भातुकली (भाग पाचवा)

Classes in families

भातुकली (भाग पाचवा)

चौथ्या भागात आशू मिनाला तिची कर्मकहाणी सांगत होती..

तिथे प्रोफेसर आहुजा..लय चिकना होता. सहा फुट उंची, पॉश राहणीमान,भेदक डोळे. मनातच भरला माझ्या. त्याचे सगळे लेक्चर्स अटेण्ड करायचे. 

त्याच्यावर इंम्प्रेशन मारण्यासाठी जास्तीत जास्त मार्क्स कमवायचे. टीवायला त्याच्या क्लासची टॉपर होते. एमकॉमच्या दोन्ही वर्षांनाही. त्याला पेढे द्यायला गेले. 

सर आता आपली भेट कधी होणार म्हणताच त्याने जवळ ओढलं मला. बाईकवर मागे बसवून लॉजवर घेऊन गेला. माझे स्तन दाबले फुकणीच्याने.

 मला विवस्त्र करुन मेटींग केलं. मीही त्याला तितक्याच त्वेषाने प्रतिसाद देत होते कारण..कारण मला तो हवा होता. माहित होतं मला तो मेरिड होता. दोन पोरांचा बाप तरीही..मी वहावत गेले. 

त्याने मला प्रॉमिस केलं माझ्याशी लग्न करेल म्हणून. सहा महिने मला उपभोगत राहिला..हवं तेव्हा..हवं तसं. आणि व्हायचं तेचं झालं. 

माझ्या उदरात नवा अंकुर फुलला. किती खूष झाले होते मी! धावतपळत गेले त्याच्या केबिनमधे. त्याच्या कानाजवळ जाऊन ही बातमी सांगितली. 

मला वाटलं प्रेमाने जवळ घेईल तो मला. लग्नाची तारीख ठरवेल पण कसंच काय मला बाजूला रेटलं त्याने आणि म्हणाला एका प्रतिथयश क्लासेसचा मालक आहे मी. 

मी म्हंटलं,'काय बोलताय सरं तुम्ही. तुम्हीच तर मला स्वप्नं दाखवलीत. वेगळा संसार थाटू म्हणालात. ते घटस्फोटाचे कागद दाखवलात.' तो भ** छद्मीपणे हसत म्हणाला,'मी म्हणालो आणि तुला खरं वाटलं. अशा कितीतरी कन्यका चाखल्यात मी. सगळ्यांनाच मंगळसूत्र घालत बसलो तर..हा हा हा.'  

मी समोरचा पेपरवेट त्याच्या डोक्यात फेकून मारला. आणि घरी आले. 

घरी मम्मीपप्पांना सारं सांगितलं. पप्पांनी जबरदस्ती माझं एबोर्शन करुन घेतलं. ते करताना माझ्या गर्भाशयालाही दुखापत झाली. गर्भाशय काढून टाकावं लागलं कायमचं.

 प्रकरण दाबून टाकण्यासाठी पपांनी त्या आहुज्याकडून बराच माल घेतला. अर्थात माझा सौदा झाला. माझ्या मात्रुत्वाचा सौदा झाला.' 

पप्पांनी हा ब्लॉक घेऊन दिलाय. त्यात रहातेय. त्या दोघांच तोंड नाही बघत. माझं मी कमावते मला वाटेल त्या मार्गाने. माझ्या सर्व भुका मी पैसे मोजून भागवते पण कुटुंब मिळालं नाही गं मला. 

ते तुला मिळालय यार मिनू. तुझ्याकडे सारं असून तू दु:खी आहेस.' आशूने मीनूकडे पाहिलं. मीनू केव्हाची झोपून गेली होती. आशूचं बोलणं हवेतच विरलं होतं.

संध्याकाळी पाचेक वाजता मीना उठली. आशूने तिच्यासाठी फ्राईड राईस व गुलाबजाम मागवले होते. दोघींनी मिळून लेट लंच घेतलं. 

'यार आशू कधी डोळा लागला कळलंच नाही बघ. खूप बरं वाटतय. मोकळं मोकळं. चल निघते मी आता. हो आणि तू तुझ्याबद्दल काहीतरी बोलत होतीस नं.'

'विशेष नाही गं. नेहमीचच. ते राहूदे. जमल्यास तुझा संसार जप. नशीबवान आहेस तू.'

इकडे जाई,यश,चैत्राली व पराग यांनी पिझ्झापार्टी केली. जाई यशला घेऊन टेरेसमधे भातुकली खेळण्यात मग्न होती. तितक्यात परागला मयंकचा फोन आला. 

'क्या सालेजी कैसे हो?'

'मी..मी मस्त. जिजू तुम्ही..'

'का जखमेवर मीठ चोळतोयस! ती मीनू डोक्यात राग घालून गेलेय. वेगळा संसार थाटूया म्हणतेय. या वयात आईबाबांना सेपरेट  ठेवायचं मला शक्य नाही आणि मीनूही हवी आहे रे मला.' 

'जिजू, जस्ट रिलेक्स. डोण्ट टेक टेंशन. मी बघतो काय ते. थांबा जाईला फोन देतो.'

'हेलो बाबा, अरे मी तुझ्या आवडीचा मसालेभात बनवलाय खोटूखोटूचा आणि पन्हंपण बनवलंय थंडगार. सगळ्यांना दिलं पण तुला द्यायचं राहिलं बघ. 

आजोबांना पण खूप आवडतं रे माझं खोटूखोटूचं पन्हं. कसले मिचक्या मारत पितात! आय मिस यु ऑल. लव्ह यू बाबा.'

मग जाई आजीआजोबांशीही बराच वेळ बोलली. आजोबांनी व्हिडीओ कॉलवर जाई व यशला बकासुराची गोष्ट सांगितली. 

भीम बकासुराचा वध कसा करतो ते अगदी अभिनय करुन दाखवलं. आजी आजोबांचा अवतार पाहून हसत होती.

(क्रमश:)

सौ.गीता गजानन गरुड.

🎭 Series Post

View all