भरती- ओहोटी

मी माझे मन तुमच्यापाशी मोकळे केले तुमच्याजवळ जवळ माझा मोबाईल नंबर आहे.सुमित्रा काहीच बोलत नाही पाहून सतीश ने वेटर ला बिल द्यायला सांगितले व ते उठून गेले.सुमित्रा ने कशीबशी कॉफी संपवली. सतीश च्या प्रश्नांनी ती गोंधळून गेली. . ते तिला आवडले होते, पण-- अशोक गेल्यावर नव्या जोडीदाराचा विचार तिने केला ही नव्हता.


*भरती -ओहोटी *भाग तीन

आज रविवार असल्याने सकाळची ऑफिसची घाई नव्हती दुपारी अर्चनाने विचारले ,"आई आम्ही मार्केट ला जातोय,-- तुम्ही पण चला न.
अग नको, सामान बरेच असेल आणि संकेत तिथे उगाच हट्ट करेल, तुम्ही दोघं जाऊन या मी संकेतला गार्डन मध्ये फिरवून आणते.
पाच वाजता सुमित्रा व संकेत बागेत गेले, तिथे मुलांच्या घोळक्यात संकेत खूप खेळला. घरी परतताना आईस्क्रीम घ्यायला दोघं पार्लरमध्ये शिरले ,निघताना तिथे सतीश दिसले पण तिने मुद्दाम न दिसल्यासारखे केले.

पुढचे दोन-तीन दिवस या न त्या कारणाने ती बाहेर गेली नाही .पण योगायोग म्हणतात ना तसे, लायब्ररीत पुस्तके पाहताना ते भेटले.
इंदोर बद्दलची विचारपूस झाली , बोलणे वाढते असे वाटताच, बरे मी निघते असे म्हणत सुमित्रा निघाली.
सतीश ची नजरआपला पाठलाग करती असे तिला वाटत राहिले.

मध्यंतरी संकेतला बरे नव्हते, त्यामुळे चार-पाच दिवस ती घरीच होती .पण औषध संपल्याने ते घ्यायला ती जवळच्या मेडिकल स्टोअर ला गेली. तिथे सतीश बसलेले होते.
तुम्ही इथे ?---कसे
मी इथे पार्ट टाइम करतो तेवढाच विरंगुळा , माझा पॅथॉलॉजी चा अनुभव आहे वेळ चांगला जातो.
औषध घेता घेता बोलणे झाले ‌.
निघताना सतीश म्हणाले "तुमचा थोडा वेळ द्याल का? मला तुमच्याशी थोडं वेगळ्या विषयावर बोलायचं आहे, पण इथे नको".
"थोडावेळ विचार करत" सुमित्रा-- कुठे?
बिग बाजार च्या कॉफी शॉप ला उद्या अकरा वाजता,
पाहते जमतय का म्हणत सुमित्रा दुकानातून बाहेर आली....

सतीश---उद्या भेटेल कां. तिचा होकार असो वा नकार, तु मला मला पहिल्या भेटीतच आवडली होती हे तिच्यापाशी कबूल करायचे आहे. मग तिची काहीही रिएक्शन असो.

सुमित्रा--सतीश नी दिलेले निमंत्रण स्वीकारावे का? काय मनात असेल त्यांच्या. आपल्याला जे वाटते तेच कि, जावे की नाही ? उद्या आपल्याला बाल मैत्रीण आशा कडे भेटायला जायचेआहे.

सकाळी चहा पिता पिता अर्चनाने विचारले "आई तुम्हाला आशा मावशींना भेटायला जायचे होते आज जाणार आहे का",?
हो गं तयार होते.
आई तुम्ही ती अबोली साडी नेसा न तुम्हाला खूप छान दिसते.
बर - बर म्हणत सुमित्रा तैयार झाली.

कॉफी शॉप मध्ये सतीश च्या समोर खुर्चीत बसताना सुमित्रा ला अवघडल्यासारखे झाले. अशोक ऐवजी परपुरुषाच्या सानिध्यात , इतक्या जवळ किंचित थरथरत ती खुर्चीत बसली.
Be Comfortable म्हणत सतीशने वेटर ला दोन कॉफीची ऑर्डर देत सुमित्रा कडे नजर टाकली .
त्यांना आवडलेली अबोली, किंचीत कोमेजलेली, तरीही पहात रहावी अशी.
इथे किती दिवस आहात?
\"मी, चार सहा दिवसात सुट्ट्या संपल्या की परत जाईन\".
ओ--मला तुम्हाला, म्हणजे मी स्पष्ट बोलतो," मला तुम्ही खूप आवडता " म्हणजे पूर्वी -- पण तेव्हा--- असो, "पुढच्या आयुष्यात तुमची साथ मला मिळेल का"?
तुम्ही माझ्या Companion व्हाल कां?
तुम्ही विचार करून उत्तर द्या. Take Your own time जर तुमची इच्छा नसेल तर , okay

मी माझे मन तुमच्यापाशी मोकळे केले तुमच्याजवळ जवळ माझा मोबाईल नंबर आहे.
सुमित्रा काहीच बोलत नाही पाहून सतीश ने वेटर ला बिल द्यायला सांगितले व ते उठून गेले.

सुमित्रा ने कशीबशी कॉफी संपवली. सतीश च्या प्रश्नांनी ती गोंधळून गेली.
. ते तिला आवडले होते, पण-- अशोक गेल्यावर नव्या जोडीदाराचा विचार तिने केला ही नव्हता.
दोघं एका शहरात राहत होते. त्यामुळे मित्रपरिवार हि दोघांचा एक असतानां काही गैरसमज होण्याची शक्यता, उगाचच बदनामी.
मुले समजून घेतील कां? आणि यांच्याबरोबर आपलं जुळेल कां?
असे किती ओळखतो आपण एकमेकांना, या वयात ॲडजस्ट करणे जमेल? सतीश जोडीदार म्हणून जरी आदर्श असले तरीही.

अशा असंख्य विचारांच्या लाटा मनात उसळत होत्या , व बुद्धीच्या तटबंधाला आदळून माघार घेत होत्या.

समाजाचे तटबंध ओलांडून जाण्याची शक्ति व वेग या लाटांमध्ये नव्हता. सतीश चा नंबर सेव्ह करावा कि डिलीट या संभ्रमात सुमित्रा ने बाहेर येऊन आशा कडे जाण्यासाठी रिक्षावाल्याला हात केला.

क्रमशः........
--------------------------------------
सौ.प्रतिभा परांजपे

🎭 Series Post

View all