Login

भेटली तू पुन्हा ! भाग - अठ्ठावीस

भक्ती विश्वराज
भेटली तू पुन्हा ! भाग - 28


“वि.. विश्वराज ..” ती थरथरत्या आवाजात म्हणाली..

“ गेट ऑऊट ऑफ माय रूम.” तो मोठ्या आवाजात म्हणाला. त्याच्या आवाजाने तिचे डोळे ओलावले. 

“ मी ..” ती पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करत होती की तो भरभर पावलं टाकत तिच्याकडे आला. तिच्या हाताला पकडून तिला बाहेरच्या दिशने ओढतच आणत तिला दाराच्या बाहेर काढले. तिच्या डोळ्यांतून अश्रू बाहेर आले.. विश्वराज रूमच दार बंद करतच होता की ती त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असतांनाच तिची बोटं दारात जोरात आपटली गेली.. 

“आई गं .” कळवळतच तिने हात बाजूला केला. तिचा अस्पष्ट आवाज त्याला आला पण त्याने दुर्लक्ष केले. बोटांना झिणझिण्या आल्या म्हणून तिने हात झटकले तेव्हा त्यांतून रक्तांचे काही थेंब खाली फरशीवर पडले...तिच्या तीन बोटांना जखम झाली. डोळ्यांतील पाणी भरभर येऊन गालांवर वाहू लागले.. 

“मॅम, काय झाले?” तिला हाताला पकडलेलं बघून अमर काळजीने तिच्या जवळ जात म्हणाला.. 

“ काही नाही.” म्हणतच ती भराभरा चालत निघून गेली.. लिफ्ट ने ती अनन्याच्या रूममध्ये गेली. तिथूनच तिने रूमसर्विस वर फोन लावून फर्स्ट एड बॉक्स मागून घेतला.. त्याचे मागे ममता ही आल्या.

“ भक्ती, काय झालं गं फर्स्ट एड बॉक्स कशाला?” म्हणत त्यांची नजर तिच्या हाताकडे गेली. 

“ काय लागलं हे कसं लागल तुला?” त्यांनी तिचा हात त्यांच्या हातात घेतला. ममता यांनी कापसाने बोटावरील रक्त पुसायला सुरवात केली.. 

“ काकू मी करते.” भक्ती काकूला म्हणाली. 

“मी करतेय ना .” त्यांनी तिला दम दिला.

“ लक्ष कुठं असतं तुझं ..  किती लागलयं हे .. कशात अडकली बोटे.” 

“ लक्ष नसल्यामुळे दारामध्ये बोटे आपटली गेली.” खरं कारण ती सांगू शकत नव्हती. ममता यांनी तिच्या बोटांना मलम पट्टी लावून दिली. 


भक्ती ज्या पदधतीने इथून गेली अमर तिच्याकडे पाहतच राहिला. 
‘मॅमच्या हातांना काय झालयं?’  तो वळला तर त्याला खाली फरशीवर रक्ताचे डाग पडलेले दिसले.. 

‘हे काय ..’ अमर विचार करतच होता
 तितक्यात रूमचा दरवाजा उघडला गेला.

“खाली काय बघतोय असा.”  विश्वराजने ही खाली मान झुकवली त्याचीही नजर त्या रक्त सुकलेल्या डागांवर वर गेली.. 

“ अमर हे ब्लड? लागलं तुला?” 

“ मला नाही मॅमना लागलय .”

“ काय … कुठे आहे ती. तिला बाहेर काढून मी आत निघून गेलो. ती बाहेर होती का? तो आवाज भक्तीचा होता.” 

“ मी आलो तेव्हा ते बाहेर हाताला पकडून थांबलेले होते. ”

“ कोणता रूम नंबर?” 

“माहिती नाही सर त्या लगेच लिफ्ट मध्ये निघून गेल्या.” अमर माहिती पुरवत म्हणाला.. 

“रागाच्या भरात मी काही करू नये म्हणून तिला रुमच्या बाहेर काढलं पण पुन्हा दुखावून बसलो तिला.शीट मॅन .”

विश्वराजला आता स्वतःवरच राग यायला लागला होता. त्याने हाताची मुठ भिंतींवर आपटली…


“ सर.. “ विश्वराज पुन्हा भिंतीवर मारायला जाण्याआधी अमरने त्याचा हात पकडला. 

“ सर प्लिज.” अमरने त्याला विनंती करत स्वतःला इजा होण्यापासून थांबवले.  

“ अमर लेट्स गो. फ्लाईट ची वेळ होतेय .” त्याने बॅग हातात घेतली. डोळ्यांवर गॉगल चढवून पुढे गेला.. 

अमर गेलेल्या विश्वराजच्या दिशेने बघत होता. 
‘मध्येच सरांना काय होतं? राग पण येतोय आणि त्यांची काळजी पण वाटतेय आणि आता तर असे निघून गेलेल जसे काही घडलेच नाही.” तो ही खांदे उडवत त्यांच्या मागे गेला.. 


ममता यांनी भक्तीच्या बोटांना ड्रेसिंग करून दिली.. काही वेळानंतर ती तिच्या रूममध्ये आली.. लिली आणि आदिराज टॅबवरती गेम खेळत होते. 


“ मम्मा, कुठे होतीस केव्हाची?” तिने पटकन हात लपवला.   स्माईल ठेवत त्यांच्याकडे पाहिले. 

“आम्ही फ्रेश पण झालो. तू पण जॉइन हो आम्हाला.”
 

“ नको तुम्ही खेळा .. मला बॅग पॅक करायची आहे. उद्या जायचं आहे.” ती बोलून बाथरूम मध्ये फ्रेश होण्यासाठी गेली. शॉवर घेऊन ती चेंज करून बाहेर आली. बाहेर येऊन तिने बॅग पॅक केली.. तितक्यात ममता आणि मनोहर  आत आले. ममता यांनी भक्तीसाठी हळदीच दूध घेऊन आल्या होत्या.. त्या हॉलमध्ये आल्या. 

“ मम्मा, आजी आजोबा आलेत .” 

“ कसं वाटतयं बेटा तुला..” मनोहर यांनी तिच्या डोक्यावर हात फिरवला.

“ मी ठीक आहे हो काका .. आपल्याला एवढ्याने काही होत नसते ..” ती हसत म्हणाली. 

“ हे घे कोमट दूध पी. लवकरं बरी होईल जखम.” 

“ जखम .. मम्मा काय झालं तुला … तुझ्या हाताला काय झालं? ही पट्टी का बांधली. काय लागलं कसं लागलं .” भक्तीच्या हाताची पट्टी बघून आदिराज पॅनिक होऊन एकावर एक प्रश्न  विचारात होता.

“ अरे काही नाही झालयं बाळा , 

“मग बँडेज का बांधलय ? दाखवं बरं मला.. आजी आजोबा डॉक्टरांना बोलवा.” आदिराज तिचा हात हातात घेऊन त्यावर हळुहळू फुंकर मारत होता..


“खूप दुखतय मम्मा .” फुंकर मारतच म्हणाला..  

“थोडंसं दुखतय .”

“ आजोबा बोलवा डॉक्टरांना तिला औषध देतील…” 

“ राज काही गरज नाही रे बाळा त्याची माझ्याकडे औषध आहे ते घेते मी.” 

“हे घे दूध पी …” त्याने दुधाचा ग्लास तिच्यासमोर केला..

“नंतर पिते मी ..” तिने चेहराच बनवला.

“मम्मा प्लिज .”  तो त्याच्या मम्माला दुध पिण्यास विनवत होता त्याला माहिती होतं त्याची मम्मा दुध प्यायला किती नाटकं करते. त्याने दुधाचा ग्लास तिच्या ओठांना लावला. तिने चेहराच बनवतच ती दूध पिऊ लागली. ओठांवर हसू ठेऊन हे तिघेही त्या दोघांकडे बघत होते..

“गुड गर्ल.” दुध पिऊन झाल तसं तो त्याच्या मम्माला म्हणाला. 

“ गुणाचा गं बाय माझं बाळ.” ममताने त्याच्या डोक्यावरुन हात फिरूवून कानाच्या वर टेकवत बोटं मोडून आल्याबाल्या घेतल्या.. त्यांच्या असे करण्याने राज भारीच लाजला.. 

“ किती गोड लाजतोय.” त्यांनी त्याची हनुवटी पकडत म्हटले. 

“भक्ती हे तुझ्यासाठी .” त्यांनी एक गिफ्ट बॉक्स भक्तीला दिला.

“ काकू याची काही गरज नाही. मी नाही घेणार हे.” 

“घे गुपचूप जास्त बडबड नको.” त्या खोट्या खोट्या रागवत म्हणाल्या. 

“भक्ती घे रे बाळा.” मनोहर आग्रह करत म्हणाले.

“ आणि हे आहे आमच्या राज साठी .” त्यांनी सोन्याची चेन काढून राजच्या गळ्यात घातली त्यात नाजुक ॐ त्यात बप्पाचं छोटं पेंडेंट होत. त्याला फार आवडलं.

“ तुला आवडलं ?” मनोहरनी आदिराजला विचारले.

“ हो .. खूपच सुंदर आहे. थॅक्यू आजोबा.” त्याने त्यांना आनंदून मिठी मारली. त्यांनीही त्याला मिठीत घेऊन त्याच्या पाठीवर हात फिरवत राहिले… 

“ आणि हे तुझ्यासाठी .” ममता यांनी लिलीच्या समोर एक बॉक्स पुढे केला.

“ मला नको मॅम .. मी नाही घेऊ शकत हे..” लिली ममता यांना नम्रपणे नकार देत होती. 

“मॅम तुम्ही तरी सांगा ना.” तिला ते गिफ्ट घ्यायला संकोच वाटत होता.. 

“ती काय सांगणार मला .. फॅमिली मेंबर आहेस तू मग आता आमची फॅमिलीतील झालीस. आणि सारखं सारखं मॅम नको म्हणू आपण ऑफिस मध्ये नाहीत.” ममता तिला आर्जव करत म्हणाल्या.

“लिली.” भक्तीने तिला नजरेनच खुणावत घ्यायला सांगितलं.  
उद्या सकाळची फ्लाईट असल्याने थोड्याफार गप्पा नंतर सर्व आपआपल्या रूममध्ये झोपायला गेले.. तोपर्यंत राज झोपून गेला होता..


मध्यरात्री विश्वराज अंजली व्हिलामध्ये पोहचला.. घरात गेल्या गेल्या त्याने बॅग सरकवली. ब्लेझर काढून बेडवर फेकून दिली. कपाटातून त्याची बॉटल काढून ती तोंडाला लावली. गटगट करून संपवूनच त्याने ती ओठांपासून वेगळी केली.. पुन्हा बॉटल काढून तो गॅलरीत जाऊन चेअरवर बसला. 

अरे आता पुढे काय होईल?

क्रमश ..

माझ्या वाचक मैत्रिणींनो मला माहिती आहे तुम्ही आतुरतेने पुढच्या भागाची वाट बघत असता. पण कधी कधी काही कारणास्तव लिहणं शक्य होत नाही. तुम्ही समजून घेत आहात त्याबद्दल तुमचे आभार . जसा लिहून झाला तसा मी म्हटल्याप्रमाणे भाग आजच पाठवला आहे. थोडा उशिर झाला पण लवकर पाठवला आहे. भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. असेच माझ्या कथेवर प्रेम देत राहा. भेटूया पुढच्या भागात..