भरती ओहोटी,भरती

मुलांना आपली काळजी असते ग पण तरीही त्यांचे आपले स्वतःचे एक विश्व असते त्यामुळे कुठेतरी एकटेपण जाणवते.सुख तुझ्यापुढे स्वतः येऊन उभे आहे, ते तुला साद घालते आहे तेव्हा मनाचा कौल घे. मग निर्णय घे. घाईघाईने नकार देऊ नकोस.Ji
*भरती ओहोटी* भाग चार

आशा दारातच उभी होती. अगं किती उशीर मी केव्हाची वाट पाहते म्हणत तिने सुमित्रा मला मिठीत घेतले.

\"घर किती छान सजवले ग, तुझा नीटनेटकेपणा अजूनही तसाच आहे\", सुमित्रा घराचे निरीक्षण करत म्हणाली.
आशा सुमित्रा ला न्याहाळत,"सुमी अजूनही किती छान दिसतेस ग या वयातही, कोणीही फिदा होईल तुझ्यावर"
"तुझ आपलं काहीतरीच हं, बरं घर इतक शांत कस?"
अगं -- आज सर्वांच पिकनिक ला जायचं ठरलं.
अरे वा तू नाही गेलीस? कि मी आले म्हणून .
अगं नाही मला खूप दगदग नाही सहन होत.
आपण अगदी निवांत बोलू.

जेवणानंतर टेबलआवरुन दोघी हॉलमध्ये बसल्या. आशाने सुमित्रा कडे पाहत विचारले\"
"सुमि -- आल्यापासून मी पाहते आहे तू काहिशी विचारात दिसते ,काही वेगळे घडले का? घरी काही झाले की ,अशोकच्या आठवणी काय झाले सांग ना."
तेव्हा मग सुमित्रां ने सतीश नी घातलेले मागणी व मनातल्या शंका आशा समोर मांडल्या.

तुझ्या सर्व शंका रास्तच आहेत. पण तरीही मला वाटते सुमी तू लगेच नकार किंवा होकार नको देऊ.
तू त्यांना पूर्वीपासून ओळखतेस ते सर्व आठव, विचार कर, तुझ्या त्यांच्याविषयीच्या भावना ,त्यांचे तू पाहिलेले व ऐकलेले कॅरेक्टर मुख्य म्हणजे त्यांनी स्वतः तुला मागणी घातली आहे म्हणजे त्यांना तू नक्कीच खूप आवडते तू त्यांच्याकडून वेळ मागून घे. त्यांच्याशी फोनवर संपर्कात राहा, एक दोनदा भेट , व मग ठरव.
एकटं राहणं तेवढंच कठीण असतं मी ते अनुभवलं आहे ,हे गेल्यानंतर".
" मुलांना आपली काळजी असते ग पण तरीही त्यांचे आपले स्वतःचे एक विश्व असते त्यामुळे कुठेतरी एकटेपण जाणवते.
सुख तुझ्यापुढे स्वतः येऊन उभे आहे, ते तुला साद घालते आहे तेव्हा मनाचा कौल घे. मग निर्णय घे. घाईघाईने नकार देऊ नको".
मुलांशी ही बोल ते समजून घेतील
काही वेळ जाऊ दे.

निघताना सुमित्रा ने आशाला घट्ट मिठी मारली तेव्हा हसत हसत "अगं सुमि एवढ्यात तुझी पाठवणी नाही करतिए"म्हणत आशा ने निरोप दिला.
टॅक्सीने परतताना सुमित्रा ने सतीश चा नंबर सेव्ह करून मोबाईल पर्समध्ये ठेवला.

क्रमशः....शेवटच्या भागात.
सुमित्रा ने पुढिल आयुष्याची वाटचाल सतीश बरोबर करावी कां?? तुम्हाला काय वाटते?? रिप्लाय द्यावा.

उद्या शेवटचा भाग
---------------------------------------
लेखिका---सौ प्रतिभा परांजपे

🎭 Series Post

View all