भय इथले संपत नाही पर्व 2 भाग 18

हिराबाई दिव्य अस्त्राचे ज्ञान घेऊन आल्या. आता त्या थांबवू शकतील का विभावरीला?



भय इथले संपत नाही पर्व 2 भाग 18

मागील भागात आपण पाहिले की निशा आणि हिराबाई यांना पुढचा मार्ग सापडला. तसेच इकडे तिक्षिताने आखलेली योजना यशस्वी झाली. जयवंत आणि विनय दोघेही त्यांच्या ताब्यात होते. इकडे प्रियाला निरंजन तिचे बाबा आहेत हे समजले. आता पाहूया पुढे.


महाराणी गार्गी म्हणाल्या,"निशा,हिराबाई तुम्ही दोघीही त्या पवित्र वृक्षाखाली बसा. त्यानंतर आम्ही सांगितलेले मंत्र जपा."


हिराबाई आणि निशा दोघीही वृक्षाजवळ गेल्या. दोघींनी त्या पवित्र वृक्षाला अभिवादन केले. पद्मासन घालून ध्यान लावले आणि मंत्र जप सुरू केला. त्याबरोबर पवित्र किरण दोघींच्या शरीरात प्रवेश करू लागले. निशाच्या सर्व शक्ती जागृत होऊ लागल्या.


हिराबाईंना दिव्य अस्त्र कुठे आहे आणि तिथपर्यंत जायचा मार्ग याचे ज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर दोघी हळुहळू ध्यानातून बाहेर आल्या.



महाराणी गार्गी पुढे म्हणाल्या,"निशा,इथे एक खलिता आहे. त्यात पुढील मार्ग लिहिलेला आहे. आता तुम्ही वायुगमन मंत्र जपा."


हिराबाई आणि निशाने डोळे बंद केले आणि मंत्र म्हंटला. त्याबरोबर दोघी पुन्हा त्या निबीड अरण्यात पोहचल्या.


इकडे जयवंत आणि विनय दोघेही कैदेत होते. तिक्षिता त्यांना विवस्त्र करून निघून गेली.


जयवंत म्हणाला,"विनय,काहीही झाले तरी चावी मिळायला नको."


विनय हसला,"काका,काळजी करू नकोस आपल्याला वाचावणारी भरपूर माणसे बाहेर आहेत."


तेवढ्यात बाहेर आवाज ऐकू आला,"तिक्षिता,मंत्र विधी करण्यासाठी आपल्याला तेरा चेटकीणी लागतील. तू त्यांना संदेश पोहोचव."


प्रियाने ग्रंथ वाचल्यावर तिला स्वतः च्या शक्ती समजल्या होत्या. तिने डोळे उघडले आणि उमा,अरुणा आणि स्वाती तिघींना जवळ बोलावले.

"आता ही शेवटची लढाई आहे. आपल्याला अतिशय सावध राहावे लागेल. उमा,तू वाड्यातील देवघरात असलेले पवित्र जल घेऊन ये. स्वाती तळघरात जाऊन तुम्ही चालवू शकाल अशी शस्त्रे घेऊन या."


दोघीही त्याप्रमाणे गेल्या. मग प्रिया अरुणाला म्हणाली,"हे घे,यात मुक्ती मंत्र आणि काही इतर मंत्र मी देवनागरी भाषेत लिहिले आहेत. वेळ आल्यावर याचा वापर करायचा आहे."



इकडे गढीत विभावरी खुश होती.

तिने तिक्षिताला सांगितले,"शृंगार दालन सजव. जयवंतला घेऊन ये."

तिक्षिता बाहेर गेली. विभावरीने कायाकल्प मंत्र जपला. त्याबरोबर तिने पार्वतीचे रुप धारण केले. अंजिरी रंगाची साडी,केसात माळलेला मोगऱ्याचा गजरा, पायात वाजणारे पैंजण. असा साज चढवला.


इकडे तिक्षिता जयवंतला संमोहित करून दालनात घेऊन आली. गुलाब पाकळ्यांचा मंद सुवास दरवळत होता. सगळीकडे फुलांची आरास केली होती. जयवंत पहातच राहिला. इतक्यात समोरून त्याला पार्वती चालत येताना दिसली.


त्याची पहिले आणि एकमेव प्रेम. जिच्यासाठी आजवर तो अविवाहित होता.


जयवंत मनाला समजावत होता हा भ्रम आहे. विभावरी त्याच्या जवळ आली. तिने संमोहन मंत्र जपला आणि त्याचा अंमल दिसू लागला.


जयवंत जवळ जात विभावरी म्हणाली,"किती वियोग सहन करायचा अजून. आता नको हा दुरावा."


तिच्या उष्ण श्र्वासाने तो बेधुंद होऊ लागला. थोड्याच वेळात वस्त्रांची बंधने गळून पडली आणि धुंद प्रणयाला बहार आली. भर ओसरल्यावर जयवंत शुद्धीत आला.


तो विवस्त्र होता आणि शेजारी विभावरी. तो ताडकन उठला आणि त्याबरोबर विभावरी जागी झाली.


त्याच्याकडे पहात हसत म्हणाली,"मला कोणीही रोखू शकणार नाही. तुझे बीज मी मिळवले आहे."



इकडे निशा आणि हिराबाई महाराणी गार्गीचा निरोप घेऊन बाहेर आल्या होत्या. संपूर्ण निबीड अरण्यात चालताना त्यांना काही भास होत होते. अचानक एका ठिकाणी भोवताली धुके आले आणि पाठोपाठ क्रूर हसत त्या तिघी प्रकट झाल्या.



त्या तिघी अतिशय क्रूर आणि शक्तिशाली चेटकीनी. गेली कित्येक शतके ह्या वाटेवर थांबल्या होत्या. दिव्य अस्त्र कोणालाही मिळू नये यासाठी.


निशा आणि हिराबाई दोघींना पाहून तिघीही क्रूर हसल्या,"आजवर इथवर पोहोचलेले कोणीही जिवंत परत गेले नाही."


हिराबाई ठामपणे म्हणाल्या,"कारण आजवर कधीही गजगामिनी देवींचे वंशज इथवर आले नव्हते."


गजगामिनी देवीचे नाव ऐकताच त्यातील मोठी चेटकीण म्हणाली,"मग तर तू कधीच जिवंत जाऊ शकणार नाहीस. महामाया देवीला संपवून तिने आम्हाला कायम अंधारात कैद केले."


असे म्हणून त्यांनी हल्ला चढविला. निशाने जादुई दंड आपटला आणि प्रकाशाचा लोळ उत्पन्न झाला. सगळीकडे प्रकाश पसरला. त्यामुळे त्या चेटकीनी दुर्बल झाल्या. ही संधी साधून हिराबाईंनी ध्यान लावले आणि मुक्तीमंत्राचे आवाहन केले.


त्याबरोबर चेटकीनी एका जागेवर बांधल्या गेल्या. तरीही त्यातील एकीने तिचे अस्त्र फेकले आणि ध्यानस्थ हिराबाई आता मारल्या जाणार पण निशाने तो वार सहज अडवला.


मुक्तीमंत्राचा जप वाढू लागला आणि पवित्र अग्नी त्या तिघिंकडे झेपावला.


त्या ओरडू लागल्या,"तुम्हाला याची शिक्षा मिळेल. राणी अवंतिका याचा सूड घेईल."


पाहता पाहता पवित्र अग्निने त्यांना जाळून भस्म केले आणि ते निबीड अरण्य प्रकाशाने उजळून निघाले.


हिराबाई ध्यानातून बाहेर आल्या. त्यांनी महाराणी गार्गीने दिलेला दिव्य मणी बाहेर काढला आणि दोघींनी त्यावर हात ठेवून मंत्र जपला. त्याबरोबर दोघी जणी वायुमार्गाने एका दिव्य ठिकाणी पोहचल्या. तिथे पोहोचल्यावर समोरच त्यांना एक दिव्य वृक्ष दिसला. हिराबाई आणि निशा दोघींनी दिव्य पुरुषाचे स्मरण केले आणि त्या ठिकाणी एक दिव्य पुरुष प्रकट झाला.


त्याबरोबर त्यांना अभिवादन करून हिराबाई म्हणाल्या,"महर्षी, शेकडो वर्षांपूर्वी कैद केलेल्या काळया शक्ती आता बाहेर येऊ पाहत आहे. मी हिराबाई एका पवित्र कामासाठी दिव्य अस्त्राचे ग्रहण करायला आले आहे. तुम्ही मला आशीर्वाद द्यावा."


त्याबरोबर तो सिद्ध पुरुष पुढे आला त्याने हिराबाईंच्या डोक्यावर हात ठेवला. त्याबरोबर दिव्य ज्ञान त्यांना प्राप्त झाले. त्यानंतर पुढे त्यांना दिव्य अस्त्र प्राप्तीच्या मार्गातील दोन्ही सिद्ध पुरुषांनी अनुग्रह दिला.


निशा म्हणाली,"आता अस्त्र आणायला जायचे ना?"


हिराबाई म्हणाल्या,"निशा,अस्त्र आपल्याला इथून न्यायचे नाहीय. वेळ आल्यावर तुला कळेल."


असे म्हणून हिराबाई आणि निशा दोघी वायूगमन मंत्रद्वारे परत आल्या


प्रियाने बोलणे संपल्यावर सगळेजण आपापल्या परीने मार्ग शोधत होते. इतक्यात नेहा आणि हिराबाई प्रकट झाल्या.


प्रिया पळत जाऊन हिराबाईंना बिलगली,"आजी,विनयला काही होणार नाही ना?"


हिराबाई म्हणाल्या,"काळजी करू नकोस! काही होणार नाही त्याला. त्याआधी आपल्याला दिव्य अस्त्र सिद्ध करावे लागेल."


तेवढ्यात वाड्याच्या प्रवेशद्वारावर आरडाओरड ऐकू आली. प्रिया आणि हिराबाई धावत बाहेर आल्या. तीन मुलींना मारून टाकले होते आणि आठ पैकी चार दिशांचे वृक्ष नष्ट झाले होते.


हिराबाई म्हणाल्या,"निशा,तू आणि प्रिया दोघी पार्वतीच्या मदतीने आधी पवित्र वृक्ष पुनरुज्जीवित करा. तोवर मी दिव्य अस्त्र सिद्ध करायचे अनुष्ठान सुरू करते. लक्षात ठेवा आपल्याकडे एकच दिवस आहे."


इतक्यात वाड्यावरून विनायक धावत आला,"आजी,उमा ,अरुणा आणि स्वाती गायब आहेत."


ह्या तिघींना वाड्यातून कोण घेऊन गेले असेल? दिव्य अस्त्र नेमके कुठे असेल? विभावरी यशस्वी होईल का?

वाचत रहा.
भय इथले संपत नाही.


🎭 Series Post

View all