भय इथले संपत नाही पर्व 2 भाग 13

विभावरीने दोन्ही शिकारी पकडल्या.आता पुढे काय होणार?

भय इथले संपत नाही पर्व 2 भाग 13

मागील भागात आपण पाहिले,विभावरीने पहिला बळी घेतला.एक चावी मिळाली.आता दुसरा बळी महादेव.त्यासाठी विभावरी काय करेल?सगुणाबाई तिला थांबवू शकतील का?


सगुणाबाईंचा ह्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. काहीतरी चुकतेय असे सारखे वाटत होते. त्यांनी आता सावध वागायचे ठरवले. विष्णू सतत आजारी पडणे,सासरे बाहेरगावी जाणे आणि त्यात त्यांचा मृत्यू होणे.


ह्या सगळ्यात काहीतरी संगती असल्याचे त्यांना जाणवत होते. विधी मार्ग उरकले. त्यांनी चिंतामणरावांशी बोलायचे ठरवले. तशी संधी लवकरच मिळाली.


विभावरी आसपास नसताना त्यांनी चिंतामणरावांना हाक मारली,"भाऊजी,मला तुमच्याशी बोलायचे आहे."


चिंतामणराव म्हणाले,"वहिनी आम्हाला सुद्धा तुमच्याशी बोलायचे होतेच."

सगुणाबाई म्हणाल्या,"भाऊजी,आबा एकटे पुढे आले? विभावरी आजारी असताना?"


चिंतामणराव म्हणाले,"वहिनी मला तेवढेच आठवत आहे. खरच आबा एकटे पुढे निघाले."


सगुणाबाई म्हणाल्या,"माझे एक ऐकाल?"

चिंतामणरावांनी होकारार्थी मान हलवली. सगुणाबाई हसल्या.त्यांनी एक धागा दिला,"कोणालाही दिसणार नाही असा अंगावर बांधा."


विभावरी काहीतरी कारण काढून शेतावर गेली. तिने पाहिले जखिन आणि महादेव एकमेकांत पूर्ण बुडाले होते. महादेवाचा तो अनावृत्त पुरुषी देह पाहून तिच्यातील अभिसारिका तडफडत होती. तरीही ती लांब जाऊन थांबली.


जखिन बाहेर पडली. गुपचूप निघून जात असताना तिच्या मानेला मायावी वेणीचा विळखा बसला.

विभावरी म्हणाली,"पंधरा दिवसांनी मला तो हवाय. लक्षात ठेव जर काहीही केलेस तर गाठ माझ्याशी आहे."


जखिन आता महादेवमध्ये गुंतली होती. विभावरी घरी परत आली.

तिने म्हातरिकडे एक पदार्थ दिला,"उद्या सकाळी त्या पोराला हे खायला घाल. म्हणजे पंधरा दिवस काही तो उठणार नाही."


म्हातारी घाबरून म्हणाली,"पर आस सारखं करून पोराला काय झालं मंजी?"


विभावरी हसली ,"तू फक्त संपत्ती आणि पैसे मोज. एक पोर मेले तर दुसरे होईल."

दुसऱ्या दिवशी विष्णू स्वयंपाकघरात आला.म्हातारीने त्याला जवळ बोलावले. ह्यावेळी सगुणाबाईंचे लोक सावध होते.जिवाजी आणि शांताने महातरीला पकडले. लगेच गुप्त कळ दाबून ते तिला कोठडीत घेऊन गेले.


सगुणाबाई रागाने थरथरत उभ्या होत्या. त्यांनी तिला विचारले,"कोणाच्या सांगण्यावरून करत होतीस? काय खायला घालत होतीस?


"म्हातारी काहीच बोलत नव्हती. आता तिला कितीही विचारले तरी ती सांगणार नव्हती. त्यांनी म्हातारीच्या कपाळावर मधोमध हात ठेवून मंत्र उच्चारला. म्हातारीला परत सोडून तिच्यावर नजर ठेवली. इकडे विभावरी परत आली. ती रात्री जेवायला बसली.


सगुणाबाई म्हणाल्या,"थोरल्या बाई,विभा माझ्या विष्णूला बरे नाही. त्याला घेऊन जरा माहेरी जाऊन येते. हवा बदलली की बरे वाटेल."


हे ऐकताच विभावरीच्या चेहऱ्यावर उमटलेले सूक्ष्म हसू सगुणाबाईंनी टिपले.

द्वारकाबाई म्हणाल्या,"तुम्ही जा.इकडे मी आणि विभा आहोत."


सगुणाबाई जाणार म्हणजे मार्गातील मोठा अडथळा दूर होणार होता. दुसऱ्या दिवशी सगुणाबाई माहेरी जाणार होत्या. विभावरी अतिशय आनंदात खोलीत आली..तिला महादेवचा अनावृत्त देह आठवत होता. तिने चिंतामणरावांना स्वतः च्या हाताने विडा बनवून दिला.


चिंतामणराव सावध होते.
त्यांनी विडा खाल्ला नाही. त्यानंतर प्रणय रंगला. त्याचवेळी उन्मादात तिने महादेव मला तू हवा आहेस असे म्हंटले. चिंतामणराव सावध असल्याने हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. तरीही आता काहीही बोलणे धोकादायक होते.


सकाळी उठल्यावर त्यांनी पाहिले,विभावरी झोपली होती. त्यांनी पटकन सगळे कागदावर लिहिले आणि जिवाजीकडे दिले. त्यानंतर ते गुपचूप देवळात निघून गेले. सकाळी विभावरी उठली. कैद केलेल्या आत्म्यांना तिने सगळी कामे सोपवली त्यानंतर ती द्वारकाबाईंच्या खोलीत गेली.


त्यांना कामात पाहून विभावरी म्हणाली,"थोरल्या बाई,आज कृष्णाला आम्ही आंघोळ घालू का? आम्हालाही यशोदा होऊ द्या."


द्वारकाबाई हसत म्हणाल्या,"खुशाल घाल,खूप त्रास देतो हल्ली."


विभावरी छोट्या कृष्णाला आंघोळ घालायला घेऊन गेली. तिने कृष्णाचे कपडे काढले आणि तिला तिची तिसरी शिकार सापडली.


कृष्णाला आंघोळ घालून बाहेर आणले.

त्याचे आवरत असताना विभावरी म्हणाली,"बाई,आज मळ्यावर भाकरी घेऊन मी जाते."

द्वारकाबाई म्हणाल्या,"ठीक आहे.सोबतीला कोणी देऊ का?"


तशी विभावरी हसली,"अहो,मला कोण काय करेल तेव्हा?"


दुपारी जेवण घेऊन गेल्यावर तिने जेवणात काही औषधी मिसळल्या.


इकडे सगुणाबाईंचे निरोप योध्यांपर्यंत पोहोचले होते. निरोप मिळताच निरंजन आणि मिथिला निघाले. लवकरात लवकर मदत पोहोचणे आवश्यक होते. अमावस्या आता दोन दिवसांवर आली होती.


सगुणाबाई कडक साधना करत होत्या. त्यांनी जिवाजी आणि शांता दोघांना सूचना दिल्याप्रमाणे ते चोवीस तास वाड्यावर होते.


विभावरी पूजेची थाळी घेऊन आली.

नाटकी हसत म्हणाली,"सासूबाई,देवळात गेले होते.आबांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करायला. हा घ्या प्रसाद."


तिने प्रसाद सगळ्यांना दिला. जिवाजी आणि शांता दोघांनी प्रसाद खाल्ला नाही. परंतु विभावरी हुशार होती. तिने घरातल्या पाण्यात ते द्रव्य मिसळले.


थोड्याच वेळात सगळे शांत झोपी गेले. फक्त चिंतामणराव प्रसाद न खाता आणि पाणी न पिता असल्याने सावध होते. त्यांनी बेशुध्द पडायचे नाटक केले.


सगळे मनासारखे झालेले पाहून विभावरी तिच्या मूळ रुपात आली. क्रूर लाल डोळे. वाढलेली नखे,पायापर्यंत रुळणारी मायावी वेणी. अतिशय भयंकर दिसत होती.तिने कृष्णाला उचलले. ती बाहेर जाताना चिंतामणराव हळूच तिच्या मागे गेले. जंगलातील गुहेत तिने कृष्णाला ठेवले.


आता तिने मंगलाचे रूप घेतले. वायुगमन मंत्र जपून ती शेतावर आली. महादेव तिला पाहताच तिच्या मिठीत धावला.



त्याला हळूच पकडत ती म्हणाली,"आव जरा दमान.एवढा उतावीळपणा बरा नाही."


महादेवने तिला जवळ ओढले,"मला फक्त तू पाहिजेस."



तिने त्याच्या ओठांवर हात ठेवले आणि हळूच त्याच्या तोंडात विडा टाकला. विडा खाताच महादेव बेशुध्द झाला.



चिंतामणराव धावत वाड्यावर परत आले. तोवर निरंजन आणि मिथिला पोहोचले होते.सगुणाबाईंना पाहताच चिंतामण पुढे झाला,"वहिनी,विभा चेटकीण आहे. ती कृष्णाला घेऊ गेली.मला ठाऊक आहे ती जागा."निरंजन म्हणाला,"शांत व्हा,चिंतामण.तुमचा मुलगा सुरक्षित राहील."

सगुणाबाई म्हणाल्या,"आता ह्या चेटकीनीला सोडायचे नाही. तिला धडा शिकवावा लागेल."

निरंजन म्हणाला,"आपल्याला तिला उद्या पकडावे लागेल."


विभावरी वाड्यावर आली. विधीची सगळी सामग्री घेतली.


क्रूर हसत ती म्हणाली,"आज रात्री महादेवचा भोग घेणार आणि उद्या सकाळी दोन्ही बळी देणार. राणी अवंतिका परत येणार."



काय होईल पुढे?दोन्ही मुले वाचतील का? विभावरीला पकडू शकेल का योद्धा संन्यासी."

वाचत रहा
भय इथले संपत नाही.

🎭 Series Post

View all