भेटली तू पुन्हा

Love


पौर्णिमेची शुभ्र रात्र, आकाशात पिठूर चांदणं पडलेलं, रेल्वेचा तो प्रवास, गर्द झाडी, घनदाट जंगलातून चाललेली गाडी, डब्यांमध्ये निरव शांतता,बाहेर रुळाचा खडखडाट, दरवाज्यातून बाहेर डोकावत, "भेटली तू पुन्हा" हे गाणं ऐकत, गुणगुणत, थंड आणि गंधित वाऱ्याची झुळूक आपल्या चेहऱ्यावर घेत सुखावणारा आदिराज, आणि त्याचीच सहप्रवासी मीरा
लवकरचं..... ??

"भेटली तू पुन्हा"

"आदिराज" हा सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून बेंगलोर मधील एका नामांकित कंपनीत रुजू होणार होता. तसा त्यानं या अगोदरही रेल्वे प्रवास केला पण आज त्याला काहीतरी वेगळं जाणवतं होतं. का नाही जाणवणार? त्याच्या आयुष्याचा ही प्रवास सुरू होणार होता. चांगली नोकरी मिळाली ,घरचं सगळं छान होतं, फक्त सहप्रवासी न्हवती, तिचाही शोध याच्या पाठीमागे आई वडील घेतंच होते, पण याचं आपलं लग्न म्हणलं की घाम फुटायचा , त्याला टेन्शन यायचं की तिच्या अपेक्षा पूर्ण करता येतील?? तिला समजून घेता येईल ? बाकीचं सगळं जाऊदेत पण त्या अनोळख्या व्यक्ती सोबत आयुष्य व्यतीत करता येईल, इतकं साधं सरळ आयुष्य असतं??
बर्थ वर रेंगाळत हाच विचार करत लोळत, रात्रीचे 11 वाजले होते. त्याला काही केल्या झोप लागेना, तसाच तो उठला हेडफोन लावला आणि गाणी ऐकत दरवाज्याच्या बाहेर डोकावत शीतल वाऱ्याची झुळूक अनुभवत असताना त्याला तो शीतल वारा हवाहवासा वाटू लागला, तो प्रसन्न, आनंदी होता, शांत होता. इतक्यात त्याला मागून फार मंजुळ, गोड आवाजात "excuse me" अशी हाक आली, अर्थातच तो मुलीचा होता, ती "मीरा" होती....
"मीरा" दिसायला सावळी पण, फार गोड होती, तिचे सुंदर बोलके, गहिरे डोळे , लांबसडक केस. कमनीय बांधा, नाकात नाजूकशी नथ. तिच्या सौन्दर्यात अजून भर टाकत होते. तीने नुकतंच engineering चं शिक्षण पूर्ण केलं होतं, नोकरीच्या शोधात ती बाहेर पडलेली. मीरा तशी बिनधास्त मुलगी होती, प्रेमळ होती, आदर करणारी, तितकीच तापट होती त्यामुळे समस्त पुरुष वर्ग तिच्यापासून लांबच होता.
"O hello" म्हणत डोळ्यासमोर आदिच्या समोर टिचकी वाजवत मीरा बोलली.
आदि मीरा ला पाहता क्षणीच पुरता वेडा झाला होता तसा आदि भानावर येत म्हणाला Sorry,
मीरा - Itsk
काय बोलायचं म्हणून आदि अडखळत म्हणाला, तुम्ही मला हाक का मारलीत.
तशी ती म्हणाली. मलाही असं तुमच्यासारखं दरवाज्यातून डोकावून सुखाचा आनंद घ्यायचाय म्हणून हाक मारली. तुम्ही किती लहान मुलासारखं वागत होता, पाहिलं मी , फार आनंदी होता.
आदि - हम्मम, बर या तुम्हीही अनुभवा हा क्षण म्हणत तो दरवाज्यापासून लांब झाला.
मीरा पुढे झाली तो वाऱ्याचा शीतल स्पर्श अनुभवत असताना तिच्या चेहऱ्यावर आपोआपच smile आली, तिचा निरागस पणा चेहऱ्यावर दिसत होता. लहान मुलासारखी निरागसता पाहिल्यावर तिच्या कोणीही प्रेमात पडेल. त्यात चंद्रप्रकाशात ती अजूनच सुंदर दिसत होती. ती अजून थोडं दरवाज्यातून पुढे डोकावत आनंदाने ओरडली,
तसा आदिराज थोडा घाबरत म्हणाला अहो काय करताय तुम्ही बाकीचे प्रवासी झोपलीयेत , त्यांना त्रास होईल असं आपण वागू नये.
तशी मीरा म्हणाली sorry हा थोडं excitement च्या नादात झालं.
आदि- अहो sorry वैगेरे नका म्हणू, मला काही प्रॉब्लेम नाही पण आपल्यामुळे इतरांना त्रास नको, असं वाटतं.
मीरा - तुम्ही म्हणताय ते खरं आहे.
बर Thank u तुम्ही दारातून उठून मला जागा दिलीत त्याबद्दल .
आदि- त्यात काय एवढं , मी काही फार मोठं केलं नाही ओ.
मीरा - आजकाल ही गोष्ट ही मोठी आहे, म्हणत ती निघून गेली ...
आदि तसाच तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता,
ती गेल्यावर तो ही आपल्या बर्थ जाऊन डोळे झाकून पडला होता, राहून राहून मगाशी ती लहान मुलासारखी वागणारी गोड, प्रेमळ मीरा दिसत होती,त्याला मीरा आवडली पण त्याला एक प्रश्न सतावत होता. तिच्याबद्दल वाटणारं हे जे काही आहे ते प्रेम आहे की आकर्षण ??
काही केल्या त्याला झोपच लागेना रात्रीचे दोन वाजले होते, परत तो दरवाजा जवळ एकटाच शांत बसला . पुढे स्टेशन आलं , गाडी प्लँटफॉर्मवर उभी होती, जवळ असणारं पाणी संपलं म्हणून पाणी आणायला म्हणून तो बाहेर पडला, दरवाज्यातून बाहेर समोरच नळ होता. पाणी भरत असताना मीरा च्या विचारात तो इतका गुंग झाला की ट्रेन सुरू झाली हे त्याला कळलंच नाही, त्याच्या बाजूने जाणाऱ्या एका प्रवासाने त्याला याची जाणीव करून देताच तो पळत सुटला रात्र असल्याने सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. एक दरवाजा उघडा दिसत होता, तो सुद्धा दरवाजा एक प्रवासी बंद करणार इतक्यात धावत येणारा आदिराज दिसला, तो दरवाज्याच्या अगदी जवळ येताच त्याला एक मदतीचा हात पुढे असल्याचं जाणवलं, त्यानं पटकन ती मदत घेऊन ट्रेन मध्ये प्रवेश केला, ती मदत करणारी "मीरा" होती .
तसा तो तिला thanx म्हणून आपल्या बर्थ वर येऊन पडला काही केल्या त्याला झोप लागेना. त्याचं विव्हळण जाणवत होतं, मध्येच भविष्याची चिंता वाटू लागली.

अहो तुम्ही अजून जागेच ?? त्या आवाजाने आदी तंद्रीतून बाहेर आला, हळूच डोळे पुसत तो मीरा कडे पाहत म्हणाला, हो झोप लागत नाहीये,
मिराच्या नजरेतून ते सुटलं नाही, त्याच्या डोळ्यात अश्रू होते, हे तिच्या लक्षात आलं होतं, यावरून तो फार संवेदनशील आहे हे तिला कळलं होतं, खरंतर तिला पहिल्यांदा जेंव्हा भेट झाली, तो निरागस पणे बाहेर डोकावत होता तेंव्हाचं.

हम्मम, hiiii मी मीरा
Hiii , मी आदिराज
तुम्ही कुठे राहता ?? - मीरा
कोल्हापूर - आणि तुम्ही ??
मी पुण्यात, मीरा उत्तरली
Hmm मग इकडे ??
हा, बेंगलोर मध्ये मी जॉब साठी जातोय, - आदि
अरे वा मी पण जॉब साठीचं चाललीय - मीरा
बर, तुम्ही परत का आला होता?
काय झालंय माझी आई चं booking या डब्यात झालंय आणि माझं पुढच्या डब्यात so तिला पाहायला आलेले.
Okk
चला मग bye good night - मीरा
Good night - आदि
असं म्हणत दोघेही आपापल्या बर्थ वर जाऊन झोपी गेले ...


क्रमशः ....










🎭 Series Post

View all