Login

भेटली तू पुन्हा ! भाग - चोवीस

भक्ती विश्वराज
भेटली तू पुन्हा !


भाग - 24

“ यजमान आता तुम्हाला आयुष्यभर यांचा चेहरा पाहण्याशिवाय गत्यंतर नाही.” भटजी मिश्किल हसत म्हणाले तसे ज्यांना समजले ते हसत होते. सुरजित ही गालात हसला. अनन्या नजर झुकवून लाजत होती. अंतरपाठ दूर झाला तसा सुरजित अनन्याकडे बघतच राहिला.. हिरव्याकंच नववारी साडीला गोल्डन किनार , कपाळावर मुंडावळ्या आणि उठून दिसणारी चंद्रकोर, हातात हिरवा चुडा, मराठमोळ लूक अतिशय सुंदर दिसत होती. तो तिला बघण्यात हरवला की वरमाला घालण्याचा ही त्याला विसर पडला.

“ यजमान, वरमाला घाला.” भटजी त्याला भानावर आणत म्हणाले . पुन्हा सर्व हसायला लागले.. पुढच्या विधींना सुरवात झाली..

भक्ती अजूनही विश्वराजच्या नजरेला दिसली नव्हती. तो तिथे असून पण तिथे नव्हता. जेव्हा सुरजित मांडवाच्या प्रवेशव्दाराजवळ पोहचला तेव्हाच राज नाचून थकलेला होता..

“ अंकल मला वॉशरूम ला जायचं आहे.” कडेवर असलेल्या राजने विश्वराजचा चेहरा दोन्ही हातांमध्ये पकडून विश्वराजच्या कानात सांगितले..

“ ओके चल मी येतो.”

“नको. . दिदी आहे तिकडे आणि मी रूम मध्ये जाऊन कपडे चेंज करून येतो.”

“तुझी दिदी कुठे आहे ? आता चेंज करायचं?.” विश्वराज आदिराज ने दाखवलेल्या दिशेकडे बघत म्हणाला. लिलीने त्यांना आपल्याला कडेच पाहतांना बघून ती त्या बायकांच्या मागे जाऊन लपली.

“ हो .. पटकन सांगतो मम्माला नाहीतर ती ही मला भेटणार नाही. माऊला मदत करतेय न ती.” राजने सांगितले.


“ दीदी दिसत नाहीये. व्यवस्थित जाशील ना बच्चा ..” तो काळजीने म्हणाला..


“ डोन्ट वरी अंकल जाईल मी.” राजने त्याला खाली उतरून त्या बायकांच्या घोळ्यांकजवळ आणले. राजला दिदी दिसली तो पळतच तिच्याकडे गेला..

“ दीदी चला मला जोरात सु सू आलीये.” तो पोट पकडून म्हणाला.

“ खाली असलेल्या वॉशरूम मध्ये जाऊन येऊ.”

“ नाही मला फ्रेश होऊन कपडे चेंज करायचे आहे. आधी मम्माला बोलावू.”

“ ओके चल .” दोघेही अनन्याच्या रूमबाहेर आले. दारावर टक वाजवू लागले. आतून भक्तीने दार उघडले..

“ मम्मा, मला सूसू आलीये चल लवकर आपल्या रूममध्ये.. ”

“ ठीक आहे . लिली अनन्याला कळव पाच दहा मिनिटांत आले मी. ”

“ सांगते .” लिली अनन्याच्या रूममध्ये सांगायला गेली. भक्ती आणि आदिराज ही त्यांच्या रूममध्ये पळतच आले.


“ मम्मा कम सून .”

“हो रे या साडीमुळे धावता येत नाहीये मला.” तिने एका हातात साडी पकडून पटापट चालत रूमजवळ आली.

“ अरे घामाने इतका ओला झालास?”

“ हम्म नंतर सांगतो.”

“ हम्म.”


आपल्या जवळच्या की ने तिने रूमचा दरवाजा उघडला. राज पळतच वॉशरूममध्ये शिरला.. फ्रेश होऊन तो बाहेर आला.

“ बाहेर माझ्या फ्रेंडस् अंकलं सोबत खूप नाचलो मी . भरपूर मज्जा आली ग मम्मा.. खूप आवडलं मला..”

“ चल मी तुझे हातपाय धुवून देते.”

“मी करतो गं..” त्याने अंगावरचे कपडे काढले आणि टॉवेल घेऊन आत गेला. बाथ घेऊनच बाहेर आला..

“शॉवर घेऊन आलास तू.” तिने त्याच्याकडे बघत विचारले.

“हो.. आता जरा फ्रेश वाटतय मला.. मम्मा मला थोडी थोडी भूक वाटतेय गं .”

“खाली गेल्यावर फूड काऊटर कडे जाऊ आधी.” ती त्याची तयारी करून देत होती.

*****



लग्नाचे विधी चालू होते.. विश्वराज चेअर बसून मोबाइल तर बाहेर नजर फिरवत होता.. एक व्यक्ती त्याच्या शेजारील चेअर येऊन बसला.


“ बापबेटाच्या जोडीने कमाल केलीस..” ओळखीचा आवाज आला तसा त्याने फोनमधून बाहेर मान काढली..


“हॅलो मिस्टर देसाई ..” त्याने त्यांच्याकडे बघत स्मित दिले.

“ काही म्हणालात का? माझं लक्ष नव्हतं.”

“तुम्ही आणि तुमच्या मुलाने छान डान्स केलात. धम्मालच केली हे बघा व्हिडिओ.” अखिलेशने त्याच्या जवळ फोन दिला. त्याने हातात पकडला व्हिडिओ बघत त्याच्या चेहऱ्यावर भलीमोठी स्माईल आली. त्याने मिस्टर देसाईला त्याच्या फोनवर पाठवण्यास सांगितले.

“नाक आणि डोळे तुमच्यासारखे दिसताय. काल लवकर झोपलेला नाहितर मम्मी पप्पासोबत तो ही नाचला असता.. पूर्ण फॅमिली एक साथ पण झोप आली की मग त्यांना काहीही नको. आपल्या आनंदासाठी त्यांच्या झोपेवर कशाला बंधने घालायची…”
अखिलेश ओघात बोलून गेले तसा विश्वराज हे सर्व ऐकून थक्क झाला होता..


‘ज्युनिअर आता पाच वर्षाचा असेल?..”

“ मिस्टर अभ्यंकर “ त्याच उत्तर आलं नाही म्हणून अखिलेश ने पुन्हा आवाज देऊन त्यांची लागलेली तंद्री भंगली…


“ काही म्हणालात ?”

“म्हटलं किती वर्षाचा आहे ज्युनिअर ?”

“ आदिराज इज फाईव्ह इयर्स ओल्ड..” तो कसनुसं चेहऱ्यावर हास्य ठेवत म्हणाला.

“ छान नाव ..”, अखिलेश त्याच्याकडे बघत म्हणाले..

“वन मिनिट मिस्टर देसाई . अर्जंट कॉल आहे..” त्याने कॉलच खोटचं कारण सांगून बाहेर आला.. डोक्यात विचारांनी थैमान घातला. .


‘मिस्टर देसाई आता काय म्हणाले .. त्यांना मला आणि आदिराज ला सोबत बघून मिसअंडरस्टॅडिंग झाली असेल. पण त्यांना कसं माहिती काल तो लवकर झोपलेला होता. काही कळत नाहीये. मी जेव्हा त्याला पहिल्यांचा पाहिलं तेव्हा मला मीच उभा आहो असंच वाटत होतं. एक ओढ जाणवते त्याच्याबद्दल.. त्याची एक झलक ही मनाला थंडावा देणारी असते. खरचं मिस्टर देसाई म्हणाले तो माझा मुलगा आणि मी त्याचा बाबा God knows.’ त्याने हाताच्या मुठीत केस गच्च धरले. . त्याच्या मनात उठलेल्या प्रश्नांनाची उत्तरे भक्तीच देऊ शकणार होती. त्याने भक्तीला कॉल केला पण आताही ती पर्स मध्ये फोन सायलेंट असल्याने ती कॉल उचलू शकत नव्हती..

‘माझ्या प्रश्नाचं उत्तर एकच व्यक्ती देणार.’ बोलून त्याने त्या व्यक्तीला फोन लावला. त्यांचा कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याने लागत नव्हता.. त्याच्या रागाचा पारा हळूहळू वर चढत होता.. वर वर शांत दिसत असला तरी आतून रागाच्या लाव्हा उसळत होत्या.. तो चेअर वर बसून समोरचे विधी बघत राहिला..

भक्ती राजला घेऊन खाली आली.. राजला लिली सोबत फूड काऊंटर वर सोडून ती मंडपात आली.

“ सर .. मॅम आल्यात .” अमरने त्या दिशेला पाहून विश्वराजला सांगितले. विश्वराजने अमरच्या नजरेच अनुकरण करत त्या दिशेला पाहिले. तिला पाहून तर आता जास्तच लाव्हा उसळत होता.. कधी समोरसमोर विचारतो असं त्याला झालं होतं.स्टेजवर विधी चालू होते. म्हणूनच ती समोरच चेअर वर बसली. सुरजित अनन्याच्या गळ्यात मंगळसुत्र घातले. सगळ्यांनी अक्षतांचा त्याच्यांवर वर्षाव केला. भांगेत कुंकू लावले. हे बघून तिला तिच्या लग्नाचा दिवस आठवला. लग्नाच्या आठवणीने भक्तीचे डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

“हॅलो .” शेजारील एक उमदा तरूण तिच्याकडे बघत म्हणाला..


“ हॅलो ..” ती नॉर्मल चेहरा करून म्हणाली. तिच्या शेजारील चेअरवर बसला.. त्याला तिथे बसलेलं बघून विश्वराजच्या कपाळावर आठ्या पडल्या.

“मी अभिषेक ठाकुर .. माझा बिझनेस इथेच आहे . मला तुमच्याशी थोड बोलायचं आहे. मला तुम्ही आवडल्या ॲज अ लाइफ पार्टनर .” तो स्पष्ट म्हणाला.. भक्तीशी असं हसतांना बघून विश्वराजच्या हाताच्या मुठी गच्च आवळल्या गेल्या.. त्याला सहनच होत नव्हतं..

“ सॉरी मिस्टर ठाकुर .. माझं ऑलरेडी लग्न झालेलं आहे. एक्सक्यूज मी.” तिनेही लगेच नकार देत विषय संपवला आणि तिथून उठली.. विधी संपले होतेच.. ती पटकन स्टेजवर गेली.. अनन्याला मिठी मारून शुभेच्छा दिल्या.. सुरजितला ही शुभेच्छा दिल्या.

“चॅम्प कुठे आहे गं..” अनन्याला राज न दिसल्याने विचारले.

“साहेबांना भूक लागली म्हणून लिली सोबत गेलाय जेवायला..”

“नाचून नाचून भूक लागली असणार ..” अनन्या हसत म्हणाली.

“हम्म..”

“उद्या रिसेप्शन आहे तुम्ही जाताय भक्तीजी ..”

“हो .. मला जावं लागेल .. जिजू .”

“ मी राजला घेऊन येते.” भक्ती स्टेजवरून खाली उतरतच होते की तितक्यात तिथे विश्वराज रुबाबात चालत वरती येत होता.

“काँग्रॅच्युलेशन मिस्टर ॲन्ड मिसेस सुरजित सिंग ..” भक्ती

“ थॅक्यू सो मच..”

“ अमर ..”

“येस सर. .” त्याने एक इनव्हलेप विश्वराजच्या हाती दिलं. विश्वराजने ते सुरजितच्या वेडिंग गिफ्ट म्हणून हातात दिले.

“मिस्टर अभ्यंकर हे .. प्लिज तुमच्या डेटस् नूसार कळवा..” तो सुद्धा लगेच स्टेजवरून खाली उतरला.