भाव तिथंदेव

"आई तुझी अन्नपूर्णा, गोपाळकृष्ण, शंकराची पिंडी, घंटा, गंगा, कितीतरी देव होते न बाबा साग्रसंगीत पूजा करायचे ते कुठे आहे? बाबा गेले तशी सर्व काढून टाकले"?------------------------------------------
भाव तिथं देव
"आई मी निघते,मला कदाचित यायला उशीर होऊ शकतो डिलेव्हरी च्या दोन केस आहेत ."
ताईंच्या आवडीची भाजी कमला ला करायला सांगितली आहे आणि हो, ताईंना घ्यायला स्टेशनवर ड्रायव्हर ला जायला सांगितले आहे तो गाडी घेऊन जाईल".

कुसुम ताई हसून मान डोलवत म्हणाल्या हो-- हो तू काळजी नको करू! आसावरी राहणार आहे चार दिवस आणि, मी आहेच घरात.
पण--\" तू कशी जाशील\"??
मी --हॉस्पिटलची व्हॅन बोलावली आहे .
असावरी घरी पोचली तेव्हा कुसुम ताईंनी भाकर तुकडा ओवाळून तिच स्वागत केले.

जेवता जेवता कुसुमताईंनी तिच्या घरच्या माणसांची विचारपूस केली. जेवण होईस्तोवर मुलंही आली .
शुभ्रा व रोहन, रोहन कॉलेजला तर शुभ्रा बारावीत.
शुभ्रा ने आसावरी च्या पाया पडून नमस्कार केला व आत्या म्हणत गळ्यात पडली.
जेवण होताच मुलं त्यांच्या कोचींग ला गेली. तोपर्यंत आसावरी व कुसुमताई दुपारच्या जरा झोपल्या.

संध्याकाळी देवापाशी दिवा लावायला कुसुमताई उठल्या. आसावरी ने विचारले "आई देव्हारा कुठे आहे? देव दिसत नाही"
\" हे काय आहे \"
आसावरी ने पाहिलं कुलदेवतेचा एक मोठा फोटो लावलेला होता त्यावर ताज्या फुलांचा हार घातलेला.
कुसुम ताईंनी डोळे मिटून शुभंकरोती म्हणत दिवा लावला.

आसावरीआईच्या तोंडाकडे पहातच होती.
"आई तुझी अन्नपूर्णा, गोपाळकृष्ण, शंकराची पिंडी, घंटा, गंगा, कितीतरी देव होते न बाबा साग्रसंगीत पूजा करायचे ते कुठे आहे? बाबा गेले तशी सर्व काढून टाकले"?
काय हे--- आणि तू करून दिलेस वहिनीला??
अगं-- शांत हो किती चिडतेस ही आहे ना महालक्ष्मी आपली कुलदेवता बघ ना .
फक्त फोटो??
"काय आहे आसावरी, तुझे बाबा जेव्हा धडधाकट होते तेव्हा ते करत असत पूजा-अर्चा सगळं व्यवस्थित पण-- मग त्यांना लकवा झाला आणि ते बेडरिडन झाले. पुढे ते गेलेच.
मग मी करत असे पूजा पण वयापरत्वे मला खाली बसणे शक्य नाही आणि उभ ही राहवत नाही तेव्हा---
\"मग काय झालं? बाकी --वहिनी दादा वगैरे तर आहे ना\"??
विद्या डॉक्टर, स्त्री रोग विशेषज्ञ किती तरी केसेस असतात, कधीकधी तर जेवण ही धडपणे होत नाही तिचे,आणि दादा तुझा त्याच्या तर चक्री आहे पायाला.
"म्हणून काय-- देव काढून टाकायचे"?
"विद्या ने नाही हो काढले देव ती तर म्हणाली होती आपण ब्राह्मण बोलावून घेऊ रोज देवपूजेसाठी."
मग-- "कुठे माशी शिंकली खवचटपणे आसावरी बोलली"
"आशु अगं पुजार्याकडून पूजा करायची त्यात कसला ग भक्तिभाव ते केवळ कर्मकांड, मग मीच म्हटलं विद्याला आपल्याला झेपेल असं नेटकं देवघर करूया म्हणून हा कुलदेवतेचा फोटो लावला.
अगं पूर्वी मोठ्या घरी देव होते पण मग भाऊजी वहिनी गेल्यावर त्यांच्या मुलांनी इकडे पाठवले त्यांना ते कुळाचार वगैरे करणे जड वाटत होते. आजकाल सुना ही नौकरी करतात.
हो बरोबर ,आमच्या हि कडे असेच होते ग ,असावरी जरा नरमाइने म्हणाली" कधीकधी दोघी जावा येतात मदतीला पण कधी त्यांच्या अडचणी येतात मग सर्व मलाच करावे लागते. थकून जाते पण काय करणार.??
आशु, देव माणसां करता आहे माणसं देवा करता नाही. मी म्हणते तुला जे सहजपणे जमेल तेवढेच कर. त्रागा आणि त्रास करून देवधर्म करण्यात काय अर्थ आहे?
तूच विचार कर ",
अग विद्या डॉक्टर आहे कितीतरी डिलिव्हरीच्या क्रिटिकल केसेस ती पार पडते तिचा देवावर खूप विश्वास आहे. तू एकदा तिच्या दवाखान्यात जाऊन तर पहा तिच्या रूम मध्ये असाच फोटो आहे प्रत्येक केसआधी कुलदेवतेचे स्मरण करून केस हॅण्डल करते ,आणि विद्या जे कार्य करते तीहि एक पूजाच आहे अर्थात आज तुला हे एकदम पटणार नाही.
संध्याकाळी विद्या आणि विश्वास त्यांचा मुलगा दोघं घरी आले.. :
" उद्या मला ऑफ आहे, आई आपण सर्व आउटींग ला जाऊया ताईंना घेऊन, इथे जवळच एक जागृत देवस्थान आहे तेही ताईंना दाखवू या. विद्या म्हणाली.
दिवसभर खूप फिरून जेवून संध्याकाळी सर्व घरी पोहोचले तेव्हा विद्याच्या मोबाईल वर एक मॅसेज "एक क्रिटिकल केस आली आहे लवकर पोहोचावे"
ताई-- मला जावे लागेल, विद्याने निघता निघता हॉस्पिटलमध्ये सिस्टरला तयारी करायला सांगितले, देवघरात जाऊन दिवा लावला नमस्कार करून ती निघाली.
पाहिलेस ना आसावरी "अगं गरजू लोकांची सेवा करणे ही पण एक देव पूजाच आहे, पेशंट करता तर डॉक्टर देवासमान असतो ना? मग हे सेवा व्रत करणारी आपली विद्या, ही तिची देवपूजा च आहे.

दुसरे दिवशी आसावरी आपल्या घरी जायची म्हणून विद्याने सुट्टी घेतली होती.
सकाळी सकाळी एक गाडी दारात आली त्यात एक वयस्कर स्त्री पेढ्यांचा पुडा व साडी घेऊन आली.
डॉक्टर साहिबा आहेत कां?
कोण तुम्ही?
" अहो काल माझ्या सुनेचा आणि नातिचा जीव वाचला डॉक्टरीण बाईंनी.
डॉक्टर तुम्ही देवासमान आहात आमच्यासाठी.
अहो ते तर माझं कर्तव्य होतं. आणि तुमच्या सुनेवर आणि नाती वर मातेचीच कृपा होती.
आसावरी सर्व पहात ऐकत होती तिच्या मनात साचलेल सर्व किल्मिश दूर झाले.
निघताना आसावरी ने विद्या ला मिठी मारत म्हटले
" जिथे भाव तिथे देव आहे ,तू तुझ्या कर्तव्यात देव पाहते आणि मनापासून कर्म करते म्हणूनच तुझ्यावर जग्नमातेची कृपा आहे. विद्या मला तुझा अभिमान आहे."
------------------------------------------