भास - आभास.. भाग -१

कार्तिक प्रियाच्या घरी जातो. प्रिया कार्तिक ला पहिल्यांदा पाहत असते.

भाग - १


(ही कथा आहे प्रिया आणि कार्तिक ची. त्यांच्या नात्याची.थरारक आणि प्रेम ..)



सकाळी सकाळी दारावरची बेल वाजते. कोण आलय इतक्या लवकर. प्रिया वैतागत घड्याळाकडे बघते. हे काय आताशी सात वाजले. कोण आलय कडमडायला देव जानो. ति जाऊन घाई घाई ने दरवाजा खोलते. हे काय दारावर कोणीच नाही. ति बाहेर येऊन आजू बाजुला पाहते. अरेच्या बेल वाजवून असे गायब होतात. सकाळी सकाळी मस्करी करायला हाच टाइम मिळाला का.

अस बोलुन प्रिया पाठी वळते.

"प्रिया " प्रिया गच कण पाठी वळते.

प्रिया " आपण कोण ? आणि दारावरची बेल आपण वाजवली का ? " दारावर उभा असलेला रंगाने गोरा आणि यंग, हँडसम, डॅशिंग वयाने तिशी असलेल्या एका मुला बोलते.

" मी कार्तिक, ओळखलं कि नाही ? " कार्तिक बोलतो.

प्रिया नाव ऐकुन गोंधळते.

प्रिया " नाही ! मी ह्या आधी तुम्हाला कधी पाहिलं नाही ? "

कार्तिक " बरोबर,,, आपण भेटून अनेक वर्ष झाली !"

प्रिया " अनेक वर्ष? मी समजली नाही !" कार्तिक च बोलणं ऐकुन तिचा गोंधळ उडालेला असतो.

कार्तिक " मी भेटायला आलोय तुला, मी तुला फेसबुक ला फ्रेंड्स रिक्वेस्ट ही पाठवली होती. पण तु ति ऍक्सेप्ट केली नाही.!"

प्रिया " मी पहिली नाही. पण तुम्हाला माझ्या घरचा पत्ता कसा भेटला.? "

कार्तिक " ते आता महत्वाचं नाही आहे ! " आणि हसतो.

प्रिया " बरं बरं ठीक आहे. मी आता जरा घाईत आहे आपण बोलु नंतर कधी तरी !"

कार्तिक " ठीक आहे, मी वाट पाहीन.!"

अस बोलुन कार्तिक तिथुन निघुन जातो. प्रिया दार लावते, ति विचारात असते. कि नक्की कार्तिक कोण आणि तोह इतकी वर्ष मला ओळखतोय.

ति आत रूम मध्ये जाते.लॅपटॉप वर फेसबुक ओपन करते. आणि आलेल्या फ्रेंड्स रिक्वेस्ट ति पाहते. त्यात कार्तिक इनामदार अशा नावाने रिक्वेस्ट आलेली असते. ति त्याच पुर्ण प्रोफाइल पाहते. त्याचे फोटोस पाहते.

" हा रे बरोबर बोलला तोह !" स्वतःशी बोलते.

ति फसबुक पाहुन लॅपटॉप बंद करते. तिने लावलेला आठ चा अलार्म वाजतो. ति दचकते.

" इतकं दचकायला काय झालं, वेडी.. साधा अलार्म वाजला तोही मी लावलेला!!" स्वतःशी बोलुन ति अलार्म बंद करते.

ति ऑफिस ला जायच्या तयारी ला लागते. तितक्यात तिच्या आईचा कॉल येतो.

आई " अंग आज लेट झाला का उठायला , अजुन निघाली नाही ति ? "

प्रिया " नाही गं लवकरच उठले, पण ते... " आणि तिची नजर घड्याळातल्या काट्यावर जाते.

प्रिया " चल आई मी ठेवते आधीच खुप उशीर झालंय.. चल.. चल... बाय.. बाय...!"

आई " अगं प्रिया ऐक तरी...!"

आणि प्रिया कॉल ठेऊन रूम चा दरवाजा लावुन निघते.

प्रिया ही मुंबई मध्ये एकटी राहत असते. तिला ऑफिस मधुन राहण्यासाठी रूम दिलेला असतो. तिचे आई वडील मुंबई पासून दूर एका गावात राहत असतात. ति तिच्या आई वडिलांन ची एकुलती एक मुलगी असते.

प्रिया " ऑटो... ऑटो... शी आज एक ही रिक्षा थांबायला तयार नाही. " प्रिया खुप वैतागलेली असते.

तितक्यात प्रिया समोर फोर व्हीलर येऊन थांबते.

कार्तिक " हाय प्रिया... हे काय कोणची वाट पाहत आहेस का ? " कार्तिक प्रियाला बोलतो.

प्रिया कार्तिक ला पाहुन दचकते.

प्रिया " नाही.. ऑटो ची वाट पाहतेय. ऑफिस ला जायचंय..!" मनगटावरच्या घड्याळाकडे पाहत.

कार्तिक " बरं मी सोडू का ? "

प्रिया " नो थँक्स,,, मी जाईन!"

कार्तिक " डोन्ट वरी, मी सोडतो. आधीच लेट झालंय ना तुला !"

प्रिया थोडा विचार करते आणि कार्तिक च्या गाडीत बसते.

कार्तिक " तुझं ऑफिस आहे कुठे ? "

प्रिया " इथून उजव्या बाजूने गेलं कि सरळ जाऊन डाव्या बाजुला वळायच !"

कार्तिक " ओके "

प्रिया समोरून दिसणाऱ्या काचे मधुन कार्तिक ला पाहत होती. त्या चा चेहरा प्रिया ला खुप फ्रेश आणि तेजस्वी दिसत होता. एक वेगळीच चमक त्याच्या चेहऱ्यावर होती.

प्रिया " बस,,, बस,,, आलं माझं ऑफिस !"

कार्तिक " ओके सो सुटणार कितीला तु ? "

प्रिया " सात वाजता.. का? "

कार्तिक " नाही गं सहज विचारल !"

प्रिया " ओके लिफ्ट दिल्या बद्दल थँक्स ! " गाडीतून उतरत प्रिया बोलते.

कार्तिक गाडी घेऊन तिथुन निघुन जातो. प्रिया ऑफिस ची पायरी चढून वर जाते.

प्रिया दिवस भर कार्तिक चा विचार करत असते. नक्की हा आहे कोण आलय कुठून. आणि मुद्दा म्हणजे अनेक वर्ष तोह मला ओळखतोय.

ज्या व्यक्तीला मी पाहिलं नाही साधं ओळखत ही नाही. ति व्यक्ती सकाळी सकाळी येऊन मी तुला ओळखतो हे सांगतो. कस शक्य आहे.

सोनिया "ओह्ह मॅडम, काय सकाळी सकाळी कसल्या विचारात आहात ? "

सोनिया प्रिया च्या ऑफिस ची खास मैत्रीण.

प्रिया " काही नाही गं, तु बोल. कामावर आलीस तर निदान काम तर कर.? "

सोनिया " ओह्ह मॅडम काम चालूच असत. आणि कितीही ते केल ना तरी बॉस ला ते कमी असत. "

प्रिया " हम्म ते पण आहेच ! बरं चल. मला काम करू दे.. तुझ्यावर सारखं मला नाही येत बॉस ला उत्तर द्यायला.!" सोनिया ऑफिस ची फाईल चाळत म्हणते.

सोनिया " चल भेटू लंच टाइम मध्ये तु कर तुझ्यावर बॉस च काम !" अस म्हणतं सोनिया तिथुन निघुन जाते.

तितक्यात प्रिया ला तिच्या आई चा कॉल येतो.

प्रिया " हं बोल आई, पोहचली मी. बरं ऐक ना मी करू का तुला नंतर कॉल ? आणि खुप काम आहे इथे !"

आई " ठीक आहे दुपारी मला कॉल कर. जरा महत्वाचं बोलायचं.!"

आणि आई कॉल ठेवते.. प्रिया ऑफिस च्या कामात खुप व्यस्त होते. दुपारी लंच टाइम होतो 

सोनिया " यार प्रिया चल ना, बघ लंच टाइम झालाय. किती करशील काम? "

प्रिया " हो गं राणी झालं, चल. " अस बोलुन दोघी ऑफिस च्या कॅन्टींग मध्ये बसून लंच घेतात.

सोनिया " प्रिया एक विचारू ? "

प्रिया " बोल ना ? "

सोनिया " तु आज अशी दचकली का ? काय झालं? "

प्रिया " नाही गं, अंग आज एक गोष्ट घडली सकाळी सकाळी !" प्रिया सोनिया ला सांगते.

सोनिया " काय गं ? "

प्रिया " सकाळी सकाळी सात वाजता माझ्या घराची बेल वाजली. म्हणुन मी दरवाजा उघडला तर समोर एक अनोळखी व्यक्ती होती. मी त्याला विचारलं कि कोण आपण वगरे. तर मला बोलतो मी तुला ओळखतो.? "

सोनिया " अरे वाह... मॅडम.. तुझा राजकुमार तुला भेटायला आला म्हणजे तर !!!" आणि सोनिया प्रिया ची मस्करी करते..

प्रिया " अगं मी काय बोलते. तु काय बोलते ? हा चेष्टेचा किंवा मस्करीचा विषय नाही ना !" प्रिया तिच्या वर चिडत म्हणते.

सोनिया " मग काय मला जर अस कोणी भेटायला आलं तर मी नक्की म्हणेन हा मी ओळखते. " आणि सोनिया हसायला लागते.

सोनिया ही अशी व्यक्ती जी स्वतःच्या लाईफ मध्ये कधीच सिरीयस नसते. टेन्शन काय हे तिला माहीतच नसत.

प्रिया " जाऊदे सोड...!" तितक्यात तिला आईचा कॉल येतो.

आई " हे काय विसरलीस का कामात कॉल करायला ? "

आई भडकून बोलते.

प्रिया " नाही गं आई.. बरं काय झालं इतके कॉल केलेस ते.? "

आई " अगं काही नाही, लग्नाचं बाबा बोलतायत बघू या का ? "

प्रिया " नको गं आई इतक्यात नको ! आत्ताच तर कामाला लागली आहे ? "

तितक्यात सोनिया मस्करीत म्हणते.

सोनिया " आई ति लग्नाला नाही च म्हणणार. कारण आज राजकुमार आलेला ना भेटायला !" आणि सोनिया जोरात हसते.

प्रिया " काही काय बोलते सोनिया.. गप्प बस जरा.!"

प्रिया सोनिया वर चिडते.

आई " काय बोलली सोनिया ??? "

प्रिया " काही नाही गं ,,, चल मी ठेवते काम आहे खुप!"

अस बोलून प्रिया फोन ठेवते.


*****क्रमश ***









🎭 Series Post

View all