भेटली तू पुन्हा !
भाग - 29
भाग - 29
“ माझ्या मुलापासून का दूर ठेवलस मला भक्ती का केलंस तू हे? का? का भक्ती?” राग अनावर होऊन त्याने हातातील बॉटल तिथेच फोडून टाकली. बॉटल फोडण्याच्या आवाजाने रामुकाका वरती आले.. त्यांनी दरवाजा ढकलला बंद नसल्यासाने ते काहीही विचार न करता आत आले पण अंधाऱ्या रूममध्ये विश्वराज त्यांना कुठेही दिसला नाही.. त्यांनी चाचपडत लाईट ऑन केली. गॅलरीचा दरवाजा उघडा असल्याने ते तिकडे गेले. गॅलरीत अंधार करून विश्वराज दूसरी बॉटल रिचवत होता. त्यांनी गॅलरीतील लाईट लावला.
“साहेब हे काय करून ठेवलंत तुम्ही.” विश्वराज दोन्ही पाय पसरून बसला होता..
“ आत चला..” ते त्यांना उठवत म्हणाले.
“नाही काका मी आज भरपूर पिणार कारण मी आज खूप खुश आहे. खूप खुश आहे.” विश्वराज हसत बडबडत होता.
“ साहेब हे काय बोलताय ..”
“तुम्हाला माहितीये काका मला एक मुलगा आहे पाच वर्षाचा आणि ते मला आज कळतेय की मी बाबा झालोय..” रामुकाका ऐकून काही क्षण स्तब्धच झाले. साहेब काय म्हणाले हे मेंदूपर्यंत पोहचायला त्यांना काही क्षण गेले. जेव्हा त्यांना समजले तेव्हा खुश होत म्हणाले,
“ खरं साहेब.”
“ हो एकदम खरं काका .” तो हसून सांगत होता.
“ पाच वर्षानंतर मला कळतयं. तुम्हाला माहितीये काका त्याला त्याच्या बाबांविषयी काहीच माहिती नाही.. त्याला त्याचे मॉम डॅड सोबत राहायचं आहे. ” हे बोलतांना त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं होत.
“माझाच मुलगा माझ्यासमोर अनोळखी म्हणून आला. खूपच गोड आहे तो. मला अंकल म्हणतो त्याला माहितच नाही की मी त्याचा बाबा आहे.. मला ही आजच कळलं की तो माझं बाळ आहे माझं. मी किती दुर्देवी आहे काका मी त्याच्या जगात येण्याच्या आणि नंतरच्या कोणत्याही क्षणात त्याच्या जवळ नव्हतो. माझ्या बाळाचा जन्म, त्याला आपल्या या हातात घेणं, त्याचे बोबडे बोल, त्याच्या सोबत खेळणं, त्याची बाबा म्हणून मारलेली हाक या सर्व सर्व आठवणी गमावून बसलो काका!” तो हताश होऊन जड आवाजात बोलत होता. मन अगदी भरून आलं होतं .. हे सत्य तो नाकारत नव्हता पण पाच वर्ष या सत्यापासून अनभिज्ञ होता. या गोष्टीचा विश्वराजला त्रास होत होता.. त्याला त्रासात बघून काकांच्या ही डोळ्यात पाणी तरळले.
“ आणि हे कोणामुळे झालयं काका फक्त भक्तीमुळे .. मी तिला यासाठी कधीच माफ करणार नाही काका… कधीच नाही..” अखेर डोळ्यांतील अश्रू गालावर आले. बोलून पुन्हा त्याने बॉटल तोंडाला लावली.. पिल्यामुळे दुखावलेल्या मनातील भावना अखेर बाहेर पडल्या होत्या.. दारूची नशा आता त्याला चांगलीच चढली होती तरी त्याला आणखी प्यायची होती. काकांनी त्याच्या हातातून बॉटल सोडवली व त्याला आधार देऊन बेडवर व्यवस्थित झोपवलं. त्याच्या डोक्यावर थोपटवत त्याच्याजवळच बसले. त्याच्या अंगावर ब्लॅकेट टाकून ते गॅलरीत काचा गोळा करायला गेले. ते साफ करून लाईट ऑफ करून ते रुममधून त्यांच्या खोलीत गेले.
मनोहर आणि ममता तिला विमातळावर सोडायला आले.. गळाभेट घेतच भक्तीने राजने त्यांचा निरोप घेतला. चेकइन करून ते आपआपल्या सीटवर बसले. तिघांची सीट ही सोबतच होती. त्यामुळे राज आणि लिली दोन्ही टॅबवर गेम खेळण्यात रमले.
‘विश्वराजचा राग तर डोक्याच्या वर गेलाय त्यामुळे ते काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. प्रचंड राग येत असेल माझा पण माझ्यावर तो राग ही काढू शकत नाही म्हणून स्वतः लाच त्रास करू नये म्हणजे मिळवलं.’ भक्ती आताही त्याचाच विचार करत होती..
‘ पण ते शांत ही बसणार नाहीत. कोणता बॉम्ब फुटणार काय माहिती.’ मनात बडबडत तिने लॅपटॉप उघडला आणि त्यावर आलेले डिझाइन बघू लागली. त्यात सुधारणा करत तिने ते फायनल केले. नंतर इमेल बॉक्स ओपन केला. विश्वराजच्या कंपनीकडून मेल आलेला होता.. तो मेल वाचताच तिचे रागात श्वास वाढले. त्याने महिनाभरानंतरच्या फॅशन शो ची डेट फिक्स केली होती..
“ व्हॉट … रॉबिश ..”
“ पागल आहेत का हे..” इमेल बघून वैतागलेल्या स्वरात म्हणाली.
“काय झालं मॅम ?” लिलीने तिला वैतागलेली पाहून विचारलं.
“ हे बघ .” भक्तीने तिच्या समोर लॅपटॉप दाखवला…
“ व्हॉट .. पण सर असं कसं करू शकता ? इतक्या कमी वेळात हे होणार आहे का?” लिली तिचं नखं दाताने तोडत म्हणाली..
“इट्स अ बॅड हॅबिट.” लिलीला नख दाताने तोडतांना बघून राज म्हणाला.
“ माहिती आहे मला.” ती
“ तरीही करतेस?” तो हसत म्हणाला..
“ आता काय करायचं ?” लिलीला टेंशन येऊ लागले.
“ आता काय फक्त बघायचं .” भक्ती विचारात पडली..
सकाळी उशिरा विश्वराजला जाग आली आणि उठल्या उठल्या त्याने दोन्ही हातांनी डोकं गच्च आवळून धरलं ..
“ आ .. आ …” त्यांचं डोक ठणकत होतं. डोकं पकडूनच तो खाली उतरला.
“ काका ..” त्याने खाली उतरच आवाज दिला. खाली येऊन तो सोफ्यावर बसला. . काकांनी त्याला निंबूपाणी आणून दिलं.
“ हे घ्या साहेब .. डोकं दुखायचं कमी होईल.”
“थँक्यू काका याची खूप गरज होती.” निंबूपाणी पिऊन त्याच्या डोक्याला जरा आराम मिळाला.. तितक्यात अमर आला.
“ सर आपल्याला मिटिंगला जायचं आहे. तुम्ही रेडी नाही झालात.”
“ दहा मिनिटांत आवरून येतो..” म्हणत विश्वराज पळत रूम कडे गेला. दहाव्या मिनिटाला विश्वराज तयार होऊन बाहेर आला. .
“ चला येतो काका ..” विश्वराज त्याचा निरोप घेत म्हणाला.
“ साहेब नाश्ता?”
“ ऑलरेडी उशीर झालाय काका ऑफिस मध्ये करून घेईल. बाय .” विश्वराज बोलून घराच्या बाहेर पडला . गाडीत ऑलरेडी अमर येऊन बसाला होता..
“ सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ए आर कंपनीला ई-मेल पाठवला आहे.”
“ गुड . काही रिप्लाय आला ?”
“ अजूनतरी नाही .”
“ ओके.”
ऑफिसामधून जाऊन विश्वराज त्याच्या कामात व्यस्त झाला. एका मागे एक कंटिन्यू मिटिंग वाढल्या होत्या. कामातून त्याला उसंत मिळाली नव्हती. मिटिंग संपली तसा तो त्याच्या केबिनमध्ये येऊन चेअरला मागे मान टेकवून डोळे बंद केले. डोळे बंद केल्याबरोबर त्याच्या समोर दोघांचा चेहरा आला. कालच्या आठवणी त्यांच्यासमोर नाचायला लागल्या.. मंद हसू पसरलं त्याच्या चेहऱ्यावर .. काही क्षणातच हसूच्या ऐवजी रागीट भाव झळकले..
भक्ती आणि राजला घरी पोहचायला दुपार झाली होती. लिलीला तिच्या घरी ड्रॉप करून ते त्यांच्या बंगल्याकडे निघाले..
“ राज बाळा !” रावसाहेबांचा आवाज त्याच्या कानावर पडला.
“ नानू ..” तो पळतच त्यांच्या दिशेने धावला आणि त्यांना घट्ट बिघडला. .
“ नानू मी कित्ती मिस केलयं तुम्हाला. तुम्ही पाहिजे होता तिथे.” आदिराज
“ राज आधी फ्रेश हो बेटा मग बाबाना गमती जमती सांग”
“ नानू मी आलोच फ्रेश होऊन.” तो वरती रूममध्ये पळाला.
“बाबा प्रताप अंकल ठीक आहेत आता?”
“ हो आता बराय तो .”
“ जा फ्रेश होऊन जेवण करून आराम कर. थकलेली दिसतेय.” काळजीने तिच्या गालवर हात फिरवला तसं तिने बाबांना मिठी मारली.
“ बाबा ..” बाबांच्या मिठीत तिचं उरलेले अवसान गळून पडलं आणि ती हुंदके देतच रडू लागली. तिच्या डोक्यावर पाठीवर मायेने हात फिरवत ते तिला मोकळं होऊ देत होते. रडून मोकळी झाल्यावर ती मिठीतून बाजुला झाली..
“ जा फ्रेश होऊन जेवण करून आराम करा. जेवणं पाठवतो वरतीच.”
“ तुम्ही जेवलात ?”
“ हो ..”
आदिराज फ्रेश झाल्यावर नानूंच्या खोलीत आला..
क्रमश ...
हा भाग कसा वाटला नक्की कळवा. लवकर भेटायचं असेल तर कमेंट करून सांगा .
हा भाग कसा वाटला नक्की कळवा. लवकर भेटायचं असेल तर कमेंट करून सांगा .
©® धनदिपा सम्राट
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा