Login

भेटली तू पुन्हा ! भाग - सव्वीस

भक्ती विश्वराज
भेटली तू पुन्हा !


भाग - 26

आदिराज विश्वराज ला हाताला पकडून स्टेजवर घेऊन आला.

“ अंकल ही माझी स्वीट ॲन्ड ब्युटीफूल मम्मा …” आदिराजने त्याच्या अंकलची ( डॅड आहे ते त्याला अजूनतरी माहिती नाही ) त्याच्या मम्मा सोबत (तिच्या नवऱ्यासोबत ) नव्याने ओळख करून दिली..पुढे काय होईल या भितीने तिच्या हृदयाची धडधड काही केल्या कमी होत नव्हती..

“मम्मा हेच ते अंकल आहेत ज्यांच्यासोबत मी खूप नाचलो आणि यांनीच खाली पडतांना मला कॅच केले होते.” भक्तीची विश्वराजच्या नजरेला नजर द्यायचं धाडस होत नव्हतं. ती राजकडे बघत कसनुस स्माईल चेहऱ्यावर ठेवण्याच प्रयत्न करीत होती.. विश्वराज शांत चेहऱ्याने तिच्याकडे बघत होता.. त्याची आपल्यावर रोखलेली नजर तिला खाली बघूनच सुद्धा जाणवत होती.

Aren't you going to thank them, mamma?” ती काही बोलत नाही म्हणून राजने भक्तीला विचारले.

“अं . ह… हो ..” तिने एक लांब श्वास भरून घेतला..

“थॅक्य यू मिस्टर अभ्यंकर .” ती त्याच्याकडे बघत त्याच्या नजरेला नजर देत म्हणाली.. आतून घाबरली असली तरीही त्याच्यासमोर तिला हिंमत दाखवयाची होती ... विश्वराजने आदिराजला उचलून कडेवर घेतले.. निरीक्षण करत तो आदिराज कडे बघत होता.. त्याच्या गालावर हात फिरवून त्याला मिठीत घेतले..किती थंडक मिळाली त्याच्या जळत्या मनाला त्याचा अंश त्याचं बाळ आज त्याच्या कडेवर होतं. पाच वर्षानंतर आज त्याला माहीत झालं की त्याचा एक मुलगा आहे. इमोशनल झाला पण तेवढ्याच दृढ निश्चयाने त्याने त्याची ज्वलंत नजर तिच्यावर रोखली.. त्या नजरेतील ज्वाला बघून तिच्या हातापायांना घाम फुटला. तितक्यात फोटोग्राफरने फॅमिली फोटो काढण्यासाठी आवाज देऊन समोर बघायला सांगितलं. लिली स्टेजवरून खाली उतरायला गेली..
‘फॅमिली फोटोत माझं काय काम.’ ती नजरेच भक्तीला बोलत होती.
भक्तीनेही तिला थांब म्हणून नजरेनेच दम दिला. मग ती सुरजितच्या बाजूला जाऊन उभी राहिली. अनन्याच्या बाजूला भक्ती अन् तिच्या बाजूला अंतर ठेवून विश्वराज आदिराजला कडेवर घेऊन उभा होता. लिलीने त्या फोटोग्राफरला मान तिरपी करून इशारा केला त्यावर त्याने लांबून तिला अंगठा दाखवला.


“ सर प्लिज मॅडमांच्या जवळ या.” फोटोग्राफर विनंती करत त्यांना जवळ उभ करण्याचा प्रयत्न करत होता. विश्वराज तिच्याकडे सरकला. लिलीने पुन्हा डोळ्यांनी खूण केली.

“ आणखी थोडं जवळ .” फोटोग्राफर पुन्हा जवळ आणत होता.

‘आता काय खांद्यावर हात ठेवून मिठीत घ्यायला सांगतो काय हा घुबडतोंड्या! ’ भक्ती त्या फोटोग्राफरला वैतागून मनातच शिव्या देत होती.

विश्वराज आणखी जवळ सरकला. त्याचा दणकट खांद्याचा स्पर्श तिच्या हाताला झाला आणि ती किंचित बाजूला सरकली. चेहऱ्यावर उसन हसू घेऊन उभी राहिली.फोटो क्लिक झाला तसा सुटकेचा श्वास बाहेर पडला .. तो जवळ उभ राहिल्याने त्याच्या परफ्युमचा सुंगध तिच्या नाकात शिरला. तिच्या छातीत धडधड व्हायला सुरवात झाली पण त्याच्या हलक्या स्पर्शाने ही तिच्या अंगावर शहारे उमटले आणि ती दुसऱ्या जगात त्याच्यासोबत विहार करायला गेली. आदिराजला घेऊन तो खाली आला. भक्ती ही खाली उतरून पटकन निघून गेली. ती छातीवर हात ठेवून तिच्या जडावलेल्या श्वासांना नॉर्मल करत होती. बाकीचेही पाहुणे मंडळी स्टेजवर शुभेच्छा देण्यास उत्सुक होते.

“ काय झालं मॅडम, असे काय छातीवर हात ठेवून उभे आहात. काही त्रास होतोय का? दुखतय का?” लिलीने तिला छातीवर हात ठेवून मोठे मोठे श्वास घेताना बघून काळजीने विचारत होती.

“ अग ये.. थांब ग बाई … दुखत बिखत नाही … ते जरा .. ॲसिडीटी झाली. होईल ठीक.” ती नजर चुकवत म्हणाली.

“ डॉक्टर कडे जाऊया .”

‘ पागल बिगल झाली का फक्त ॲसिडिटी साठी कोण डॉक्टरकडे जातं.’

‘मुळात मला ॲसिडीटी झालीच नाही. डोक्यात आणि अंगात केमिकल लोच्या झाला. काय सांगू तुला.’ भक्ती ओठांमध्ये पुटपुटत होती..

“राजलाच सांगते मी.” लिली
“ आता राजला काय सांगते राज ची चमची .. गप्प बस .. चल काही थंड घेते बर वाटेल मला आणि तो कुठयं ?”

“ त्याच्या डॅडसोबत .” लिली पटकन बोलून गेली.

“ बर .” भक्ती पुढे चालायला लागली… घशालाही कोरड पडली होती त्यामुळे थंड सरबत घेतल्यान तिला बरं वाटलं ..


“ हे आदी, तुझे डॅड कुठे आहेत म्हणजे ते नाही दिसले?” आधीच दोघांमध्ये चांगली गट्टी जमली असल्याने विश्वराजने आदिला विचारलं. त्याने एकवेळ त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं.

“ काय झालं तू असा का बघतोय?” त्याच्या विचारण्याने आदिराज विचारात पडला होता.

‘बोलू की नको .. पण काय बोलणार मी यांच्याशी काय सांगणार… मीच कधी बघितलं नाही माझ्या डॅडला’

आणि विश्वराजला त्याच्याकडून जाणून घ्यायचं होत.

‘त्याला आपल्याबद्दल कितपत माहिती आहे ते.’


“Aren't they alive?” आदिराजच्या डोळ्याकडे बघत
विश्वराजने हा प्रश्न विचारून त्याच्या चेहऱ्यावरील भाव बघत होता. उत्तराची प्रतिक्षा त्याला करावी लागलीच नाही.


“ नो अंकल . दे आर ॲब्युसुलेटली फाईन .” आदिराज वेळ न दडवता लगेच म्हणाला. उत्तर ऐकून विश्वराज आतून थोडा सुखावला.

“ मग कुठे आहेत ते ?” आदिराजला निरखतच त्याने पुढे विचारलं.

“ ते मुंबई मध्येच आहेत पण ते आमच्यासोबत राहत नाही ..” खाली मान घालत तो उदास होत म्हणाला.

“ पण मी खूप मिस करतोय त्यांना. आय विश की मम्मा आणि डॅडच पॅचअप लवकर व्हावं मग मला माझ्या डॅडच ही प्रेम मिळेल.” हे बोलतांना त्यांचे डोळे आनंदाने चमकत होते.. त्याला त्याच्या डॅडची ओढ लागली होती.

“ येस तुझी ही विश लवकरच पूर्ण होईल.” तो आदिराजला आश्वस्त करत म्हणाला.. त्याने असं म्हटल्यावर हसतच त्याने विश्वराजला मिठी मारली मग त्याने ही त्याच्या मिठीभोवती हात घट्ट केले.


इकडे नवरा नवरीचे फोटो सेशनही पार पडले होते... बाकीच्या मंडळीची जेवण झाली होती. मोजकेच जेवायचे थांबले होते.. त्या सर्वांना डायनिंग टेबलकडे बोलायला सांगितले..


“ राज …” आवाजाच्या दिशेने दोघांच्या माना तिकडे वळल्या. समोर भक्तीला बघून राज तिच्याकडे धावला.. विश्वराज दोघांना निरखून बघत होता. खास करून भक्तीला, आज किती तरी दिवसांनी ती त्याच्यासमोर साडीत तयार होऊन आली होती.. मरून रंग तिच्या गोऱ्या रंगावर उठून दिसत होता.. पहिल्यापेक्षा जरा जास्त सुंदर वाटत होती.. पटकन तिला मिठीत घ्यावं अशी त्याची इच्छा होतं होती. ती आताही त्याच्याकडे पाहत नव्हती.

त्याचा परिवार त्यांच्या डोळ्यांसमोर होता. पण तो त्यांना जवळ घेऊ शकत नव्हता.. दोघांना मिठीत घ्यावं अस मनात असून पण करता येत नव्हतं आणि हे फक्त भक्तीमुळे होत होतं. त्यावेळेस भक्तीने थोडं ऐकून घेतलं असत तर आज ही वेळ आलीच नसती.. विचार करूनच त्याने हाताची मुठ बंद केली. मुठ घट्ट बंद केल्यामुळे त्याच्या हातावरच्या हिरव्या शीरा फुगून वर आल्या. डोळ्यात राग उतरून कठोर झाले. डोळ्यांत आग आणि राग घेऊन तो तिच्या जवळ येऊ लागला. त्याची चाहूल जाणवताच तिचं हृदय वेगाने धडधडायला लागलं. खाली बघतच तिचं त्याच्या बंद मुठीकडे लक्ष जाताच तिच्या हृदयाने जास्तच स्पीडने पळायला सुरवात केली... किती राग आहे त्याच्या हातावरून दिसून येत होतं. त्याचा राग तिला नवीन नव्हता पण राजने त्याचा हात पकडला आणि आपोआप दुसऱ्या हाताची मुठ सैल पडली. कठोर भाव ऐवजी त्यात शांत भाव आदिसाठी प्रेम काळजी दिसायला लागली.. चेहऱ्यावर हास्य ठेवत तो झपाझप पावले टाकून तिच्या पुढ्यातून निघून गेला..

“ मम्मा चला ना .” तिला तिथेच उभ राहिलेले बघून आदिराज थांबला आणि त्यासोबत विश्वराज ही थांबलेला तिला दिसला.. दोघांचे हात एकमेकांच्या हातात होते.

“अ …हो .” तिने कसाबसा शब्द बाहेर काढला. दोघं पुढे गेले तस तिने हुश्श' करत घशात अडकलेला श्वास मोकळा सोडला आणि तीही त्यांच्यामागे गेली.