भावनांचा गोंधळ

भावनांचा गोंधळ

*


*शिर्षक- भावनांचा गोंधळ*

घालमेल असते मनात
तरीही चेहरा हसमुख,
कुटुंबाच्या सुखातच तिला
मानावे लागते तिचे सुख.

गाडा ओढताना संसाराचा
करते ती स्वप्नांचाही त्याग,
तरी कधीही नसतो तिच्या
मनात कुणाविषयी राग.

जपून नाती करी प्रेमाने
रेशीम धाग्याची ती गुंफन,
नाजुक स्पर्शाने अलवार
बांधते जिव्हाळ्याचे बंधन.

आयुष्याच्या वाटेवर स्त्रीची
होते कसरत अवघड,
रोज तिला चढावा लागतो
संस्कार अन् कष्टाचा गड.

जीवन घडी सावरताना
होतो भावनांचाही गोंधळ,
मनाचा गुंता सोडविताना
अलगद येते स्त्रीला बळ.
---------------------------
*सौ.वनिता गणेश शिंदे©️®️*
*मु.पो.गडद,ता.खेड,जि.पुणे*