भास -आभास.. भाग -4

प्रिया सोनिया ची मदत घ्यायचं ठरवते.

भाग -4


प्रिया कार्तिक ची माहित कुठे मिळते का हे पाहते. ति त्याचा ऍड्रेस काढायचा प्रयत्न करते. म्हणुन ति त्याचा फेसबुक प्रोफाइल पुन्हा चेक करते. निदान काही तरी सापडेल. त्याचे अनेक फोटो ति बारकाईने पाहते. पण तिला त्यात काही सापडत नाही. ति सोनिया ची मदत घ्यायचं ठरवते. सोनिया ह्या सगळ्यात माहीर असते. ति सोनिया ला कॉल लावते.

सोनिया " हाय अगं आता कसा कॉल केलास ! सगळं ठिक आहे ना ? " सोनिया फोन वर बोलते.

प्रिया " नाही गं काहीच ठिक नाही !"

सोनिया ला प्रिया च्या आवाजात भीती जाणवत होती.

सोनिया " काय झालं? तोह भेटलेला का ?"

प्रिया " अगं हो भेटलेला, मी त्याला च भेटून आली आहे. "

सोनिया " काय बोलला? "

प्रिया " अगं त्याला सगळं काही माहित आहे!"

सोनिया " सगळं माहित आहे, म्हणजे? मला कळेल अस बोल !"

प्रिया " माझ्या नि आई च्या मध्ये जे बोलणं झालं लग्नाबद्दल च त्याला ते कस कळलं हेच कळत नाही आहे मला !"

सोनिया " अगं वेडी तूच सांगितलं असशील बोलता बोलता. तस ही तु त्याच्या शी बोलतेच ना ? "

प्रिया " बोलते पण हे थोडी सांगितलं मी !" आणि प्रिया रडु लागते.

सोनिया " प्लीज रडु नकोस, आता पुढे काय करायचं आहे ? " सोनिया प्रिया ला धीर देत म्हणते.

प्रिया " आपण त्याची माहिती काढूया का ? कारण ज्या व्यक्तीला मी पहिलाच नाही कधी त्या व्यक्तीला माझ्या बद्दल इतकं कस माहित ? "

सोनिया " ह्म्म्म तेही खरं आहे . आपण भेटू नि काय नि कस करायचं ते पाहू!" सोनिया तिला समजावत म्हणते.

प्रिया " ओके, उद्या भेटू आपण ! चल मी ठेवते. "

अस बोलुन प्रिया कॉल ठेवते.

काही वेळा नंतर प्रिया ला कार्तिक चा मॅसेज येतो.

कार्तिक " काय मॅडम झालं का बोलणं ? " कार्तिक चा मॅसेज.

प्रिया कार्तिक चा मॅसेज पाहुन घाबरते.

प्रिया " ह्याला कस माहित मी सोनिया शी बोलत होती ते !" प्रिया स्वतःशी बोलते.

प्रिया " तुला कस माहित ? " प्रिया चा मॅसेज.

कार्तिक " अरे म्हणजे घरी गेल्यावर तुज्या मैत्रीण चा किंवा आई चा कॉल असेल म्हणुन सहज विचारले !" कार्तिक चा मॅसेज.

प्रिया त्याला रिप्लाय करत नाही. कार्तिक चा फोन ही येतो पण ति त्याला उत्तर देत नाही.

सकाळ होते. सोनिया प्रियाच्या घरा जवळ येते. प्रिया सोनिया ला भेटते. ते एका जवळच्या कॉफी शॉप मध्ये बसतात.

सोनिया प्रिया साठी एक स्पेशल कॉफी मागवते.

सोनिया " प्रिया मॅडम घ्या कॉफी ! आणि सांगा आता नक्की करायचं काय ? " प्रिया ला कॉफी ऑफर करत सोनिया म्हणते.

प्रिया " आपण त्याचा ऍड्रेस कसा शोधून काढायचा सोनिया? "

सोनिया " ह्म्म्म,,, तेही आहेच ! बरं त्याच्या फेसबुक अकाउंट ला काही सापडलं का तुला ? "

प्रिया " नाही गं!!!" प्रिया हताश होऊन बोलते.

सोनिया " ह्म्म्म,,, त्याच ऑफिस कुठे आहे माहित आहे का तुला ? तर आपण त्याच्या ऑफिस ला जाऊन पाहू !".

प्रिया " ओह्ह्ह शी यार...! " प्रिया वैतागून बोलते.

सोनिया " काय झालं ? "

प्रिया " अगं मी त्याच ऑफिस ऍड्रेस कधी विचारला नाही !"

सोनिया " अरे देवा ,,, महान आहेस तु ! इतके महिने बोलते नि तु ऍड्रेस साधा विचारला नाही ? " नि सोनिया डोक्याला हात लावते.

प्रिया " आता ??? " प्रिया ला काहीच सुचत नसत.

सोनिया " आता काय ? डोक्याला शॉर्ट द्यायची काम कर तु..? "

सोनिया जरा शांत बसते. काय करायचा पुढे हा विचार करते. तिला समजत नसत कि आता पुढे काय करायचं ते.

प्रिया " तरी तोह मला भेटायला ये बोलत होता ? "

सोनिया " काय ? मग तु काय म्हणालीस ? "

प्रिया " मी त्याला नाही सांगितलं, अस कस भेटणार ? "

सोनिया " बरोबर,, जे हवं माहित असायला ते विचारलस

नाही ? आणि... " सोनिया तिच्या वर वैतागते.

प्रिया " यार तु अस वैतागून नकोस... मला खुप भीती वाटतेय.. आणि तु अस रागवतेस..!" प्रिया रडक्या स्वरात बोलते.

सोनिया " एक काम कर तु त्याला कॉल कर नि सांग तुला मला भेटायचंय ना मग आपण तुझ्या ऑफिस जवळ भेटू.!"

प्रिया " ओह्ह्ह,,, हा गं हे तर माझ्या लक्षातच आला नाही.!" प्रिया निदान एक मार्ग मिळाला म्हणुन खुश होते.

प्रिया कार्तिक ला कॉल लावते. पण कार्तिक चा कॉल लागत नसतो. प्रिया पुन्हा कॉल लावते पण त्याचा कॉल लागतंच नाही.

प्रिया " शी यार ! " वैतागत स्वतःशी बोलते.

सोनिया " काय झालं ? वैतागतेस का? "

प्रिया " त्याचा कॉल लागत नाही आहे ? "

सोनिया " ओके ना ! कदाचित नेटवर्क नसेल , तु त्याला मॅसेज टाक भेटूया का आपण ? आणि जर त्याचा रिप्लाय आला तर ऑफिस जवळ येते सांग! "

प्रिया " ओके ! थँक्स यार सोनिया !"



.......

क्रमश....




















🎭 Series Post

View all