भावकी 1

.
"तुला काय प्रॉब्लेम आहे माझ्या नातेवाईकांशी? पाहावं तेव्हा त्यांना बोलत असतेस...हे बघ, मला माझे नातेवाईक प्रिय आहेत आणि त्यांच्यासाठी मी काहीही करू शकतो.."

"हो? ते म्हटले बायकोला सोड तर तेही करशील?"

"हो...करेल.."

सुहास आणि कीर्तीचा वाद अगदी टोकाला गेला होता. दोघेही एका मोठ्या शहरात राहत होते. तिथे त्यांची नोकरी, घर सगळं स्थिरस्थावर होतं.

पण सुहासचा ओढा आपल्या गावी जास्त. जरा वेळ मिळाला की लगेच बस पकडायचा आणि गावी जायचा.

किर्तीला सुरवातीला काही वाटत नव्हतं. आपल्याला जशी आपल्या माहेरची ओढ असते तशी नवऱ्याला त्याच्या मूळ घराची ओढ असेल या जाणिवेने तिला काही वाटायचं नाही. सुरवातीला तीही कायम त्याच्या सोबत जात असे. हळूहळू घर, मुलं, नोकरी यात ती जास्त रमली आणि गावी जाणं कमी होऊ लागलं. पण या काळात तिने नवऱ्याचा चुलतभावांना चांगलं ओळखलं होतं. तिला ती लोकं काही ठीक वाटत नव्हती. त्यांच्या तोंडाला सतत दारूचा वास यायचा आणि त्यांची नजरसुद्धा विचित्र वाटायची.
*****

🎭 Series Post

View all