भविष्याची गुरुकिल्ली

लेख


गोष्ट छोटी डोंगराएवढी
विषय_मना घडवी संस्कार


जिजाऊ सारख्या वाघिणीचे दूध पिऊन स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज यांचा आजही खूप नावलौकिक आहे. शिवाजी महाराजांप्रमाणेच अनेक थोर‌ आणि वीर पुरुष, संत , अनेक थोर महिला होऊन गेल्या आहेत. ते सगळे उत्तम मिळालेल्या संस्कार मुळे‌.

संस्काराचे बाळकडू अगदी आईच्या गर्भात असतांनाच मिळत असते. बाळावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून वडीलधारी मंडळी सतत सुचना देत असतात. पण, आज मुलामुलींनी आधुनिक पोशाख परिधान करून जुन्या विचारांना तिलांजली दिली आहे.

जसे संध्याकाळी दरवाजात बसू नये, पायात आढी घालून बसू नये, मोठ्याने बोलू नये, जेवतांना आवाज करू नये आणि जेवतांना प्रत्येक घास छोटा घ्यावा. असे एक ना अनेक सुचना मिळत असतात. त्याचे कारणही महत्वाचे आहे.

पण, एवढं करूनही आजची पिढी कुठेतरी भरकटत चालली आहे. आपल्या मुलांना योग्य संस्कार मिळावे म्हणून. संस्कार वर्गाची गरज निर्माण झाली आहे. आजच्या आधुनिक युगात मोबाईल शिवाय मुले जेवण नाही, झोपतर येतच नाही. बाळ रडते दे मोबाईल, काम करू देत नाही ,दे मोबाईल. याचा परिणाम मात्र मुलांच्या थेट आयुष्यावर होतो. हे मात्र पालक विसरतात. त्यामुळे कुटुंबाची गरज भासत नाही. संवाद साधायचा तर कोणाशी, प्रत्येक जण आपापल्या कामाला व्यस्त.

संस्कारांचा भक्कम पाया रोवतांना एकत्र कुटुंब खूप महत्त्वाचे असते. आजी आजोबांच्या छत्रछायेखाली तर मुलांचा सर्वांगीण विकास व्हायचा. शिवाय चुकले तर काका काकू, आत्या, मामा, मावशी, अशी अनेक जण असतात. आजचा पालक जागृत झाला आहे. पण, मुलांना अभ्यासाच्या ओझ्याने वेळच मिळत नाही. त्यांची घौडदौड सतत सुरू असते. सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत शाळा. घरी यायला एक तास. घरी येऊन बसत नाही तर लगेच ट्यूशनस असतात. संध्याकाळी काही अवांतर क्लासेस. घरी येईपर्यंत आठ वाजलेले असतात. त्यानंतर टी.व्ही, शाळेचा होमवर्क. मग रात्रीचे जेवण आणि झोप.

शाळेत सर्व विषयांचा अभ्यास होत असूनही वेगवेगळ्या विषयांचे क्लासेस लावणे खरंच गरजेचे आहे का? यामुळे मुलांचा कुटुंबाशी संवाद होत नाही. त्यांना देवासमोर हात जोडून उभे रहायला दोन मिनिटे देखील नाहीत.
मग म्हणतात ,
मना घडवी संस्कार

स्पर्धेच्या युगात संस्काराचे झाड कोलमडले
मुलांना वेळ नाही म्हणून आई वडील थकले

खरोखरच संस्कार काय बाजारात विकत मिळतात. वाटेल तेवढी फी देऊन मुलांना संस्कार वर्गाला पाठवून आजची युवा पिढी वाईट मार्गाला लागली आहे. मित्र मैत्रिणींची वाईट संगत, रात्री उशिरापर्यंत करत असलेल्या पार्ट्या यात आई वडीलांना काहीच गैर वाटत नाही. पण, जर एखादी चुक झाली तर खापर मात्र नशीबावर फोडून मोकळे होतात. अठरा ते वीस वर्षांची मुले खून ,चोऱ्या , बलात्कार अगदी सहजतेने करून छातीठोकपणे फिरत असतात. संस्काराचे मूल्ये रूजवतांना आई वडील कमी पडतात की काय? जिवंतपणीच मरण यातना देतात आजची पिढी.

अरे, ज्या आईने अनंत यातना सोसून तिने तुम्हांला
स्वतः च्या छातीशी लावून दूध पाजले. त्याचप्रमाणे इतरांच्या मुली ,बहिणी तुम्ही खेळण्यासारख्या वापरता रे. छी! थू ! तुमच्या या जिंदगी वर. अरे मुलींच आयुष्य बरबाद करतांना तुमच्या आईच्या छातीकडे एकदा बघा. तिचे संस्कार एवढे कमकुवत का ठरावे? अरे, शिका, खूप मोठे व्हा. अशी फालतुगिरी करायला हा मानव जन्म नाही मिळाला रे तुम्हांला. आयुष्य खूप सुंदर आहे. तेव्हा आनंदाने जगा.

संस्कारांची परिक्षा ही काही कोणत्या विद्यापीठाची नसते. त्यासाठी कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. घरातून बाहेर पडले की शालेय जीवनात नागरिकत्वाचे अनेक धडे गिरवतो. पण तरीही प्रामाणिकपणे, सच्चेपणाने , जर वागलो तरच तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळते. आयुष्य हे असे होकायंत्र आहे की संस्कार आणि भाषेचे ज्ञान, जीवनमूल्ये अवलंबिली तर नक्कीच रस्ता चुकणार नाही.
योग्य दिशेने योग्य पाऊल ठेवले तरच उज्वल भविष्याची गुरुकिल्ली नक्की सापडते.

©® अश्विनी सुहास मिश्रीकोटकर