May 15, 2021
कथामालिका

भातुकली (भाग तिसरा)

Read Later
भातुकली (भाग तिसरा)

भातुकली (भाग तिसरा)

परागने दाराची कडी लावली. चैत्राली काही बोलायच्या आत परागने तिला जवळ ओढले. 

तिच्या नाजूक ओठांवर परागने त्याचे ओठ टेकवले.

 चैत्राली काही बोलायच्या आत परागने तिला पुरते जायबंदी केले व उचलून बेडवर ठेवले.

 चैतू काही बोलू पहात होती पण त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवले व तिच्या गहिऱ्या डोळ्यांत बघू लागला. 

चैत्रालीच्या कपाळाचं त्याने चुंबन घेतलं. तिच्या गालावर आलेले रेशमी केस बाजूला सारले तशी चैत्राली शहारली.

 परागने तिच्या आखीवरेखीव पापण्यांवर त्याचे ओठ टेकवले व हळूहळू खाली येत तिच्या गोऱ्यापान देहाला त्याने आपल्या चुंबनांनी चेतवले. 

चैत्रालीही सुखाच्या रथावर स्वार झाली. दोघांनी परस्परांना पुरेपूर प्रणयसुख दिलं. दोन जीव एक झाले होते.

 प्रीतीचा आवेग सरल्यावर चैत्राली परागच्या कुशीत विसावली.

 त्याच्या वक्षस्थळावरच्या वलयाकार केसांत आपली नाजूक बोटं फिरवत होती. दोघंही एकमेकांशी लाडीक बोलत हसत होते. 

मीनाचं आज कसं डोकं दुखतं होतं. ती गोळी घेण्यासाठी उठली. हातात गोळी घेऊन ती किचनमधे आली.

 तिने जगातलं पाणी फुलपात्रात ओतून घेतलं तेव्हा तिला चैत्राली व परागच्या लाडीक खिदळण्याचा आवाज ऐकू आला. क्षणभर तिचे पाय तिथेच थबकले.

पराग म्हणत होता,'चैत्राली,तू मला पुरेपूर सुख देतेस. आय लव्ह यू चैतू.'

'आय टू लव्ह यू पराग' आणि मग त्यांचे दीर्घ चुंबन. चैत्रालीच्या पायातील नुपुरांचा आवाज सोबत तिच्या बांगड्यांची हलकीसी किणकिण. मीना नखशिखांत शहारली.

मीना झटकन हॉलमधे आली. तिने गोळी घेतली व गादीवर निजली पण तिचा डोळा लागेना. 

तिला मयंकची तीव्रतेने आठवण आली. किती दिवस झाले त्यांनी असा संग केला नव्हता. तिचं शरीर आता पेटून उठलं. तिने कडेला निजलेल्या जाईला कुशीत घेतलं व डोळे टक्क उघडे ठेवून दिव्याच्या मंद प्रकाशाकडे पहात राहिली. डोळ्यात जमा झालेल्या अश्रुंनी काजळरेषा ओलांडली व ते वाहू लागले. 

इतक्यात जाईला जोराची सूसू लागली. ती डोळे चोळत उठली व तिने आईकडे पाहिलं. आई डोळे पुसत होती.

 जाई शू करुन आली व परत झोपली.

 पहाटे उठून सरलाताई मॉर्निंग वॉकला गेल्या. त्यांच्यापाठोपाठ चैत्राली उठली व बाथरुमधे गेली. तितक्यात परागही बाथरुममधे तिच्या पाठोपाठ गेला. तिने डोळे वटारले. 

'अहो ताई आहेत नं घरात!'

'असुदेत गं. कितीतरी दिवस आपण एकत्र शॉवर घेतला नाही. आई यायला तासभर लागेल. 

आज रविवार असल्याने मीना व जाई इतक्यात उठायचे नाहीत. संधीचं सोनं करुया जानी', असं म्हणत त्याने शॉवर सुरु केला. 

दोघंही चिंब भिजली. चैत्रालीच्या भिजल्या ओठांच त्याने दीर्घ चुंबन घेतलं. 

तिला आपल्या पीळदार बाहुंत लपेटून पाण्याच्या रेशीमधारा झेलू लागला.

 बऱ्याच वेळाने त्याने तिला नेक्स्ट संडे फिरसे म्हणत सोडलं व टॉवेल गुंडाळून बाहेर आला.

 मीना रात्री जागी असल्याने गाढ झोपली होती. 

जाई उठली. इकडेतिकडे कोण नाहीसे बघून ती मामाच्या बेडरुममधे गेली व यशला बिलगून परत झोपली.

 चैत्रालीने शिकेकाईने केस धुतले व डोक्याला टॉवेल गुंडाळून बाहेर आली. मग तिने घर आवरलं. केर काढला व देवपूजा केली. तितक्यात मीना उठली. 

चेत्रालीने पटापट इडली चटणी सांबार बनवले. मीना तोवर न्हायला गेली. 

आज शॉवर घेताना तिला रात्रीच्या चैतू व परागच्या संवादाची आठवण झाली व मयंकची मोरपिसी बोटं तिच्या ओलेत्या देहावरुन फिरताहेत असा तिला भास झाला.

(क्रमश:)

-----सौ.गीता गजानन गरुड.