भास मनी पेरतो..

गंध...

गंध पारिजातकाचा

मनात हळूच दरवळतो.. 

तू कायम सोबत असल्याचा

भास मनी पेरतो.. 


गंध मातीचा 

तो चहूकडे पसरतो.. 

तुझ्या माझ्या पाऊलखुणा जुळल्याचा

भास मनी पेरतो.. 


गंध पाऊलवाटेचा

अलगद मनात डोकावतो.. 

नियतीचा निर्णय माझ्यावतीने असल्याचा 

भास मनी पेरतो.. 


गंध प्रारब्धाचा 

मनास दस्तक देतो.. 

तूच माझे विधिलिखित असल्याचा

भास मनी पेरतो.. 


गंध सौंदर्याचा

मन खिन्न करतो.. 

सौंदर्य हे वरदान असल्याचा

भास मनी पेरतो.. 


गंध आठवणींचा 

डोळ्यात आशा जागवितो.. 

हा विरह दूर सरण्याचा

भास मनी पेरतो.. 


गंध स्वप्नांचा 

तुझ्याच अवतीभवती स्थिरावतो.. 

एकदिवस आपले मिलन होण्याचा 

भास मनी पेरतो.. 


गंध तुझा 

आजही सभोवती जाणवतो.. 

कधीतरी होशील तू माझा

भास मनी पेरतो.. 


©®

सेजल पुंजे (श्रावणी)