Dec 08, 2021
कविता

भेट

Read Later
भेट

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

भेट ही कशीही असू शकते

घडून आलेली किंवा घडवून आणलेली

दोन्ही भेटीत फरक आहे

अचानक झालेली भेट

बरेचदा आनंददायी असते

आठवणींना उजाळा मिळतो

आपण जुन्या गोष्टीत रमून जातो

मनाला चैतन्य मिळते

रोजच्या धबडग्यातून

थोडा वेळ बाहेर येते

परत एकदा जगून घेते

नवी उमेद नवी दिशा मिळण्यासाठी

ठरलेल्या भेटीत पण

भावनांचे मिश्रण असते

कोणाची पहिलीच भेट असते

त्यात हुरहूरच जास्त

जुन्या मित्रमैत्रिणींची भेट

एकदम धमाल उडवून देते

काय होतास तू, काय झालास तू

हे जाणवून देणारी

काही भेटी या फक्त

भेटायचं या आशयाने होतात

त्यात कोणतीच भावना नसते

असते ती फक्त औपचारिकता…

तरी सुद्धा पुन्हा भेटूया

या शब्दात काही तरी जादू आहेच

पुन्हा भेटण्याच्या भविष्यात

भूतकाळातल्या भेटीच्या स्मृती

वर्तमानात जगण्याच्या

आशा आकांक्षा दडलेल्या असतात

आयुष्याकडे बघायची

नवी दिशा मिळते

तेव्हा भेट ही महत्त्वाचीच

नाही का….??

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now