भेटली तू पुन्हा !
भाग - 25
विश्वराज खाली उतरत भक्तीला बघत होता.
“सर धिस वे. “ अमर म्हणाला आणि विश्वराज त्या दिशेने चालू लागला.. तो फूड काऊंटर कडे गेला. त्याची नजर इकडेतिकडे फिरत भक्तीला शोधत होती.. एका दिशेला त्याची नजर थांबली. लहान मुलांच्या घोळक्यांमध्ये लिली भक्ती राज आणि त्याचे मित्र टेबलावर जेवणाचा आस्वाद घेत होते. लिलीने वाढप्याला प्रत्येकाला त्याच्या आवडीचे पदार्थ वाढायला लावले होते..
दाल पकवान, मिर्चीवडा, कचोरी , खिचडी , दाल बाटी, चुरमा, शाही गट्टे आणि रबडी , सांगरी , घेवर मालपुवा , खीर , बदामाचा शिरा , मलाई बर्फी , मुंग दाळीचा शिरा, सोबत पराठे मावा बाटी. असे कित्येक पकवान्न त्या रांगेत तिला दिसत होते. त्या सुंगाधाने तिच्या पोटात कावळे नाचायला लागले होते.
‘पेहले पेट पुजा फिर काम दूजा’ लिलीने स्वतःसाठी ही ताट वाढून घेऊन ती ही त्या मुलांसोबत जेवायला बसली.. भक्ती यांच्या कडे आली..
“ अरे वा! सगळे सोबत. लिली तू पण . .” भक्ती हसून म्हणाली.
“ असा घमघमाट वास येतो होता की राहवलचं नाही मग बसले टेस्ट करायला. ” लिली दोन्ही खांदे उडवत म्हणाली..
तू हे फक्त टेस्ट करणार आहेस ?”
“ हो … टेस्टसाठीच फक्त एक एक पदार्थ वाढून घेतलाय. जेवणावर नंतर ताव मारीन .” लिली डोळे मिचकवत हसली. भक्तीही गालात हसली..
“ मॅम थोड तरी टेस्ट करा ?”
“ नको नंतरच करेल ग तू आरामात टेस्ट कर.”
“ नको नंतरच करेल ग तू आरामात टेस्ट कर.”
“ थोडंसं तरी घ्या.” लिली आग्रह करत म्हणाली. भक्तीने एक घास बाटीचा घेतला.
“ उम्म्म .. खूपच स्वादिष्ट आहे .” आपसुकच तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले.
“मम्मा . .” राजने तिला त्याच्याजवळ बोलावले.
“आ कर ..” तिला तोंडाचा आ करायला सांगून त्याने गोड पदार्थ तिला भरवला आणि तेव्हाच विश्वराजने त्यांच्याकडे पाहिले. दोघांच्या चेहऱ्यावर गोड हसू होतं. तो दोघांना दूरून न्याहळत होता.. त्याने प्रेमानं भरवणं .. बोलणं विश्वराजला विचार करायला भाग पाडत होतं.
“वॉव गुलाबजामून ..”
“नाही .”
“मग ?”
“मावाबाटी.”
“हो तुला कसं माहित ?”
“मी तिथे असलेल्या अंकलला प्रत्येक पदार्थांची नावे विचारले.”
“खूपच छान राज … आवडलं तुला हे सर्व ?”
“ हो.. पण इथे माझी फेवरेट बिटर गोर्ड ची भाजीच नाही.”
“राज ती तुझी आवडती भाजी आहे. खूप जणांना नाही आवडत रे.. म्हणून नाही ठेवली असणार… हि लिली पण खात नाही. मला ही फारशी आवडत नाही..” भक्ती हसून बोलत होती.. ‘कारले खाण्याची आवड याबाबतीत अगदी वडिलांवर गेलाय. म्हणून तर राजच्या वेळी कच्चं कारले खाण्याचे डोहाळे लागले होते.’ भक्ती हळूच पुटपुटली.
“Bitter gourd is healthy.”
“पण का हेल्दी फूड खात नाही. आपण या पदार्थाने किती तरी आजरांपासून दूर होतो.” राज कळवळीने बोलत होता.
“अगदी बरोबर आहे तुझं पण ज्याची त्याची आवड असते.कोणाला कडू आवडत तर कोणाला नाही आवडत..”
“पण हे …”
“यावरून आपण नंतर बोलूया आता तू शांत जेवण कर घरी गेल्यावर तुला भरलेल्या कारल्याजी भाजी, कारल्याची भजी करून देईल.”
“ चालेल.” तो शांतपणे जेवू लागला..
‘ दोघ बापलेकांच काय प्रेम आहे ते कडू कारल्यावर कुणास ठाऊक..” तिने कपाळावरच हात मारला आणि ती राजसाठी दाळ भात घ्यायला गेली..
‘ दोघ बापलेकांच काय प्रेम आहे ते कडू कारल्यावर कुणास ठाऊक..” तिने कपाळावरच हात मारला आणि ती राजसाठी दाळ भात घ्यायला गेली..
“ मला कटवण्यासाठी खोटं बोललात काय?” तो मगासचा तरूण अभिषेक तिच्या बाजूला येऊ उभा राहिला..
“खोट कशाला बोलू मी. माझं लग्न झालयं आणि मी एका मुलाची आई आहे. तो बघा माझा मुलगा.” तिने टेबलकडे हात दाखवत म्हटले.
“ अरे नकार द्यायचा तर अशा प्रकारे द्यायचा का? आय डोन्ट बिलीव्ह.” त्याचा अजूनही भक्ती च्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता.
‘ काय माणूस आहे हा झालय रे माझं लग्नं. थांब प्रूफच दाखवते.’ ती मनातच वैतागत म्हणाली..
“ चला माझ्याबरोबर .” ती त्याला म्हणाली. तो ही तिच्याबरोबर येऊ लागला..
“ हे घे थोडा दाळ भात घे. आणखी कुणाला हवयं .” ती बाकींच्या मुलांनाही म्हणाली. .
“ आन्टी थॅक्यू .” काही मुलांनी दाळ भात घेतला..
“थॅक्यू मम्मा .” राज म्हणाला तस तिने अभिषेक कडे बघून नजरेनेच सांगितले. ‘ हा बघ माझा मुलगा.’ हेच तिच्या नजरेतील भाव होते.
“राज हे तुझे मामा आहेत. .” भक्तीने अभिषेक ची राजसोबत ओळख करून दिली..
“हे माझे मामा आहेत पण आधी नाही सांगितल तू .”
“ मला पण आत्ताच माहिती पडलं .. ते इकडे असतात म्हणून.”
“ हॅलो मामा .. कसे आहात तुम्ही .. इतके दिवस घरी का नाही आलात ?” राजने भोळेपणाने विचारले पण अभिषेक तो मात्र तोंडावर पडल्यासारखा चेहरा झाला होता.
“ ठीक आहे.” त्याने तिकडून काढता पाय घेतला.
आपल्या मॅडने अनोळखी व्यक्तीशी राजसोबत मामा म्हणून ओळख करून दिली त्यावरूनच ती काय समजून गेली. लिली त्या अभिषेकच्या मागे गेली.
“ तुमची ज्या सातबारावर नजर आहे तिच ऑलरेडी भूमीपूजन झालेलं आहे आणि त्याचा मालक तिथे उभा राहून तुमच्याकडेच रागाने बघतोय.”
तिने उभ्या असलेल्या विश्वराज कडे एक नजर बघून अभिषेकला म्हणाली. विश्वराज पॅन्टच्या दोन्ही पॉकेट मध्ये हात घालून उभा त्याच्याकडेच बघत होता.. लिलीने विश्वराजची भिती दाखवली अन् अभिषेक तिथून सटकला.
तिने उभ्या असलेल्या विश्वराज कडे एक नजर बघून अभिषेकला म्हणाली. विश्वराज पॅन्टच्या दोन्ही पॉकेट मध्ये हात घालून उभा त्याच्याकडेच बघत होता.. लिलीने विश्वराजची भिती दाखवली अन् अभिषेक तिथून सटकला.
“राज आणखी काही हवयं.” भक्तीने विचारले.
“नाही..”
“चल माऊला भेटायच नं ..”
“हो .” आता सर्व मुलांची जेवणे झाली होती आणि ते ही बाहेर जाण्यासाठी निघाले. राज लिली भक्ती तिघेही स्टेजवर गेले .
“हो .” आता सर्व मुलांची जेवणे झाली होती आणि ते ही बाहेर जाण्यासाठी निघाले. राज लिली भक्ती तिघेही स्टेजवर गेले .
“काँग्रॅच्युलेशन्स माऊ.” आदिराजने अनन्याला मिठी मारली.
“ थॅक्यू बच्चा .” अवन्याने त्याच्या गालावर ओठ ठेवले.
“ कुठे होतास केव्हाचा ? मी कितीवेळची वाट बघतेय .”
“ सॉरी माऊ , नाचून दमलो ना मी मग मला भूक लागली होती.”
“ सॉरी काय म्हणतोय रे बच्चा.. तुला जेवण आवडलं ?”
“ हो खूपच.”
“ मी पण इकडे आहे .” सुरजित मध्येच म्हणाला.
“ तू नको जळूस रे आमच्यावर .” अनन्या खोट रागवत म्हणाली..
“काँग्रॅच्युलेशन्स अंकल .” राजने सुरजितला ही मिठी मारत शुभेच्छा दिल्या.
“ थॅक्यू चॅम्प ..” मिठी मारून राज बाजूला झाला आणि समोरच त्याची नजर एका ठिकाणी थांबली. त्याला बघून हसला. भरभर चालत स्टेजवरून खाली उतरून समोर धावला. हाताला पकडतच तो स्टेजच्या दिशेने येऊ लागला.. स्टेजवर येऊन राजने त्या व्यक्तीला भक्तीच्या समोर बघू केले. तिने भीतीनेच आवंढा गिळला.
“ अंकल ही माझी मम्मा …” आदिराजने त्याच्या अंकलची ( डॅड आहे ते त्याला अजूनतरी माहिती नाही ) त्याच्या मम्मा सोबत (तिच्या नवऱ्यासोबत ) नव्याने ओळख करून दिली…
क्रमश ..
चला आता त्याला तर माहिती झालं राज त्याचा मुलगा आहे. पण राज ला अजून माहिती नाही. ते ही लवकरच कळेल पण विश्वराज काय करणार आहे? ते जाणून घेण्यासाठी वाचत राहा भेटली तू पुन्हा !
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा