Login

भेटली तू पुन्हा ! भाग - एकतीस

भक्ती विश्वराज
भेटली तू पुन्हा !

भाग - 31



“ बाप आहोत आम्ही तुमचे. तुम्हाला त्रासात पाहून काळीज तुटतं होत आमचं. काही दिवसांनतर शोधून काढले होते आम्ही. मान्य तेव्हा त्यांच्या कडून अपराध झाला पण त्याची शिक्षा त्यांना देऊन झाली. आता नका देऊ. आज त्यांनाही खूप त्रास होत असणार आपल्या परिवारापासून दूर राहून तो त्रास दिसतोय आम्हाला लहानपणी त्यांनी बापाविना आयुष्य काढलं तेच त्यांच्या मुलाच्या वाट्याला येतं. याचा किती त्रास होत असणार .” तिच्या डोळ्यांत पाणी आलं. तिने ते लगेच पुसून काढले.

“ पण मी ही त्यांचाच सुखाचा विचार केला होता ना बाबा.” गळ्यापर्यंत दाटून आलं होतं तिला. कसा बसा आवाज स्थिर ठेवून होती..

“ हो मिठ्ठू तू ही त्यांच्या सुखाचा आनंदाचा विचार केला आणि त्यांनीही पण परिस्थिती आणि काही वाईट प्रवृत्तीचे लोक तुमच्या विरोधात होती.” ती बाबांच्या बोलण्यावर विचारात पडली..

“चला आता झोपा तुम्ही. सकाळी ऑफिसला जाणार आहात नं आराम करा .. यासर्वांत तब्येतीला जपा. हल्ली तुम्ही खूप दुर्लक्ष करत आहे.. आम्ही सगळीकडे लक्ष ठेवून असतो .” रावसाहेब तिच्या डोक्यावर हात फिरवत थोपटत म्हणाले आणि तिथून जाण्यासाठी निघाले.


“ बाबा .” भक्तीच्या हाकेने त्यांनी वळून पाहिले. ती लहान मुलींसारखी बाबांच्या कुशीत शिरली. त्यांनी ही तिला मायेने जवळ घेतले. तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तिच्या कपाळावर ओठ ठेवले..

“ जास्त विचार करून जागू नका.. शांत झोपा.” रावसाहेब प्रेमाने म्हणाले आणि भक्तीने ही मान डोलावून होकार दिला. रावसाहेब गेल्यावर ती फ्रेश होऊन कपडे बदलून आली. बेडवर राजला जवळ घेऊन झोपली..

दुसऱ्या दिवसाची सकाळ लवकर झाली. भक्तीला पहाटे पाचच्या सुमारास जाग आली. रात्री बाबांनी डोक्याची तेल मालिश केल्याने पूर्ण झोप झाली होती.. फ्रेश होऊन ती समुद्रकिनारी जॉगिंग करायला निघून गेली. जॉगिंग करून काही योग आसन करून ती सहा साडेसाहाच्या आसपास घरी आली. राज अजून झोपलेला होता. ती कपडे घेऊन बाथरूममध्ये शॉवर घ्यायला गेली.. बाहेर आल्यावर ती ड्रेसिंग टेबलवर वरून तिचं आवरत होती.. राजने तिच्या मानेभोवती हात गुंफले.


“ उठलं माझ बाळं . .” तिने त्या छोट्या हातांवर ओठ ठेवले.

“ हम्म..” त्याचा झोपाळलेला आवाज. तिने त्याला उचलून मांडिवर घेतले.

“ यू लूक सो ब्युटीफुल मम्मा.” हनुवटी धरत राज तिचा चेहरा न्याहाळत होता.

“ थॅक्य यू बच्चा.”

“लवकर तयार झालीस ?” त्याने तिला तयार झालेलं बघून प्रश्न केला.

“ हो . आज लवकर जावं लागेलं . सर्व ड्रेसेस तयार करायचे आहेत ना म्हणून.” तिने हसून उत्तर दिलं.

“चल लवकर फ्रेश हो ..” भक्ती राजला बाथरूम मध्ये घेऊन गेली.. राजचे आवरून झाले तसे दोघही खाले आले. रावसाहेब सोफ्यावर बसून न्यूज पेपर वाचत बसले होते..

“ गुड मॉर्निंग नानू.” राज ने गोड हसून रावसाहेबांना विश केले..


“ गुडमॉर्निंग राज .” त्यांनीही त्याला जवळ घेतले.. भक्ती बोलून किचनमध्ये निघून गेली.. तसे तिला फार कराव ही लागत नव्हतं .. पण ती थोड फार आवडीने त्या दोघांसाठी करत होती..

“ थॅक्यू नानू . खूप छान चम्पी करतात. मी तर लगेच झोपलो. ” रावसाहेब गालात हसले.

“ तुम्हाला आवडले .”

“ हो.”

“ तुम्हाला हवे तेव्हा आम्ही करून देऊ.”

“ बाबा राज चला नाश्ता रेडी आहे.” भक्ती आणि काकूने टेबलवर नाश्ता लावला.. तिघही सोबत नाश्ता करू लागले..

“ बाबा कदाचित मला बाहेर जावं लागेल त्यामुळे घरी यायला वेळ होऊ शकतो.”

“ ठीक आहे. काळजी घ्या आणि उशिर झाल्यास फोन करा.”

“ हो जातांना करेलच..” सर्वांचा ब्रेकफास्ट करून झाला तसं ती पटकन आवरायला रूम मध्ये गेली.. ड्रेस चेंज करून पर्स घेऊन ती खाली आली..

“ बाबा येते.. राज बच्चा नानू आणि तू वेळवर जेवण करं आणि आराम कर.. “ तिने राजच्या डोक्याची पापी घेतली आणि पर्स घेऊन ती आपल्या गाडीने ऑफिसला निघाली..

ऑफिसला गेल्या गेल्याच ती कामात गर्क झाली… मिटिंग घेणं गरजेचं होत म्हणून तिने ते लिलीला लगेच अरेंज करायला लावली. लिलीने अरेंज करून ती भक्तीच्या केबिनमध्ये गेली.. तिला ड्रेस मटेरियल बघण्यासाठी तिला जावं लागणार होतं. त्या आधी तिला विश्वराज सोबत बोलायचं होतं म्हणून तिने त्याला कॉल केला.. ॲज युजवल की त्याने रिंग होणारा कॉल घेतला नाही. दोन तीन कॉलनंतर हि फोन न घेतल्याने तिने अमरला कॉल करून अपाइटमेंट घेतली. आज कोणतीच मिटिंग नसल्याने त्याने भक्ती सोबतची मिटिंग अरेंज करून घेतली.


लिली केबिनमध्ये येऊन “दहा मिनिटांनी मिटिंग सुरू करूया.”

“ओके. .” सर्वच मिटिंग हॉलमध्ये जमा झाले आणि भक्तीने बोलायला सुरवात झाली..

“ गुडमॉर्निंग गाईज, तुम्हाला सर्वांना आयडिया आली असेलच . या मिटिंगचा अजेंडा काय आहे.” तसं काहींनी माना हलवून तर काहींनी येस म्हणून होकार दर्शवला.

“ फॅशन शो ची डेट ही आता महिन्यावर केलेली आहे. आपल्याला लवकरात लवकर ड्रेस पूर्ण करायचे आहे..

“ पण मॅम .. “

“ आय नो. तुम्हाला कोणते प्रश्न पडले आहेत. आपल्याला डबल मेहनत घ्यावी लागणार आहे.. त्यासाठीच आज मी मिस्टर अभ्यंकरना भेटणार आणि रिक्वेस्ट करणार आहे. पण जर नाहीच पॉसिबल झाले तर आपण तर रेडी असायलच पाहिजे ना सो आर यु रेडी टू कम्पलीट दिस टास्क.”

“ येस..” त्या हॉलमध्येच सर्वांचा एकच आवाज आला.

“ लेट्स गेट टू वर्क गाईज.” सर्व जाऊन आपआपल्या कामाला लागले. लिली आणि भक्ती तिथून लगेच कॅबिनमध्ये गेल्या..

“लिली मिस्टर अभ्यंकरना भेटायला जायचे आहे.”

“ मग जा ना तुम्ही .. मी काय करू तिथे येऊन .”

“ मी काय डेटवर चालेलय का? महिन्यात ड्रेसेस पूर्ण होणार आहेत का? हे फक्त मला त्रास देण्यासाठी पोस्टपॉन करून लवकर डेट फिक्स केली आहे.” ती नाक मुरडतच म्हणाली..

“ तुम्ही यासाठी तर त्यांना जाब विचारायला हवा. जा बोलाच तुम्ही. मी आहे तुमच्या मागे.” ती भक्तीला चावी फिरवत होती.

“ मी काही जाब विचारायला जात नाहीये फक्त मी बोलून बघणार आहे.. जर त्यांनी शोच्या डेटमध्ये बदल केला तर आपल्याला सोईच होईल नाहीतर बघू पुढे काय होते ते.” ती विचार करत म्हणाली..


“ ओके पण हा ते जर तुम्हाला कमी जास्त बोलले तर मी अजिबात शांत बसणार नाही.. माझ्यासमोर तुम्हाला बोललेलं मी काहीही खपवून घेणार नाही.” बोलून ती पर्स घेऊन ती भरभर केबिनच्या बाहेर निघाली. भक्ती तर एकसारखी लिलीच्या चेहऱ्याकडेच बघायला लागली. भक्ती ही तिच्या मागे गेली. थोड्याच वेळात ते गाडीत बसून अभ्यंकरच्या ऑफिसकडे निघाले. भक्ती विचारात गुंतली होती.. गाडी बिल्डींग जवळ येऊन थांबली.. दोघही खाली उतरून आत आल्या. . ती दुसऱ्या वेळस या ऑफिसला आली असल्याने तिला बऱ्यापैकी आयडीया होती. लिलिने रिसेप्शनिस्ट जवळ त्यांच्या कंपनीच कार्ड दाखवलं . तिथल्या मुलीने अमरला कॉल लावून सांगितलं. अमर खाली आला त्यांना वेलकम केले. सर मिटिंग मध्ये असल्याच कळवून तो त्यांना सरांच्या केबिनमध्ये घेऊन गेला.. अमरने भक्तीला वेळ दिलेला कळताच विश्वराज त्यांच्यावरच चांगलाच बरसला. त्याला बिचाऱ्याला तर काही कळतच नव्हतं. तिची येण्याच्या वेळस त्याच्या सरांनी मिटिंग मध्ये स्वतःला अडकवून घेतलं होत. त्यांना बाहेरच्या लोकांसारख वैटिंग एरियात वाट पाहायला लावणं हे त्याला अजिबात रूचल नाही. तसा तो त्यांना सरांच्या हक्कांच्या ऐसपैस असलेल्या केबिनमध्ये घेऊन आला होता.. येतानांच कॅटिंनमध्ये फोन करून चहा नाश्ताची ऑर्डर दिली होती..

“मॅम सर येतीलच थोड्या वेळात तुम्ही चहा आणि नाश्ता करा.”

“ नको … काहीही नको आम्हाला.”

“ प्लिज मॅम थोड तरी प्लिज .” अमर आर्जव करत होता. .

“ ओके मी घेते. .” लिलीने प्लेटमधील सॅडविंच उचलून तोंडात टाकलं आणि पटापट खायला सुरवात केली. अमरला तिच्याकडे टक लावून पाहत असतांना तिने त्याच्यासमोर प्लेट धरली.
“तुम्हाला ही खायचं?”
त्याने मान हलवून नकार दिला आणि पुन्हा ती खाण्यावर लक्ष केंद्रित करू लागली.. नंतर अमर तिथून निघून गेला.

“ मॅम घ्या ना हो खरचं खूप टेस्टी आहे आणि चहा तर एकदम फक्कड आहे.” तिने चहाचा एक घोट घेतला.

“ तू घे मला यापेक्षा बोलणं गरजेच वाटत आहे. त्यांनी लवकर यायला हवं ..”


इकडे विश्वराज कॉन्फरन्स रूम मधून तिला त्याच्या लॅपटॉपर न्याहळत बसला होता. . त्याच्या कॅबिनच्या रूमचा ॲक्सेस हा त्याच्या जवळ असल्याने तो तिला बघत बसला होता.. ती व्हाईट कलरच्या सुट मध्ये ती ॲट्रॅक्टिव्ह दिसत होती. केस मोकळे सोडलेले. विश्वराजची नजर त्या ओठांवर स्थिर झाली आणि त्याचे श्वास वाढले. त्या नाजूक ओठांवर रोझ ब्लूम शेड लावल्याने ज्याने आधिच असलेले गुलाबी ओठ जास्तच गुलाबी दिसत होते.. धकधक धकधक त्याच्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती.. त्याने हृदयावर हात ठेवला.. ती लॅपटॉप काहीतरी करत होती.. मध्येच चेहऱ्यावर येणारे केस कानामागे घेत होती.. तो एक एक हालचाली तिच्या नजरेत साठवून घेत होता.. मिटिंग संपवून बऱ्याच वेळ होऊन ही तो त्याच रूममध्ये बसला होता.. भक्ती ऑफिसला आल्यावरती ही त्याने अर्जंट मिटिंग घेतली होती. त्यानंतर तो तिथेच बसला होता..


“ सर, मॅम दोन तासांपासून वाट बघत आहेत.”

“ बघू देत.” विश्वराज दाखवत तर असा होता की तो खूपच बिझी आहे. लॅपटॉप वर तो तिलाच पाहत होता.. बघता बघता त्याच्या कपाळावर आठ्या पडल्याच्या अमरला दिसल्या. तो हळूहळू फाइल देण्याच्या बहाण्याने जवळ येऊन त्याने एक तिरपी नजर लॅपटॉप वर टाकून गालात हसला..

“ फारच बिझी आहेत सर .” मनातच बोलून तो बाहेर पडला.


क्रमश ...
©®धनदिपा सम्राट
खूपच उशिर झाला आहे मला कल्पना आहे. प्लिज फक्त भागांबद्दल बोला. हा भाग कसा वाटला कमेंट करून कळवा.


🎭 Series Post

View all