A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session95e0c9a7221186b77463e80f2dcf0afeb22963222905c8108854c997f007bf877b7c9d83): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Bhavana
Oct 31, 2020
प्रेम

भावना

Read Later
 भावना

भावना:- 

दिपा ला आज खूप वेगळी अनुभूती वाटत होती. खूप हलके, खूप मोकळे आणि शांत. सकाळी लवकर जाग आल्यामुळे मस्त गरम चहा पित ती गॅलरी मध्ये उभी होती. 
गेल्या काही दिवसांमध्ये तीचे आयुष्य पूर्ण बदलून गेले होते. तिचा विश्वास तिला परत मिळाला होता, आयुष्य पुढे नेण्यासाठी काही ठोस कारण तिला मिळाले होते.
 दिपा एका मोठ्या कंपनीत मार्केटींग हेड होती. त्यामुळे सतत फिरतीचा जॉब होता. हर प्रकारच्या लोकांशी संपर्क यायचा. तशी ती फार चोखंदळ होती माणसांच्या बाबतीत, कधी कोणी पटले तर खूप छान गट्टी नाहीतर डायरेक्ट सुट्टी. कामाच्या बाबतीत हयगय नको आणि तशी कडक असल्यामुळे ती खडूस म्हणूनच ओळखली जायची . पण तिला याची कसलीही परवा नसायची , तशी फटकळ म्हणा किंवा फटकून असायची . कोणी आपल्या जवळ यायला नको आणि आपणही कोणाच्या जवळ जायला नको याचे काटेकोर पालन ती करत असे.
दिसायला तशी चांगली होती पण कधी त्याचा उपयोग तिला कुठल्याच अर्थाने करता आला नाही. तिच्या विश्वात कोणालाच जागा नव्हती. कधी भावना काय आणि प्रेम काय याच्या फंदात ती पडली नाही. नाही म्हणायला कॉलेज मध्ये असताना कोणी प्रपोज केले , दिपाने हो पण म्हंटले पण ते पुढे गेले नाही कारण थिल्लर गिरी कधी हिला जमली नाही आणि त्या अपेक्षा असल्यामुळे ती प्रेम कधी करू शकलीं नाही. त्यामुळे कुठेही न गुंतत तिने हा विषयच आयुषयातून मिटवून टाकला. तिच्या ठाम स्वभावामुळे घरचे तिला स्वतः प्रमाणे फिरवू शकले नाही. मुलींसारखे राहण्यापेक्षा नीट नेटके कसे राहता येईल आणि नजरेतल्या कडक पणामुळे दुसऱ्याला कसे अंतरावर ठेवता येईल हेच ती  करायची. 
पण या सगळ्यात, नकळत ती एकलकोंडी झाली होती आणि तापट सुद्धा. तिला कसल्या कोण जाणे पण कायम काहीतरी भीती मनात घर करून असायच्या पण हे कोणाला कळू नये म्हणून तितकीच स्ट्रॉंग असल्याचे ती कायम भासवायची
तर अशी ही दिपा आपले आयुष्य एखाद्या यंत्रवत जगात होती. कामाच्या बाबतीत योग्य असल्याने तिच्या या गोष्टीचा कुठेच कनेक्ट न होता सगळे सुरू होते.
एकदा कामाच्या निमित्ताने दिल्ली ला गेली होती ऐका कॉन्फरन्स साठी. तिच्या कंपनीचे पूर्ण सादरीकरण, त्यांचे प्रॉडक्ट आणि गुणवत्ता दिला दाखवायची होती . त्याप्रमाणे तिने आपली तयारी ठेवली होती. प्रेझेंटेशन, टेस्टीमोनिअल, व्हिडिओस म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या अपेक्षित होत्या त्या सगळ्याच तयार होत्या. बऱ्याच इतर कंपनीचे पण लोक तिथे होते, जणू एकदम टफ कॉम्पिटिशन होती. सगळ्यांचे बुकिंग एअरपोर्ट जवळच्या च्या महिपालपुरच्या पंच तारांकित रेडीसन  हॉटेल मध्ये केले होते. 
पहिल्याच दिवशी एन्ट्री केल्यावर आत जात असताना एका शानदार  लिफ्ट मध्ये ती शिरली आणि लिफ्ट च दार बंद होणार इतक्यात कोणीतरी मध्ये हात घालून लिफ्ट थांबवली. दार उघडल्यावर तिच्याच वयाचा कोणी व्यक्ती आत आला. जरा रागानेच तिने लुक दिला पण त्याने पूर्ण दुर्लक्ष केले. उंचापुरा,  दिआयला ओके असा कोणीतरी तिच्या निदर्शनास आला. फारसे लक्ष न घालता ती तीच्या रूम कडे गेली तर तोही मागेच , तिने जरा तिरके वाकून पाहिले पण तो तिच्या मागे न येता तिच्या थोडं पुढे असलेल्या रूम कडे वळला आणि आत गेला. आपण का मनावर घेतल्यासारखे बघतोय याचा तिला राग आला आणि मनाशी बडबडत ती आपल्या रूम मध्ये गेली.
रूम पाहून खुश झाली. मोठ्या बेड वर पांढरी शुभ्र चादर आणि अप्रतिम स्वच्छता असलेले इंटेरिअर. 
 दुसऱ्या दिवशी सकाळी कॉन्फरन्स असल्याने आतल्या टि-मेकर वर चहा घेत सगळे डिटेल्स परत एकदा चेक केले. सगळे ओके पाहून मस्तपैकी शिट्टी वाजवली आणि स्वतःच खुश होत गाणे गुणगुणत बसली. 
 डिनर टाइम झाल्यावर  खाली गेली. हाय हॅलो करत थोडी जुजबी ओळख होत होती. जेवणाची प्लेट घेऊन वळत होती तर कोणीतरी धडकले आणि थाळीतले थोडे अन्न तिच्या कपड्यांवर सांडले. रागानेच 'स्टुपीड' म्हणत तिने वर बघितले तर तोच तो लिफ्ट वाला व्यक्ती होता.
"सॉरी" इतकेच म्हणत तो काही न झाल्यासारखा निघून पण गेला. त्याच्या जाण्याकडे चरफडत ,वैतागत ती बघत राहिली.
कसेतरी थोडे खाल्ले  पण लक्ष लागत नव्हते. 
तो व्यक्ती तिला सगळ्यांशी मिळून मिसळून , हसत बोलत तिला सारखा दिसत होता . ईच्छा नसतानाही नकळत ती वळून बघत होती त्याचाच तिला  राग ही येत होता.
जेवण आटोपून ती वर रूममध्ये गेली आणि थोडा वेळ TV बघून झोपी गेली.
सकाळी लवकर उठून आवरून रूम लाच ब्रेकफास्ट करत आणि छानसा फॉर्मल ड्रेस चा लुक आरशात बघून  वेळेच्या 15 मिनटे  आधी ती कॉन्फरन्स हॉल जवळ चालत जात होती अचानक मागून कोणीतरी "हाय " म्हणत तिच्या बरोबरीत आले. 
"हाय " अस फॉर्मल उत्तर देत तिने पाहिलं तर पुन्हा तोच कालचा व्यक्ती. 
तिचा तो निर्विकार लुक बघत " मी आशुतोष राणे , आजच्या या कॉन्फरन्स साठी मुंबई हुन आलोय!
 तू?"
त्याच डायरेक्ट तू म्हणत बोलणं जर खटकलं!
 'जान ना पहचान मै तेरा मेहमान' अस काहीतरी मनात चमकून गेलं तरी ताबा ठेवत "मी दिपा सरपोतदार. पुण्याहून आलेय." इतकंच उत्तर तिने दिले आणि हॉल मध्ये प्रवेश केला. 
ती बसली होती त्याच्या अगदी विरुद्द दिशेला तो बसल्याने नाही म्हटलं तरी तिचे लक्ष जात होतं. कॉन्फरन्स सुरु झाली तिच्या कंपनीचे प्रेझेंटेशन साठी नाव घेतल्यावर ती उठली. आधी स्वतःच आणि मग कंपनीबद्दल तीच प्रेझेंटेशन सुरू झाले. छान विश्वासाने तिने PPT दाखवली , त्याप्रमाणे तिने एक्सप्लेनेशन दिले. 
 शेवटी सगळ्यांनी टाळ्या वाजवून तीच कौतुक केलं.
पुढील नंबर त्या आशुतोष चा होता , त्याने पण खूप भारदस्तपणे स्वतःची ओळख करून दिली , त्यात तिला कळले की तो एम्प्लॉयी नसून मालक आहे. थोडे आश्चर्य वाटले आणि कुतूहल सुद्धा. त्याने ही पूर्ण तयारीनिशी छान प्रेसेंटशन दिले. तिलाही खूप कौतुक वाटले आणि सगळ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात ती पण सामील झाली. कुठेतरी जो अडमुठेपणा कालपासून आला होता तो थोडा सैल झाला. लंच ब्रेक होता त्यामुळे सगळे बाहेर पडले.
" दिपा ,छान दिलेस प्रेझेंटेशन तू!  तुझ्या कंपनीची माहिती, उद्देश आणि गुणवत्ता बद्दल सगळेच. अभिनंदन!"
"थँक्स , पण ते कशासाठी? अजून तर एकाचे प्रेझेंटेशन बाकी आहे ना? "
"नाही ग , काहीतरी प्रॉब्लेम आल्याने त्यांनी बॅकआऊट केले आहे. प्रोजेक्ट खुपमोठे आहे आणि लेंदी सुद्धा. त्यामुळे ते करतील असे वाटत नाही"
"ओहह "
"आणि हो कालसाठी सॉरी ,मुद्दाम नाही केलं."
तो बोलताच होता आणि ही ऐकत होती काल इतका पारा चढला आणि आज फक्त " its ok! " म्हणून विषय संपला. 
थोडं बोलत चर्चा करत त्यांना हे कळत होते की दोघांनाही माहिती भरपूर आहे आणि दोघांचा ही कामाचा इंटरेस्ट सारखाच आहे.  ओळख झाली , हसत बोलत लंच झाले. उद्या सकाळच्या फ्लाईट ने ती निघणार होती आणि त्याच फ्लाईट ने तो काही कामाने पुण्याला जाणार होता. 
संध्याकाळी एक इन्फॉर्मल गेट टू गेदर होते.
त्यावेळेस पण यांची भेट झाली नकळत तिला त्याच्याशी बोलण्यात खूप रस वाटत होता. बोलताना तो खूपच वेगळा वाटला तिला. त्याचे दिसणे बोलणे एकदम छाप पाडत होते.
 डिनर सोबत झाले आणि त्याचवेळी उद्या सोबत एअर पोर्ट ला निघण्याचे ठरले.
दोघांनीही या दरम्यान आपले कार्ड एक्सचेंज केल्याने मोबाईल नंबर एकमेकांकडे आले होते. 
सकाळी तिचे आवरणे सुरु होते तर तिला फोन आला " गुड मॉर्निंग दिपा! ब्रेकफास्ट ला येणार आहे का खाली?"
"गुड मॉर्निंग , हो चालेल . 15 मिनिटे दे."
लगेच पटकन आवरून ती खाली गेली तर त्याने टेबल बुक करून ठेवले होते आणि वेटर शी बोलत होता.
" दीपा, या हॉटेल मध्ये तर अफाट च ब्रेकफास्ट आहे. मी फक्त  ऑम्लेट ब्रेड- ग्रिल सँडविच आणि ऑरेंज जूस घेतोय ! तू काय घेणार ?" त्याने विचारले.
"मलाही सेम सांग पण हो सोबत कॉफी." हसत तिने रिप्लाय केले. आपण किती सहज वागतोय या काल ओळख झालेल्या माणसाची याचे तिलाच नवल वाटत होते.
गप्पा सुरु होत्या त्यात कळले की तो MBA आहे आणि गेली 5 वर्षे या व्यवसायात त्याच्या भावाला जॉईन झालाय. लग्न झाले नाही पण त्याच्या वागण्यावरून मैत्रीण नक्की असेल असा तिचा अंदाज होता. स्वतःबद्दल पण MBA करून या कंपनीत 3 वर्षे आणि आधीच्या 3 वर्षे असा 6 वर्षाचा अनुभव असल्याचे तिने सांगितले.
ब्रेकफास्ट झाल्या नंतर फ्लाईट च्या वेळेनुसार सोबत निघून ते  पुण्याला पोहचले. बोर्डिंग पास एकत्र घेतल्यामुळे फ्लाईट मध्ये पण भरपूर गप्पा झाल्या.  या दरम्यान पुन्हा भेटावे अशी ईच्छा नक्कीच दोघांनाही निर्माण झाल्याने जेव्हा जमेल तेव्हा नक्की भेटायचे ठरवून ते आपापल्या मार्गी निघाले.
तिला पहिल्यांदा आपण काहीतरी सोडून निघालोय अशी भावना निर्माण झाली मनाशी नवल करत ती घरी आली. 
आशुतोष चे पुण्यातील ऑफिस बाणेर रोड ला आहे असे तिला कळले होते आणि दुसऱ्या दिवशी तो संध्याकाळी परत जाणार होता. दुसऱ्या दिवशी तिने ऑफिस ला गेल्यावर सगळे नीट रिपोर्टिंग केले आणि केबिन मध्ये असताना तिला इंटरकॉम ला फोन आला की बॉस ने बोलावले. 
तडक ती तिथे गेली तर बॉस ने "congratulations"म्हणत प्रोजेक्ट पार्टनरशीप मध्ये मिळाला आहे असे सांगितले आणि बोलत बोलत ते कॉन्फरन्स हॉल ला आले .
तिथे पाठमोरे कोणीतरी होते .
" दिपा meet Mr. Ashutosh Rane , our Project Partner!"
आशुतोष ला बघून तिच्या चेहऱ्यावर मनापासून स्माईल आले आणि अगदी सहज "हाय आशुतोष, Nice to see you! " ती म्हणाली. 
बॉस ला नवल वाटले " तुम्ही ओळखता का एकमेकांना?" 
"हो सर , दिल्ली ला ओळख झाली आमची." 
" Thats great!  म्हणजे चला , प्रोजेक्ट पुरे होईस्तोवर मी निश्चिन्त असे म्हणत थोड्या फॉर्मल गप्पा झाल्या.
लंच ची वेळ झाली होती ,आशुतोष गेस्ट असल्याने बॉस ती आणि आशुतोष तिघेही 'हयात 'हॉटेल ला गेले आणि यथासांग कामाच्या गप्पात लंच पार पडले.
संध्याकाळी तो निघणार हे माहीत असल्याने तिने थोडे आटोपते घेतले आणि  बॉस ला सांगून त्याला बाहेर सोडायला गेली.
"तर मग Mr आशुतोश congratulations once again! आता काय मग मुंबई वरून काम बघणार का?"
"नाही , मी पुण्याहून बघणार. माझं ऑफिस आहेच आणि आमचा बंगला पण आहेच . मग काय काळजी?" हसत तो म्हणाला. 
दीपा ला आपल्याला नकळत काय आनंद झाला  हे नक्की कळले नाही पण ती खुश होऊन म्हणाली "ग्रेट, मग भेट होईलच आपली!"
"होईल काय ? आपण सोबत काम करणार आहोत हे विसरते आहेस का?"
"अरे हो पण माझं डिपार्टमेंट मार्केटिंग आहे आणि तू ऑपरेशन बघतोस ,त्यात कसे काय आला सोबत काम?"
"ते बघू ,चल मी निघतो आणि हो पर्सनल मध्ये सुद्धा टच मध्ये राहा." खोडकर हसत म्हणाला आणि कार मध्ये बसून निघाला सुद्धा. ती नवलाईने बघत राहिली आणि मनाशीच हसत ऑफिस कडे निघाली.
त्यांचे फोना फोनी सुरू झाले,कधी कामाने कधी बिनकामाचे . हळूहळू छान गट्टी जमत होती. सगळ्यांना कायम लांब ठेवणारी आणि एकटी राहणारी दिपा आजकाल ओपन होत होती आणि एक रेशीम बंध तयार होत होते. रोज बोलणे सुरू होते, दिवसभरात नाही जमले तर रात्री कधीतरी व्हिडिओ कॉल पण होत असे.
आपण बदलतोय हे तिच्या लक्षात आले होते पण तो बदल तिला आवडत होता. भरभरून हसावे मनासारखे करावे असे तिला वाटायला लागले होते.
असेच एकदा सुटीच्या दिवशी ते त्याच्या भोर जवळच्या फार्म हाऊस ला गेले होते छान गप्पा टप्पा झाल्या. बॅडमिंटन खेळणे झाले दमून थकून ती बसली तर त्याने मस्त जूस वगैरे मागवून पाहुणचार केला. 
काय झाले अचानक कळले नाही पण तिला एकदम गरगरल्यासारखे झाले.  त्याने हात पकडला तर तिचे अंग एकदम गरम लागले. तिचे न ऐकता लगेच त्याने डॉक्टर ला बोलावले आणि औषधे मागवली. तिला हे सगळे नवीन होते , आपल्यासाठी कोणी करतंय हेच ती पहिल्यांदा अनुभवत होती.
त्या दिवशी तिथे राहण्याशिवात पर्याय नव्हता.  रात्री छान आराम करून सकाळी तिला लवकर जाग आली. आज खूप फ्रेश वाटत होते. गॅलरी मध्ये येऊन बघते तर आपण स्वप्नात आहोत असेच तिला भासत होते. ते दाट धुके, स्वच्छ हवा, बाजूचे हिरवेगार डोंगर ,देखावे बघून ती हरखून गेली. 
एकदम कॉफी चा सुगंध दरवळला तशी ती वळली तर आशुतोष कॉफी चे दोन मग घेऊन उभा होता.
"गुड मॉर्निंग!"
"गुड गुड गुड आणि हॅपी मॉर्निंग" हसत रिप्लाय देत ती म्हणाली.
तिचा मग घेताना हातातून सटकला आणि पूर्ण त्याच्या अंगावर कॉफी सांडली.
 गिल्टी वाटून " सॉरी सॉरी" म्हणत ती तिच्या रुमालाने  T-shirt पुसायला जात नकळत त्याच्या एकदम जवळ गेली. 
पहिल्यांदा कोणाच्या इतक्या जवळ जाण्याचा आणि त्या स्पर्शाचा अनुभव तिला नवीन होता.
नजर वर केली तर तो ही तिच्या डोळ्यात बघत होता स्थिर नजरेने बघत ती त्यात हरवत गेली आणि नकळत ती त्याच्या मिठीत शिरली. अलगद होणारा त्याचा स्पर्श तिला सुखावत होता आणि ती त्यात विरघळत होती.
हलकेच त्याचा ओठांचा तिच्या ओठांना झालेला स्पर्श तिला शहारून गेला. त्यात हरवत, मिसळत ती आणि तो कधी एकमेकात  विलीन झाले ते त्यांना पण कळले नाही. 
भानावर आले तेव्हा दोघेही एकमेकांच्या मिठीत एका ब्लॅंकेट मध्ये शांत पडून होते.
तिची ती अस्वस्थता जाणून " दिपा, भावना ह्या कोणाच्या बांधील नसतात. त्या ओघाने वाहत असतात आणि आपल्याला त्याची जाणीव ही शरीररूपाने होते. काहीही वाईट झाले नाही आहे, एक व्यक्ती म्हणन तु मला कायम भावलीस. जे घडले त्यात मला काही प्रश्चाताप नाहीय."
आपण हे असे वागू शकतो याचेच तिला नवल वाटत होते पण जे घडले ते खूप नैसर्गिक रित्या सहज घडले होते. आपल्याला ही भावना आहे याचा प्रत्यय तिला आज आले होता.
हे सगळे आठवून आज गॅलरी मध्ये चहा पित उभी असलेल्या दीपा च्या चेहऱ्यावर हलकेच हसू उमटले.  फोन वाजल्याने ती भानावर आली " हॅलो....बोल आशुतोष. आला आहेस का पुण्यात?"
"हो,  तयार राहा मी तुला पिक करतोय बरोबर 30 मिनिटां मध्ये मी येतोय."
आपल्याच नादात तिने आवरायला घेतले, कधी नवे ते तिने आज छान गुलाबी रंगाची साडी नेसली त्यावर मोत्याचा सर आणि लांब कानातले घातले.  छानसे मोत्याचे ब्रेसलेट आणि गुलाबी लिपस्टिक लावून ती खाली आली.
तिचे ते रूप बघून कार मध्ये असलेला आशुतोष बघतच राहिला. त्याच्या बघण्याने तिचे गाल लाल झाले आणि हलकेच कारचे दार उघडून ती त्याच्या बाजूला येऊन बसली.काहीही न बोलता फक्त एक मोहक लूक देऊन त्याने कार स्टार्ट केली आणि थोड्याच वेळात ते  हॉटेल J W Marriott समोर येईन थांबले. 
त्याने आधीच ठरवल्याप्रमाणे त्यांचे टेबल बुक होते. आज काहीतरी वेगळे तिला भासत होते. आजूबाजूचे सगळे छान वातावरण खूप मोहक भासत होते. 
" दिपा, कायम आयुष्यभर तुझी सोबत देशील का?" अचानक प्रश्नांने ती बावरली.
काही क्षण शांत गेले हलकेच हसत, लाजत  " हो" इतकेच ती बोलू शकली.
कायम धडाडीने बोलणारी ती आज निशब्द झाली होती, खूप बोलावेसे वाटत होते पण तिला शब्द सुचत नव्हते. ती शांतता खूप काही बोलत होती आणि मनातल्या सगळ्या भावना तिच्या  चेहऱ्यावर तरंगत होत्या. 
आपल्या या नवीन रूपाच्या आणि भावी आयुष्यात येणाऱ्या सुखाच्या विचारात असताना आशुतोष ने तिच्या हातावर अलगद हात ठेवला. 
त्या स्पर्शाने मोहरून आणि त्याच्या अस्तित्वाने आनंदून तिने फक्त "आशू" एवढंच म्हणले.
आज तिच्यासाठी असलेली जगातील सर्वश्रेष्ठ "भावना" तिच्या मनात, चेहऱ्यावर आणि बोलण्यात ती अनुभवत होती!
©®अमित मेढेकर

Circle Image

Amit Medhekar

Professional

I have completed my MS in psychotherapy and counseling and work mainly in REBT and CBT. I basically work on people's mind. Simple Living and High thinking is my motto!