाखवणारच.’ मनात त्याला बडबडत शिव्या घालत होती..

“ उद्या मी बघून येईल सर्व डोन्ट वरी .” लिली.

लिलीला तिच्या घरी पोहचवून भक्ती घरी गेली… राज आणि रावसाहेब डायनिंग टेबलवर बसून जेवायला बसले होते..

“ मम्मा , आज पण उशिर केलास तू. पटकन फ्रेश होऊन ये. मी थांबतो..”


“ सॉरी राज , मी बाबांना कळवलं होत रे. तू थांबू नकोस माझं बाहेर खाणं झालयं. तू जेव .. मी आलेच फ्रेश होऊन .” पायऱ्या चढून ती पटकन बाथरूमध्ये गेली… शॉवर बाथ घेऊन तिला रिलॅक्स वाटतं होतं . चेंज करून ती आवरून ती खाली आली आणि बघते तर काय हे दोघ अजूनही टेबलवरच जेवायचे बाकी होते..


“ हे काय.. जेवत का नाही तुम्ही?”

“ रेखाताई , ताट वाढायला घ्या .”

“ पण बाबा मला खरचं भूक नाही हो..”

“ नानू , पाणीपुरीने पोट भरत का ? नाही नं.. मग सांगा मम्माला सकाळी पण जेवली नाहीये ती.. अनहेल्दी फूड खाऊ नये.” राज गाल फुगवत रागात बोलला..

“ तुझ्यापर्यंत आल्या बातम्या .” ती हळूच पुटपुटली . तिने रावसाहेबांकडे पाहिलं . त्यांनी हसत खांदे उडवले.

“ ओय माझा बच्चा गाल नको फुगवू .” तिने त्याच्या गालावर ओठ टेकवला.