भेट तुझी होता...

Bhet tuzi hota

भेट तुझी होता....

भेट तुझी होता

जीवनाला नवीन गंध मिळाला

तुझ्या येेण्यानी

मनाला एक आधार मिळाला ।।

जीवनाच्या या वाटेवर

खडतर प्रवासात

भेट तुझी होता

प्रवासही सुखकर झाला ।।

जीवनाच्या या काटेरी

वळणावर

भेट तुझी होता

काटा ही गुुुलाब झाला ।।

भेट तुझी होता

प्रेमाचा अनमोल ठेवा मिळाला

आता हा दुरावा सहवत नाही

तुझ्या सोबत जीवन गाणे गात रहावे

भेट तुझी होता एवढा विश्वास मिळाला ।।

भेट तुझी होता

माझ्या प्रेमाला रंग मिळाला

माझ्या प्रेमाला रंग मिळाला......

©®ऋतुजा वैरागडकर

ऋतूरंग

माझा कविता लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे, कशी वाटली

ते नक्की कळवा